मगाशी एका पुस्तकाची माहीती टाकली त्या धाग्यावर आणि माझी एक जुनी कविता आठवली. माझ्या ब्लॉगवर आहे. ती परत इथे डकवतेय.
चळ लागल्या झुळझुळ रेषा
त्यावरून नजर फिरवताना
मी चित्रमित्राला विचारलं
'सांग की कुठून आणल्यास ह्या वाटा
एकातएक मिसळणार्या
आणि एकातून एक फुटणार्या?
सांग ना कुठून आणलास
लख्ख पिवळा रंग
आणि पिवळट पाचोळा?'
उत्तरादाखल तो स्वचित्रातून
केवळ रोखून बघत राह्यला.
आणि चित्रागणिक अजूनच
विस्कटत, उसवत, पेटत गेला.
त्याचे लाल केस भुरूभुरू जळत होते
नजरेमधे ठिणग्या होत्या
आणि उजव्या बाजूला कानाच्या जागी जखम होती.
मग मला वाटत राह्यलं
आपल्याला त्याच्या वाटा कळल्यात,
पिवळट जाणीवांचा उगम हातीच आलाय..
आता त्याचं स्वचित्र
खदाखदा हसलं
पिवळा जांभळ्यात, जांभळा निळ्यात, निळा हिरव्यात
हिरवा परत पिवळ्यात उडी मारून गेला
रेषा खुळ्यासारख्या भिंगोरल्या
....
....
मी अजून भिंगोर्याच खेळतेय!
--- नीरजा पटवर्धन
प्रतिक्रिया
8 Jul 2009 - 8:28 pm | नीधप
.
8 Jul 2009 - 8:31 pm | लिखाळ
वा वा .. मस्त आहे :)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/02/Vincent_Van_Gogh_0020.jpg/769px-)
गॉग साहेब सुद्धा खुश होतील कविता वाचून.
आपल्या कवितेमध्ये गॉगचे स्वचित्र जरूर टाका.
-- (गव्हाच्या शेताचा चाहता)लिखाळ.
9 Jul 2009 - 2:20 am | पक्या
थोडी कळली , थोडी नाही.
9 Jul 2009 - 8:37 am | आनंदयात्री
मस्त कविता. वेगळीच आहे, आवडली.
9 Jul 2009 - 9:48 am | यशोधरा
:)
9 Jul 2009 - 10:25 am | सहज
मॉडर्न आर्ट - कविता फॉर्म मधे... फ्युजन... जुगलबंदी वाटली.
आवडली की नावडली सांगता येत नाही. [चित्राशिवाय स्वतंत्र कविता मला तरी झेपत नाही आहे.]
मी अजून भिंगोर्याच खेळतेय!
हे मात्र विशेष आवडले.
9 Jul 2009 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहजराव, म्हणतात तसे मलाही 'मी अजून भिंगोर्याच खेळतेय' हे आवडले.
पण, भिंगोर्यातून रंग उकलतात आणि त्या रंगांच्या वेगवेगळ्या जाणिवा..असा काही अर्थ असेल का ? काही वेगळेच आहे ?
-दिलीप बिरुटे
9 Jul 2009 - 11:19 am | नीधप
बिरूटे साहेब,
मी खरंच भिंगोर्या खेळतेय त्यामुळे ह्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत नाही पोचले मी अजून. :)
सहज,
चित्र आहे डकवलेलं. ते दिसत नाहीये का?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
11 Jul 2009 - 8:22 am | क्रान्ति
आवडली. दोन्ही चित्रं आणि कविता इतकी एकरूप वाटताहेत की आधी चित्रं की आधी कविता असा प्रश्न पडतोय!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
11 Jul 2009 - 9:03 am | भाग्यश्री
तू ही मायबोलीवर टाकली होतीस, तेव्हा मी बहुधा मन लावून वाचली नसावी..
आत्ता जरा नीट सावकाश वाचली, आणि फार आवडली..
भिंगोर्या हा शब्द तर अगदी प-र-फे-क्ट! व्हॅन गॉगच्या टोपीच्या वर पाहीले की ते रंग खरंच भिंगोर्या खेळतायत असं वाटलं, आपणही नाचू लागतो मनातल्या मनात! जाम आवडलं!
सहज म्हणत आहेत तसं जर हे चित्र नसते तर मात्र कविता दुर्बोध झाली असती..
बाकी तो कान कापून देणारा का काहीतरी तो हाच चित्रकार ना? आय मिन तोच उल्लेख आहे ना कवितेत?
http://www.bhagyashree.co.cc/
11 Jul 2009 - 9:21 am | मिसळभोक्ता
सॉरी फॉर द बबल-बर्स्टिंग, पण भिंगोर्या म्हणजे काय ? त्या खुळ्या झाल्या म्हणजे काय ? विन्सेंट गॉचा येथे संबंध काय ?
पण,
सांग ना कुठून आणलास
लख्ख पिवळा रंग
आणि पिवळट पाचोळा?'
अनेकदा हाच प्रश्न आम्हालाही पडतो,
रस्त्याच्या बाजूने,
जाताना, कडेवरली शेवाळे,
बघताना,
आयर्न कमी झाले का ?
अन्यथा लख्ख पिवळ्याचे,
ब्राऊन झाले असते.
-- मिसळभोक्ता
12 Jul 2009 - 8:48 am | नीधप
>>पण भिंगोर्या म्हणजे काय ? त्या खुळ्या झाल्या म्हणजे काय ? <<
आपापल्या अनुभवाची गोष्ट आहे. गॉगची चित्रे पहाताना मला असं वाटलं इतकंच.
>>अनेकदा हाच प्रश्न आम्हालाही पडतो,
रस्त्याच्या बाजूने,
जाताना, कडेवरली शेवाळे,
बघताना,
आयर्न कमी झाले का ?
अन्यथा लख्ख पिवळ्याचे,
ब्राऊन झाले असते.<<
ही पण आपापल्या अनुभवाची गोष्ट आहे. ज्यात तुम्ही रमता त्या गोष्टींमधे तुम्हाला काव्य दिसतं. मला गॉगच्या चित्रांवरून कविता सुचली तुम्हाला रस्त्याच्या कडेच्या शेवाळ्याशी निगडीत.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
12 Jul 2009 - 9:32 am | विनायक प्रभू
मि.भो भौ,
तुम्ही ना पण कै च्या कै प्रश्न विचारता. वरला प्रतिसाद वाचायचा १+ म्हणायचे आणि गप्प बसायचे.
कविता कशाशी खातात तुम्हाला कळते तरी का?
मला पण नाही कळत.
किती सुंदर कविता.
मस्त.
वेडपट वि.प्र.
12 Jul 2009 - 9:33 pm | दशानन
+१
वेडझवा (रा.ज.)
रा = राज
ज = जैन
____
बाकी राजे
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
12 Jul 2009 - 11:51 pm | अवलिया
सहमत
--अवलिया
=================
परा सनातनी असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण.
हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.
11 Jul 2009 - 10:53 am | ऋषिकेश
कविता (आणि चित्रं) आवडली म्हणता येणार नाहि.. मात्र नावडली असेही नाहि.
खरे तर कळली असेच म्हणता येणार नाहि :)
वेगळा प्रयोग मात्र आवडला
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
12 Jul 2009 - 8:48 am | नीधप
सगळ्यांचे आभार.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
14 Jul 2009 - 3:42 am | धनंजय
चित्रकविता आवडली.
**(पण "पिवळा-पिवळट"पुनरुक्ती तितकी रुचली नाही. स्वचित्रातली टोपी खूपच जर्द पिवळी आहे, म्हणून ही पुनरुक्ती स्वतःला पटवून घेत आहे.)**