प्रतिकुल परिस्थीतीवर विजय मिळवण्याकरता लागणारे धैर्य , साहस आणि बुद्धी हा माणसाचा अंगभुत गुण असतो. युद्ध सदृश परिस्थितीत हा हाताला लागला तर विजय नक्की.
१९९९ साली कुक्कुट पालन क्षेत्रात मला ३ वर्ष झाली होती. ह्या ३ वर्षात मी रस्त्यापेक्षा मी लीटर्(शिटवडा)वर जास्त फिरलेलो होतो. मी जमा केलेला विदा हा वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस मधे चर्चेचा विषय होता. हा विदा मी रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शेतकर्याना वाटायचो.
कोंबड्यानी खाल्लेले अन्न, प्राशन केलेले पाणी आणि बाहेरचे हवामान ह्यांची सांगड घातलेला विदा वापरल्यास शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ व्हायची. ज्यांच्या बरोबर काम करायचो त्यांना सुद्धा ह्याबाबतीत काहीही वाटायचे नाही. दीलदार होता हा शेठ.(इथे लहानातला लहान शेतकरी सुद्धा शेठ ह्या नावाने उच्चारला जातो)
कुक्कुट पालन उद्योग हा मोटर वाहन उद्योगापेक्षा मोठा. ह्यात मुख्यतः चार घटक. हॅचरी, शेतकरी,ट्रेडर, दुकानदार.चारही पैकी नेमके जास्त हलकट कोण हे सांगणे कठीण. १०० हलकट मेले की तयार होतो तो पोल्ट्री फार्मर. शंभर फार्मर मेले की तयार होतो तो ट्रेडर. १०० ट्रेडर मेले की तयार होतो तो दुकानदार. आणि असे १०० दुकानदार मेले की तयार होतो हॅचरी वाला असे ह्या जंगलातील एक म्हण. अत्यंत असुरक्षित असा धंदा. सगळे एकमेकावर अवलंबुन असलेले ' जानी दुष्मन'. कुणी कीती बुडवले ह्या वरुन त्याची लायकी ठरायची. शेतकरी हॅचरी ला बुडवणार. ट्रेडर शेतकर्याला. दुकानदार ट्रेडरला. संध्याकाळी विविध अड्ड्यावर 'आज किसको घोडा लगाया' ची पारदर्शक चर्चा दारुबरोबर करताना ह्या दुष्मनीचा लवलेश सुद्धा नाही. बहुधा सर्व घटक 'जुगारी' वृत्तीचे. म्हाभार्तातला 'धरमराज' कायच नाय. त्याने तर आपली बायको फक्त एकदाच पणाला लावली. इथे दर दोन महिन्याला घरातले सर्व काही पणाला लागायचे. एका फ्लॉक नंतर चपला हार.
दुसर्या फ्लॉकला तोच हार मारवाड्याकडे. क्रूर, निर्घृण वृत्ती हा स्थायी भाव. माणुसकी अभावानेच दिसायची. ह्यात भरडला जायचा तो साधा सुधा मराठी शेतकरी. पुरक व्यवसाय म्हणुन कोंबड्या पाळणारा.
त्या दिवशी जर मी नाही म्हटले असते तर कदाचीत माझ्या सर्व आयुष्याला वेगळे वळण लागले असते. हो म्ह्टले आणि सर्व चक्रच फिरले. मास्तरचा डॉक्टर झालो.
रविवारची सकाळ. शेठ गरीबाघरी आले. त्यांच्या बरोबर वसुलीच्या कामाकरता मी आजवर कधीही गेलो नव्हतो. पण त्यादिवशी नाही म्हणु शकलो नाही. अचानक मला बरोबर नेण्यामधे काही नक्की विचारधारा होती हे मला दोन वर्षाने कळाले. ज्या ट्रेडर कडे मी शेठ बरोबर गेले ते ह्या धंद्यातले नावाजलेले एकमेव मराठी. ह्यांचा पण एक मोठा फार्म होता. देवाण घेवाण झाल्यावर परत जायला उठलो. अचानक ट्रेडर कम फार्मर शेठ नंबर १ ने "मास्तर, आमच्या फार्म ला पण विझिट द्या की" अशी नम्र विनंती केली. हा माणुस दिसला की पोल्ट्रीतील भलेभले शेठ उठुन उभे राहायचे एवढा दबदबा होता. मी आमच्या शेठकडे बघितले. "कृपया आज तरी नाही म्हणु नकोस" ची मुक विनंती त्यांच्या डोळ्यात दिसली.
___________________________________________________________
ट्रेडर शेठ च्या भव्य गाडीतुन बसुन आम्ही सर्व फार्मवर निघालो. गप्पा सुरु झाल्या. ट्रेडर शेठ नंबर २ जरा गप्पच होते. बोलता बोलता खुलासा झाला. ह्या शेठनी हैद्राबाद वरुन जरा स्वस्त मिळतात म्हणुन ३०००० पिल्ले आणली होती. आणि त्यातली ६ व्या दिवशी त्यातली २७००० पिल्लाची मरतुक झाली होती. दिवाळी तोंडावर होती. हे पैसे देणारे सायकल सुटले असते तर हे दोन्ही शेठ रस्त्यावर येणार होते. ही मरतुक का झाली ह्याचा शोध घेण्याकरता हैद्राबादवरुन फार मोठा "डॉ कटर "येणार होता. आणि त्या करता ही फार्म विझिट.
"कशाने मेली असतील हो मास्तर, रोगराईचा संबंध च नाही. फार्म दोन महीने बंद ठेवला होता श्रावणात". शेठ नंबर २
बायो सिक्युरिटी,खाणापिण्याची, ब्रुडींग ची रजिस्टर नीट आहेत का?
"हो अगदी तुम्ही सांगता तशी मेंटेन केली आहेत."शेठ नंबर २ (आर तीच्या आमच्या शेठ्ची करामात)
खाद्य तपासलेले आहे का?
"काल पहीले काम तेच केले" शेठ नंबर १
अरे वा
" आम्ही आपले विद्यार्थी" शेठ नंबर २ ( बोललेले प्रामाणिक वाटले)
एक काम करा पनवेलला गाडी थांबवा. आपण आणखी एक माणसाला बरोबर घेउ. कामगिरी फत्ते होईपर्यंत त्याला कसलेही प्रश्न विचारायचे नाहीत.
ऑर्डर देणार्यांना मी ऑर्डर देत होतो. आमचे शेठ अस्वस्थ.
"कसली कामगिरी"? शेठ नंबर १
सांगतो नंतर
पनवेल ला मी माझ्या मित्राला फोन केला. गाडीत बसुन सिमेन्सच्या ४०००० हजाराच्या मोबाइल फोन वरुन पहील्यांदाच बोलताना पैशाचा माज काय असतो ते मी बघत होतो. मित्र पनवेलला गाडीत चढला. फार्म येईपर्यंत आम्ही दोघेच स्ट्रॅटेजी ठरवत होतो. फार्मवर पोचल्यावर तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. २७००० मेलेल्या पिल्लांची रास बघताना कसेसेच वाटले. शेठ नंबर दोनच्या डोळ्यात पाणी.
मित्राने काही पोस्ट मॉर्टेम केली आणि माझ्या कानात कुजबुजला. आमचे नेमके काय चालले आहे ते कुणालाच कळत नव्हते. पण काहीतरी फायदा नक्की होणार हे न कळण्या एवढे मुर्ख नक्की नव्हते. डॉक्टर यायला जवळ जवळ एक तास होता.
गावापासुन लांब असलेल्या ह्या फार्म वर मला हवे असलेले केमिकल नव्हते. आणि गावात पण मीळणे शक्य नव्हते.
आता काय करायचे असा प्रश्न पडला.
बियर मिळेल का इथे? मी विचारले
"हवी तेवढी" शेठ नंबर १ ( ह्यांच्या आधी दु:ख निवारणाच्या दोन झाल्या होत्या)
पोल्ट्रीमधे पाण्यापेक्षा दारु स्वस्त.
मी एक औषधाची अम्प्युल घेतली. त्यात एक बियर चा थेंब घातला. राहीलेली बियर शेठ नंबर १ ना प्यायला सांगितली. सहसा 'ब्ल्यु लेबल'
पीणार्या ह्या शेठनी ती न तक्रार करता बियर रिचवली. सुमारे पाउण तासानी मी त्यांना बियर च्या "आफ्टर इफ्फेक्ट "चा एक थेंब अम्प्युलमधे सोडायला सांगितला. ती अम्प्युल मी मित्राला दीली.
डॉक्टर आला. त्याने सुद्धा पोस्ट मॉर्टेम केली. मी आणि माझा मित्र कोण ह्याची त्यांना कल्पना दिलेली नव्हती.
एक शेठला 'आता मी संपलो' पोझ शिकवलेली होती.
I think this is a simple case of mis management. I have concluded that from my post mortem. I will give you the written report and send one copy to Hatchery. I am sorry, there will be no compensation. डॉक्टर म्हणाला.
I beg to differ Doctor. This is a case of infected chicks. Look at this bottle, and white granule deposits. They are from lungs of chicks harvested on 3 rd day mortality. And I am Prabhu. And I know what I am talking about. Talk to your boss. If this farmer is not compensated fully, no chik will ever enter in Maharastra from Hydarabad, I guantee you that. माझे फोकोपनिषद
डॉक्टर फाफलला.
फोनवरुन आपल्या बॉसकडे बोलला.
एक तास खाणे पिणे झाल्यावर हैद्राबाद वरुम फुल्ली कंपेंसेटेड चा फोन आला.
तेजी मधे आता दुसरी पिल्ले लगेच मिळणे शक्य नव्हते. आमच्या शेठला पिल्ले पुरवणार्या हॅचरी चा मॅनेजर फोनच घेत नव्हता. मी सरळ मालकांना फोन लावला. ३ दिवसात पिल्ले आली. दिवाळी साजरी झाली दोन्ही शेठची आणि आमच्या शेठची पण. २५ रुपये प्रॉडक्शन कॉस्ट ला ५५ रुपये भाव मीळाला. आमच्या शेठ नी सुमो घेतली. शेठ नंबर दोननी मोठा नविन फ्लॅट घेतला. पुढच्या मंदीत हाच फ्लॅट आणि सुमो पणाला लागणार होती हे मला माहित होते.
जाता जाता: अम्प्युल मधे फुफ्फुसातील डीपॉझीट ३ र्या दिवशीच ठेवल्यावर सोल्युशन ला येणारा खास रंग आणि वास येण्याकरता मी केलेली युक्तीची आठवण झाल्यावर हहपुवा होणारा शेठ जन्माचा मित्र झाला.
प्रतिक्रिया
13 Jul 2009 - 9:23 am | अवलिया
१०० हॅचरीवाले १०० वेळा मेले की एक प्रभु !
--अवलिया
=================
विकासराव विचारवंत असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण.
हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.
13 Jul 2009 - 9:45 am | विनायक प्रभू
अवलिया शेठ.
आता तो मास्तर नाय राहीला ह्याची नोंद घ्या.
13 Jul 2009 - 9:27 am | सहज
सचोटी, नितिमत्तेचा धंदा कुक्क्टपालन :-)
इतकी टोपी उसके सर सगळेच भारी.
मास्तर की जय हो. पण खरचं तंदूर तंगडी खाताना हे सगळे लोचे कधी माहीत नव्हते. :-)
13 Jul 2009 - 4:26 pm | दशानन
+१
हेच म्हणतो.
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
13 Jul 2009 - 4:53 pm | सुनील
पण खरचं तंदूर तंगडी खाताना हे सगळे लोचे कधी माहीत नव्हते
सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Jul 2009 - 4:46 pm | परिकथेतील राजकुमार
गुर्जीचे हे एक वेगळेच रुप दिसले की आज ;)
बाकी 'कोबडी' म्हणजे काय ? का शिर्षक चुकीचे पडले आहे ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
13 Jul 2009 - 5:50 pm | रेवती
बापरे! हे नविनच जग दिसतय.
प्रत्येक धंद्याची आपापली गणितं; फायद्याची आणि फसवणूकीची!
सर, आपण ग्रेट आहात! हॅचरी हा साधासुधा व्यवसाय वाटला होता तो भलताच तिरका निघाला!
रेवती
13 Jul 2009 - 6:57 pm | चतुरंग
कॉक कॉक कॉक कॉक कॉक!!!! ;)
(रूस्टर)चतुरंग
13 Jul 2009 - 7:04 pm | पिवळा डांबिस
मास्तर, कायकाय धंदे केलेत हो!!! आपला सलाम!!
बाकी
no chik will ever enter in Maharastra from Hydarabad, I guantee you that. माझे फोकोपनिषद
असं भलतंच काही करू नका हो! तुम्ही असं केलंत तर अनुष्का महाराष्ट्रात कशी येणार? आणि जर ती आली नाही तर मग आपल्या तात्याच्या कुक्कुटपालनाचं काय होणार?:)
तात्या अंमळ ह. घे!!
:)
13 Jul 2009 - 7:20 pm | नितिन थत्ते
काय डांबिसकाका !!!
तात्या आता कराचीवाल्याची मिठाई खातात.
तातुष्काचे तात्यानी झालेत.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
13 Jul 2009 - 9:13 pm | टारझन
हे वाक्य काळजाला भिडले !!
आणि हो.. मास्तर __/\__
13 Jul 2009 - 7:30 pm | धमाल मुलगा
लय लय दिवसांनी इतका बेक्कार फुटलो!!
ज ह ब ह र्या !!
डांबिसकाका इज ब्याक इन अॅक्शन :)
काय काका, सुटी चांगलीच मानवलेली दिसते..एकदम फ्रेश आणि 'खुश खुश वाडिलाल' होऊन आलाहात :)
बाकी प्रभुबाबा,
अजुन काय काय दुनियादारी करुन बसला आहात हे जरा निवांत 'बसु' तेव्हा ऐकवाच :)
- (तंदूरी) ध मा ल :)
----------------------------------------------------------------------------------------
::::स्वाक्षरीशून्य!::::
13 Jul 2009 - 7:54 pm | बिपिन कार्यकर्ते
मास्तर, ही ष्टोरी त्या दिवशी ऐकली नव्हती. जबराच. काय काय उद्योग केलेत तुम्ही.
बिपिन कार्यकर्ते
13 Jul 2009 - 9:59 pm | विनायक प्रभू
कसे काय बॉ?
इन्फेक्शन होते की.
ते फक्त ३ दिवसाला हार्वेस्ट केले एवढेच सांगितले फक्त टेक्निकल बाबी पुर्ण करण्या करता.
शेतकर्याला ह्या बाबी माहीत नसतात. संपुर्ण उध्वस्त होतो.
14 Jul 2009 - 1:27 am | स्वाती२
सर तुम्ही ग्रेट आहात. वरवर पाहाता लक्षातही येत नाही अशा धंद्यातले गुंते.