आधार: प्राजूताईंची कविता (आणि फालतू सास-बहू टिव्ही सिरीयल्स)
(पस्तूत विडंबनात मला प्राजूताईंच्या कवितेची माझी भ्रष्ट नक्कल व त्यातील आईसारख्या (तसेच सासुबाईंसारख्यासुद्धा) व्यक्तींची टिंगल करण्याचा अजीबात हेतू नव्हता. प्रत्येक आई आदरणीय आहे, वंदनीय आहे. माझा कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही.
मी केलेले विडंबन हि फक्त कल्पना समजावी.)
माझं तुमच्यासोबत असणं..
तुमच्या (खोट्या)कौतुकात माझं बुडुन जाणं..
तुमच्या आवडीनिवडी
सांभाळण्यासाठी मी
माझ्या पार्लरच्या कामांना बाजूला ठेवणं..
संपूर्ण आयुष्यभर चालणारा हा कौतुकाचा सोहळा..!!
पण... काहितरी राहून गेलंय..
माझं निवांत टिव्ही पाहणं..
एकमेकींच्याशिवाय !
केवळ अन केवळ साध बोलणं....
असं झालंच नाही हो !
(वेगवेगळे)हिंडलो, (साडीसाठी)फिरलो.. (खोटे खोटे चांगले वागणे)खेळलो..
पण..
फक्त आणि फक्त आपण दोघी
कितीवेळ एकमेकीसोबत होतो??
आता तूम्ही (धाकट्या दिराकडे) जाणार...
तुमच जाणं तसं वर्षभर लांबलं..
.... अन शेवटी
हो नाही करता करता तूम्ही गेलातही..
तूम्ही इथे आल्यावर.. एकट हिंडण्या फिरण्यासोबतच
तुमच्याशी खूप खूप भांडण करायच... ठरवलं होतं मी.
प्रत्येक वेळी वेगवेगळे हिंडलो, फिरलो..
प्रत्येक वेळी..."तूच कर ना चहा नाष्टा माझ्यासाठी.." असा हुकूम केला..
कित्तीतरी पदार्थ खाल्ले माझ्या हातचे..!!
प्रेमळ (दिखावू) भांडणही झालं..
एकमेकींशी गप्पा सुद्धा मारल्या.. ठरवल्याप्रमाणे!!!
.......... त्या पुरेश्या नव्हत्या का हो??
मन का नाही भरलं कधीच?
तुमच्या इथे असण्याची सवय .. जाईल लवकर !
घरातला प्रत्येक कोपरा... ..
मला तुमच्या वास्तव्याची जाणीव करून देतो आहे..
आणि पुन्हा पुन्हा असंच का वाटतं आहे की..
आपण दोघी मनसोक्त(?) भेटलो..
आणि मनसोक्त(?) भांडलोही..!!!
मनसोक्त(?) ची व्याख्या नक्की काय असते??
प्रतिक्रिया
8 Jul 2009 - 8:40 am | विकास
=))
कविता आवडली. अर्थात ही मूळ कवितेची थट्टा नाही हे जरी समजू शकले असते तरी तसे स्पष्ट केल्याने हे निखळ वाटले...
बाकी सास-बहूच्या मालीका (नशिबाने) विशेष पाहीलेल्या नाहीत. पण:
>>प्रत्येक वेळी..."तूच कर ना चहा नाष्टा माझ्यासाठी.." असा हुकूम केला..<<
मधे
असे ही लिहू शकला असता ;)
आता अशीच कविता एखादा नवरा आपल्या सासू/सासर्यांना उद्देशून लिहू लागला तर काय लिहील असा प्रश्न पडला आहे. :?
8 Jul 2009 - 1:25 pm | पक्या
:) मस्त कविता/विडंबन
8 Jul 2009 - 3:46 pm | Dhananjay Borgaonkar
आयला लईईईई भारी आहे विडंबन...
धाकटे दीर वगैरे ओळ टाकुन दंगा केलात भाऊ.......
चालुद्या...
प्राजु ताई पण मला हे पण म्ह्णणायला हव की तुमची मुळ कविता अतिशय सुंदर आहे...
8 Jul 2009 - 5:19 pm | चतुरंग
लगे रहो पाषाणभेद! ;)
(जावई)चतुरंग
8 Jul 2009 - 5:33 pm | परिकथेतील राजकुमार
बर केलय विडंबन पण...
मला तुझ्या वास्तव्याची जाणीव करून देतो आहे..
मला तुमच्या वास्तव्याची जाणीव करून देतो आहे..
ह्या एकाखाली एक आलेल्या ओळी रसभंग करुन जातात.
©º°¨¨°º© परादास फुटाणे ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
8 Jul 2009 - 6:22 pm | विकास
>>>ह्या एकाखाली एक आलेल्या ओळी रसभंग करुन जातात.<<
कदाचीत भावना एकदम उचंबळून आल्याने जरा अडखळायला झाले असे "कवी"ला सुचवायचे असावे ;)
10 Jul 2009 - 6:16 am | पाषाणभेद
पराभौ आन ईकासदादा, काय नाय भांग जरा लागली व्हती, त्यामुळ कापी पेस्ट ला हात थरथरत व्हते. "कवी" जरा वीक व्हता.
आता उतारा केलाय. गडबड नाय.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
8 Jul 2009 - 7:23 pm | सूहास (not verified)
कविता लगीन झाल्यावरच समजल...पर ईड्॑बन लई भारी...
=))
वास्तव्याची?
कौलारु घराची म्हणायचे होते का रे =))
सुहास