मत्त मी, मदमस्त मी
आषाढीचा जलद मी
साद घालतो उधाणवारा
...........पाऊस माझा सखा !
धुंद मी, मृदगंध मी
वरुणाचा वर्षाव मी
वळवाचा तो थेंब साजीरा
...........पाऊस माझा सखा !
मी धरा, दंवाचा थेंब मी
घनगंभीर आकाश मी
बेधुंद बरसती वर्षा धारा
...........पाऊस माझा सखा !
तृप्त मी, आश्वस्त मी
पाऊसवेडा चातक मी
मनमोराचा फुले पिसारा
............पाऊस माझा सखा !
विशाल.
प्रतिक्रिया
13 Jul 2009 - 2:16 pm | leo nardo di caprio
फारच छान!
मदमस्त leo