आठवणी.....
सरी पावसाच्या नभी दाटलेल्या
ऊरी आठवांच्या लडी साठलेल्या !
तशा मावल्या ना तुझ्या आवडी ही
सदाच्याच अमुच्या झोळ्या.....फाटलेल्या !
कफल्लक कवीच्या न वाट्यास नट्टा,
तरी शृंगार भरल्या.....गझल थाटलेल्या !
अवचित् कधी शेपटा त्या वेणीचा
जरा स्पर्शताही .....मुठी.. चाटलेल्या !
सखे राहिले ना वसंतास भान
बघुनी तुला त्या.....यौवनी घाटलेल्या !
अता एकदा हा मोगरा माळू दे ना
तुझ्या मोकळ्या केसांत्.....काटलेल्या !
करपून गेला बहर बघ कधीचा
अता कृष्ण म्लान .....गौळणी बाटलेल्या !
प्रतिक्रिया
3 Jul 2009 - 1:33 pm | दत्ता काळे
तशा मावल्या ना तुझ्या आवडी ही
सदाच्याच अमुच्या झोळ्या.....फाटलेल्या !
कफल्लक कवीच्या न वाट्यास नट्टा,
तरी शृंगार भरल्या.....गझल थाटलेल्या !
- हि दोन कडवी तर केवळ अप्रतिम, पण. .
शेवटची दोन कडवी जरा विसंगत वाटतात.
3 Jul 2009 - 2:17 pm | उदय सप्रे
काळे साहेब,
तुमच्या प्रतिक्रियांबद्धल आभार्.काही स्पष्टीकरण :
आधीच्या कडव्यात तुम्ही वाचले असेल तर.....: एखाद्या मुलीच्या वेणीचा शेपटा मुलाच्या मुठीवर आपटतो याचाच अर्थ तिचे केस इतके लांब होते.
आता ती "मॉड" या सदरात मोडली आहे - कारण तिला सर्व काही श्रीमंती हवे होते , त्यामुळे केस काटलेल्या म्हणजे "बॉब" किंवा "बॉय" कट केलेले केस्.....त्याला अजूनही तिच्याविषयी प्रेम आहे , त्याच आठवणीत तो गुरफटला आहे ! म्हणून तो म्हणतो , मोगरा माळू दे , मी तुला आहेस त्या स्थितीत स्वीकारेन !
यानंतर शेवटचे कडवे : तो अजूनही सुंदर / तरूण आहे , पण तिच्या आठवणीत अविवाहीत आहे , भोवती खूप मुली येतात पण त्या सगळ्याच "बाटलेल्या".....
अजून काही शंका मनात असतील तर अवश्य विचारा.त्या निमित्ताने गझल चा कार्यकारण भाव लिहिता येतो.
आपल्या कौतुकाबद्धल पुनश्च आभार.
3 Jul 2009 - 3:08 pm | दत्ता काळे
शेवटचं कडवं मला वाचताना
उद्वेगाने किंवा हताश झालेला तो , सगळ्याच मुलींच्या बाबतीत ( त्यात तीसुध्दा आली ) म्हणतो आहे असे वाटले.
पण आता लक्षात आले.