आणखी एक धरण ??

पाऊसवेडी's picture
पाऊसवेडी in जनातलं, मनातलं
10 Jul 2009 - 3:50 pm

आजपर्यंत मेधा पाटकर यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विविध आंदोलनाच्या बातम्या फक्त पेपर किंवा दूरदर्शनवर पाहत होते पण या वर्षी त्यांचा सापळी धरणग्रस्तांसाठी सुरु केलेला लढा जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल मिपाच्या वाचकांना सांगावे म्हणून हा माझा पहिलाच प्रयत्न.

माझ्या M.Sc. नंतर मी एका कार्यालयात काम करायला सुरुवात केली आणि त्यच मुले मला हे संधी मिळाली कि मी मेधातायींचा हा सुरु असलेला लढा अनुभऊ शकले.

गोदावरी मराठवाडा पाठबंधारे विकास महामंडळाने दोन धरणांचा प्रस्ताव मांडला होता त्यापैकी इसापूर धरण म्हणजेच अप्पर पेनगंगा रिवर भाग -1 पूर्ण झाले असून त्याचा वापर त्याच्या क्षमतेपेक्षा कमीच प्रमाणात होते आहे.आणि असे असूनही मराठवाडा पाठबंधारे विकास महामंडळाला त्याचा भाग -२ म्हणजेच "सापळी धारण " पूर्ण करण्याची घाई लागली आहे आणि अर्थात यात अनेक राजकारणी आणि संधिसाधू लोकांचा समावेश आहे.

याच धरणाच्या संघर्षाची निमिताने मेधाताईना जवळून भेटण्याची आणि त्यांची लोकांसाठीची तळमळ खर्या अर्थाने समजून घ्ययला मिळाली.सापळी धरण हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या गावाजवळील कयाधू नदीवर बांधण्याचे सरकार ने योजिले आहे. या धरणासाठी एकूण ११ गावे पूर्णतः तर ३ गावे अंशतः पाण्याखाली जाणार आहेत आणि त्याचबरोबर या गावात राहणाऱ्या ३१४१ कुटुंबाचे विस्थापन होणार आहे मात्र सापळी धरणग्रस्त आता सरकार वर विश्वास ठेऊ शकत नाही कारण पहिल्या धरणाच्या वेळेस (इसापूर) विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन होणे आज धारण बांधून तीस वर्षे होऊनही झालेले नाही त्यामुळेच " आधी पुनर्वसन मग धरण" अशी भूमिका सापळीच्या लोकांनी घेतली तर त्यात त्यांचे काय चुकले?

या धरणात ५१३८ हेक्टर्स इतकी जमीन पाण्याखाली जाणार आहे आणि जलसंपदा खात्याने म्हनालायानुसार फक्त ९०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणली जाईल असे आहे तर मग आत्ताही या पेक्षा अधिक जमीन ओलिताखाली आहेच कि आणि जर आपल्या सरकारला जमिनिसाठीच पाणी वापरायचे असेल तर मग एवढी मोठी जमीन पाण्याखाली घालून थोडीच जमीन भिजणार असेल तर त्याचा काय उपयोग होईल ??? यापेक्षा तेथील गावकर्यांनी म्हणल्याप्रमाणे कमी जमीन वापरून के.ती. बंधारे,वाटर शेड म्यानेजेमेंत (Water Shed Management),पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग,जमिनीखालील पाण्याची पातळीत वाढ करण्यासाठीच्या उपाययोजना राबविल्या तर कमी जमीन व्यापणारे आणि कमी खर्चात अधिक पानी देणाऱ्या योजनांचा अधिक फयदा होईल आणि धरणाला आणि विस्थापानाला नवीन आणि योग्य पर्याय मिळेल.

आणि यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे मुळातच कमी पाऊस असेलेल्या मराठवाड्यात धरणात साठविण्यासाठी तरी पाणी कुठून येणार आहे?? तसेच या भागातील जमीन हि काळी माती असल्यामुळे आणि कमी पावसामुळे हे धरण पाण्यापेक्षा गाळानेच जास्त भरेल आणि मग यातील पाण्याच वापर कसा आणि कुठे होणार याची विचार धरण बांधणार्यांना करावाच लागेल.

मराठवाड्यातील पर्यावरणीय मुद्द्यांचा विचार करता येथे अनेक वनस्पती आहेत यातील "शेव्रा" सारख्या गवताची वाढ जगात इतरत्र कुठेही १ मीटर पेक्षा जास्त होत नाही आणि तेच गवत कयाधू नदीच्या काठी मात्र २-३ मीटर एवढे वाढते याचबरोबर मार्वेल, जोन्धली सारख्या चार्याच्या गवतन्चहि नाश होईल.आणि तेथील वैविध्यपूर्ण अशा वनांचे नुकसान होईल असे पुण्याचे वनास्पतीतज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ आणि औरंगाबादचे डॉक्टर एस व्ही नाईक यांचे म्हणने आहे.

या धरणाच्या पर्यावरणीय अनुमतीसाठी पर्यावरणीय आघात मुल्यांकन अहवाल पाठबंधारे विभागाने तयार केला आहे मात्र हा अहवाल खूप जुना असून यातील सर्वच माहिती हि कार्यालयात बसून लिहिली आहे कारण प्रत्यक्षात मात्र कोणतीही माहिती गोळा करयला सरकारकडून एकही माणूस तिथे आला नव्हता असे गावकर्यांचे म्हणणे आहे.

तसेच इतक्या मोठ्या धरणाचा पर्यावरणीय आघात मुल्यांकन अहवाल हा फक्त ३३ पानाचा आहे आणि त्यातही अनेक चुका आहेत त्या पैकी महत्वाच्या चुका खालीलप्रमाणे

१. या अहवालात कोठेही किती जमीन पाण्याखाली जाणार आहे आणि किती पाणी मिळणार आहे हे सांगितेले नाही

२.अहवालानुसार ६०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे मात्र ३० ऑक्टोबर २००६ साली पाठबंधारे विभागाने
पर्यावरणाच्या सरकारी अधिकार्यांना (MoEF) ला पत्राने (CAD/WRD/T-1/5939) नुसार ९०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे असे असेल तर खरी आकडेवारी कोणती ??

३. मराठवाड्यात आढळून येणाऱ्या सेर्पत्नार्या (reptiles) प्राण्यांमध्ये तिथे अजगर??? हा प्राणी सापडतो असे म्हटले आहे .

४. पर्यावरणीय आघात मुल्यांकन अहवाल हा सूची (check-list ) पद्धतीने तयार केला आहे. यात अनेक चांगलं विटे मुद्द्यांना गुण देऊन शेवटी ते मोजेले जातात आणि अहवालातील सुचीमाध्य तयार कार्नायानी मोजण्याचे कष्ट न घेत्लाय्मुळे त्यांनाच माहिती नाही कि त्यात वाईट मुद्यांचे गुण हे २६ होतात आणि चांगल्या मुद्यांचे गुण २२ होतात मग आत्ता -४ गुण असेलेला अहवाल पर्यावरणासाठी उपयुक्त कसा असू शकतो हे त्याच लोकांना माहिती.

५. पाणी आणि हवेच्या सध्या परिस्थितीचे अहवाल हे जुने म्हणजेच २००४ चे असून ते हि अत्यंत त्रोटक स्वरूपातील आणि कमी नमुने घेऊन करण्यात आले आहे यातही अहवालात पाण्यामध्ये E.coli सारखे जंतू सापडत असूनही हे पाणी पिण्यायोग्य आहे असे म्हटले आहे.

कोणतेही धारण बांधण्यासाठी सरकारची आणि जलआयोगाची तसेच पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी लागते जी पाठबंधारे विभागाकडे नाही कारण मुळात हा पर्यावरणीय मुल्यांकन आघात अहवालच जुना असून त्यात खूप त्रुटी आहेत आणि असे असूनही काही राजकीय पाठिंब्यामुळे या धरणाची जनसुनावणी देखील २० डिसेंबर २००८ ला कळमनुरी येथे ठेवण्यात आली. आनिताब्बळ सहा तास चालेल्या आणि हजारो लोकांचा सहभाग असेलेल्या या जनसुनावणीमध्ये या धरणाला पाठींबा देणारा आणि धारण हवे असे म्हणणारा एकही माणूस नव्हता यावरूनच आत्ता हे धरण लोकांना नको आहे हे सिद्ध होते

खरेतर , आपणही फक्त विरोधासाठी विरोध न करता आणि सरकारनेही जनता नाही म्हणते आहे म्हणून धरण बांधण्यापेक्षा किवा न बांधण्यापेक्षा या धरणाबाबत सारासार विचार करण्याची गरज आहे नाहीतर आज इसापूर धरणासारखे न त्या पाण्याचा उपयोग आणि त्याचा त्रास विस्थ्पिताना होणे हे अपरिहार्यच आहे.

आणि अर्थातच हा विषय खूपच मोठा आहे पण तरीही मी तो काही ठराविक मुद्दे घेऊन थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मांडणीमाहिती

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

10 Jul 2009 - 4:52 pm | सखाराम_गटणे™

चांगला लेख.
मी धरणग्रस्तांच्या समस्या जवळुन पाहील्या आहेत.
----
एप्रिल मिपा संगीतकट्टा प्रयोजन: http://misalpav.com/node/6487

कृपया या विषयावर लिहीत रहा.

आमच्यासारखे वाचक काय करु शकतील किंवा आंदोलनकर्त्यांना आमच्याकडून कुठली भूमीका अपेक्षीत आहे हे जरुर कळवा.

Nile's picture

15 Jul 2009 - 12:50 pm | Nile

असेच म्हणतो. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2009 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>धरण बांधण्यापेक्षा किवा न बांधण्यापेक्षा या धरणाबाबत सारासार विचार करण्याची गरज आहे नाहीतर आज इसापूर धरणासारखे न त्या पाण्याचा उपयोग आणि त्याचा त्रास विस्थ्पिताना होणे हे अपरिहार्यच आहे.

या विषयावर आपण अजून लिहावे असे वाटते.
वाचायला आवडेल.

-दिलीप बिरुटे

लेख आणि त्यातील माहीती आवडली.

मेधा पाटकरांच्या बाबतीत माझे मत जरा गोंधळलेले आहे. एकीकडे त्यांचे म्हणणे पुर्ण समजू शकते म्हणूनच पटते देखील. मात्र त्याच वेळेस त्या कुठे त्याला आल्टरनेटीव्ह देतात असे वाटत नाही. त्यामुळे प्रतिमा केवळ बंडखोरीचीच होते. हे दुरून वाटणारे विचार जर चुकीचे असतील तर अवश्य सांगा. कारण विचार/कृती पटोत न पटोत त्यांच्याबद्दल आदर नक्कीच आहे.

विजुभाऊ's picture

13 Jul 2009 - 3:58 pm | विजुभाऊ

तो अल्टर्नेटीव्ह मेधापाटकरानीच द्यावा हा कसला आग्रह? लोकांच्या हक्कासाठी लढणे म्हणणे विकासाला विरोध असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
धरण बांधायला ना नाही पण विस्थापितांच्या पुनर्वसानाचे काय?
सातार्‍याच्या उरमोडी धरणाचे पाणी स्थानीक सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्याला न मिळता त्यांच्या डोळ्यादेखत ते सोलापूरकडे वाहून नेले जाते. सरदार सरोवराचे पाणी आणंद जिल्हयातील पटेलांच्या शेतीला वापरले जात असेल तर विरोध होणारच ना?
माझी जमीन/ पाणी माझ्याच भागातले आणि मी मात्र देशोधडीला हे का सहन करायचे

कुंदन's picture

13 Jul 2009 - 4:07 pm | कुंदन

विजु भौंशी सहमत.

शाहरुख's picture

14 Jul 2009 - 8:26 am | शाहरुख

>>तो अल्टर्नेटीव्ह मेधापाटकरानीच द्यावा हा कसला आग्रह?

मलाही आधी पेटकर बाईंची भुमिका टोकाची वाटायची पण नंतर माझेही मत विजुभाऊंसारखेच झाले..

अजुन या विषयावरचे लेख वाचायला आवडतील..

मृदुला's picture

11 Jul 2009 - 5:03 pm | मृदुला

लेख माहितीपूर्ण आहे. मूल्यांकन -४ असताना फायदा नक्की कोणाचा होतो आहे? मुळात हे धरण बांधावे अशी कल्पना कुठून आली, याबद्दलही लिहावे.

पाऊसवेडी's picture

13 Jul 2009 - 11:26 am | पाऊसवेडी

: आमच्यासारखे वाचक काय करु शकतील किंवा आंदोलनकर्त्यांना आमच्याकडून कुठली भूमीका अपेक्षीत आहे हे जरुर कळवा.
धन्यवाद नक्की सांगेन

: मूल्यांकन -४ असताना फायदा नक्की कोणाचा होतो आहे?
खरेतर मुल्यांकन -४ असेल तर धरणग्रस्तांना फयदा होतो परंतु इथे मुळातच ह आहावालाच चुकीचा असल्यामुळे पण या गोष्टीला अनेक बड्या लोकांचा पतीम्बा असल्यामुळे सरकारी अधिकारीदेखील या गोष्टीकडे दुर्लक्ष्य करत आहेत.याची सविस्तर माहिती पुढील लेखात नक्की टाकते

आणि माझं पहिल्याच लेखल प्रतिसाद देणारी आणि न देणार्यांना मनापासून धन्यवाद .

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे न मंजूर

लिखाळ's picture

14 Jul 2009 - 12:13 am | लिखाळ

लेख चांगला आहे. लिहित राहावे.
धरणे का बांधावीत, कोठे बांधावीत, धरणातले पाणी ज्यांची जमिन बुडते त्यांना कसे मिळेल/मिळेल का? जे त्या पाण्याचा वापर करतात त्यांनी विस्थापितांकरिता काय करावे/करावे का? या बद्दलसुद्धा लिहावे.

-- लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jul 2009 - 12:21 am | बिपिन कार्यकर्ते

लिखाळाशी सहमत. अजून लिहावे.

बिपिन कार्यकर्ते

अनामिक's picture

14 Jul 2009 - 12:59 am | अनामिक

अतिशय माहितीपुर्ण लेख. लिहीत रहा.

-अनामिक

स्वाती२'s picture

14 Jul 2009 - 1:17 am | स्वाती२

+१ असेच म्हणते.

नीलकांत's picture

14 Jul 2009 - 1:21 am | नीलकांत

अश्या विषयावर अधिक वाचायला आवडेल.

कृपया असेच लेख येऊ द्या.

- नीलकांत

मदनबाण's picture

14 Jul 2009 - 5:20 am | मदनबाण

" आधी पुनर्वसन मग धरण"
हेच धोरण मला जास्त योग्य वाटत.
वेगळा विषय, असेच लिहीत रहा.

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

धनंजय's picture

15 Jul 2009 - 2:02 am | धनंजय

पुनर्वसन, फायदे-तोट्यांचा विचार हे सर्व महत्त्वपूर्ण आहे.
तुम्ही पर्यायही सांगितला आहे :

कमी जमीन वापरून के.ती. बंधारे,वाटर शेड म्यानेजेमेंत (Water Shed Management),पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग,जमिनीखालील पाण्याची पातळीत वाढ करण्यासाठीच्या उपाययोजना राबविल्या तर कमी जमीन व्यापणारे आणि कमी खर्चात अधिक पानी देणाऱ्या योजनांचा अधिक फयदा होईल आणि धरणाला आणि विस्थापानाला नवीन आणि योग्य पर्याय मिळेल.

हे सर्व करणार्‍या पाणी-पंचायती आहेत का? गावकर्‍यांना तांत्रिक आधार देण्यासाठी संस्था असतील तर उत्तम. वाचक काय करू शकतील याबद्दलही माहिती द्यावी.

ऋषिकेश's picture

15 Jul 2009 - 2:21 pm | ऋषिकेश

वरील प्रतिसादकांशी सहमत. अजून नक्की लिहा..

अधिक माहिती द्यावी.. त्याच बरोबर दुसर्‍याबाजूवर म्हणजे या धरणाची योजना का आखली आहे? या धरणातून विद्युतनिर्मिती होणार आहे का? तिथे अजून काहि इतर सुविधांची योजना आहे का जसे पर्यटन क्षेत्र बनविणे वगैरे बद्दल लिहावे.

दोन्ही बाजू निरपेक्षपणे समोर याव्यात असे वाटते

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

नीधप's picture

15 Jul 2009 - 4:06 pm | नीधप

अतिशय योग्य विश्लेषण.
पण हे केवळ याच धरणाच्या बाबतीत आहे का?
अनेक धरणं अश्याच घिसाडघाईने आणि इगो प्रॉब्लेम म्हणून केली गेलीयेत/ जातायत राजकारण्यांकडून.

काही फॅक्टस..
देशातली ५०% धरणे महाराष्ट्रात आहेत पण पाणीपुरवठ्यामधे आपण अजूनही मागास आहोत.

कैक गावे देशोधडीला लावून दोडामार्ग येथे जे तिलारी धरण झाले. त्यात महाराष्ट्राच्या जनतेला चिंचोकेच मिळाले. त्या धरणाचं पाणी मिळतंय सगळं गोवा राज्याला.

कुठल्याही विकासकामामुळे विस्थापित झालेली माणसं कधीच आनंदी दिसत नाहीत. सतत भितीच्या, असुरक्षिततेच्या छायेत वावरत असताना जाणवतात.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home