तात्यांच्या विनंतीला मान देऊन......
साहित्यः
१/२ किलो कोलंबी
१/२ किलो तांदुळ
४-५ वाट्या नारळाचे दुध (साधारण २ नारळाचे)
१ टी.स्पून तिखट
२ टी.स्पून आले, लसुण पेस्ट ( १ इंच आले व ७-८ लसूण पाकळ्या)
१वाटी तेल
मसाला (४ लवंगा,२ दालचिनीचे तुकडे, ४ वेल्दोडे, १/२ टी.स्पून जिरे, २ तमाल पत्रे)
१ टी.स्पून गरम मसाला
१ टी.स्पून बडीशेप,
१ टी.स्पून जिरे पावडर
१.टी.स्पून हळद
चवीनुसार मीठ
१.तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.
२.कोळंबी धुवून हळद व मीठ लावून ठेवावी.
३.पातेल्यात तेल गरम करून त्यात वरील मसाला घालावा. त्यात मीठ लावलेली कोलंबी घालावी व वाटलेले आले, लसूण घालून परतावे.
गरम मसाला, तिखट व हळद घालावी व निथळून ठेवलेले तांदूळ घालून परतावे. त्यात नारळाचे दूध घालावे नंतर आवश्यक वाटल्यास १ भांडे पाणी घालुन व चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर ठेवावे. भात शिजवावा.
सर्व्ह करताना कोथिंबीर आणि साजुक तूप घालून वाढावी.
टीप: पांढरा कोलंबी पुलाव हवा असल्यास वरील रेसिपी मध्ये हळद वापरू नये व तेलात कांदा(जास्त परतू नये) टाकून मग मसाला घालावा....
कोलंबी जेव्हा स्वस्त ताजी मिळते तेव्हा ती व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवावी. त्याला हळद, मीठ चोळावे व लोळंबी तेलावर खरपूस तळावी.
थंड झाल्यावर एअर टाइट डब्यात घालून फ्रिजर मध्ये ठेवावी. हवी तेव्हा थोडी थोडी वापरता येते. साधारण २ महिने टिकते.
प्रतिक्रिया
17 Feb 2008 - 10:10 am | विसोबा खेचर
स्वातीताई, माझ्या विनंतीला मान देऊन कोलंबीभाताची पा कृ इथे दिल्याबद्दल धन्यवाद...
माझी ही अत्यंत म्हणजे अत्यंत फेवरेट पा कृ आहे... :)
तात्या.
17 Feb 2008 - 10:18 am | प्रभाकर पेठकर
व्वा..व्वा...
रविवार सकाळी सकाळी मिपा उघडले आणि .....उघडले स्वर्गाचे द्वार...
कोलंबी भाऽऽऽत...... खल्लास!
नारळाच्या दुधाने कोलंबी भाताला खास राजेशाही चव येणार ह्यात शंका नाही.
धन्यवाद.