कशुमा लेक नंतर आम्ही निघालो सोल्वॅंगला ! तसं अगदीच जवळ.. १४ माईल्स.. जाताना रस्त्यात सुंदर हिरवी-पोपटी कुरणं लागली.. आणि सोल्वॅंगच्या डॅनिश शब्दाचा अर्थ कळला! Sunny Fields ! From Cachuma Lake, Solvang 1
लगेचच कोपेनहेगन ड्राईव्ह आला. आणि एक वेगळीच सिटी सामोरी आली ! From Cachuma Lake, Solvang 1
From Cachuma Lake, Solvang 1
१९११ साली काही डॅनिश शिक्षक मंडळी या गावात आली व त्यांनी शिक्षणसंस्था स्थापन केली. (ती काही वर्षांपूर्वीपर्यंत चालू होती.. तिथे १९१४ साली Atterdag College सुरू झाले, जे आता अस्तित्वात नाही.. ) या डॅनिश मंडळींबरोबर त्यांची संस्कृतीही आलीच.. ती त्यांनी जोपासली.. १९३६ साली , सोल्वॅंगच्या २५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, डॅनिश डेज या त्यांच्या सणा दरम्यान भावी डॅनिश राजा-राणी भेट देऊन गेले.. पण त्याला खरे व्यावसायिक रूप आले जेव्हा Saturday Evening Postने त्याच्यावर एक पोस्ट लिहीले.. त्यानंतर प्रवासी आले, तो भाग अजुन जास्त डॅनिश बनवला गेला, इमारतींना डॅनिश मुलामा दिला.. डॅनिश व्यापारी येऊन आपले चीझ, वाईन्स, कॉफी विकू लागले.. अप्रतिम बेकरीज सुरू झाल्या... व सोल्वॅंग प्रसिद्ध झाले !
आम्ही मुख्य रस्त्याला आलो आणि समोरच ती प्रसिद्ध विंड-मिल (पवनचक्की) दिसली!
From Cachuma Lake, Solvang 1
नंतर कारवास करून (म्हणजे कार पार्क करून) गावातल्या वेगवेगळ्या दुकानांमधून फिरू लागलो.. डॉल हाऊस, चॉकलेट फॅक्टरी(त्यात मिळणारे फुकट आणि स्वर्गीय चॉकलेट अर्थातच आम्ही खाल्ले!) तसेच वेगवेगळी Souvenir Shops म्हणजे आठवण म्हणून घ्यायच्या गोष्टींच्या दुकानात भटकलो.. एकंदरीत इथे कपबश्यांचे फारच महत्व दिसते.. पवनचक्की आहेच.. त्याशिवाय वाईनशी संबंधित गोष्टी - म्हणजे वाईन ठेवण्याचे स्टॅंड्स - फार मस्त आणि क्युट स्टॅंड्स दिसले.. लोळणारा हत्ती सोंडेने वाईनची बाटली धरतोय, किंवा एखादे (आधीच मर्कट त्यात दारू प्यायला फेम) माकड!
From Cachuma Lake, Solvang 1
मूळ युरोपिअन प्रांतातून जन्मलेला क्लॉगींग (Clogging) हा नृत्यप्रकार म्हणजे सद्ध्याच्या टॅप डान्सिंगचा मूळ नृत्याविष्कार.. यात लाकडी क्लॉग्स घालून ,ते जमिनीवर आपटत - तालबद्ध आवाज करत नाचतात.. त्यामुळे हे असे वेगवेगळे रंगाचे - आकाराचे क्लॉग्स इथे खूप बघायला मिळतात! त्यातीलच एक जायंट रेड क्लॉग.. हा इथे दिवसभर एका दुकानासमोर ठेवलेला असतो.. त्यात बसून वगैरे लोकं फोटो काढतात!
(फोटो : आंतरजालावरून )
आपले आप्पे असतात तसा यांचा डॅनिश अवतारही इथे मिळतो.. AEbleskiver.. अजुन खायचा योग आला नाही, मात्र हे चवीला अगदी वॅफल्ससारखे लागते असे नेटवर कळ्ले.. बनवण्याचे पात्र अगदी आपल्या आप्पे पात्रा सारखे. चांगले बीडाचे आप्पेपात्र इथे २०एक डॉलर्सला मिळू शकेल..
इथे परिकथा लिहीणार्या हॅन्स ऍंडरसनचे म्युझिअम आहे, एक कला व इतिहासावरचे म्युझिअम आहे तसेच Copenhagen इथे असणार्या लिटल मर्मेड या पुतळ्याची प्रतिकृती, पवनचक्की तसेच डॅनिश लोकं ज्याला लकी, भाग्यदायी समजतात ते Storks बर्याच इमारतींवर दिसून येतात..
From Cachuma Lake, Solvang 1
बर्याच कलाकारांच्या चित्रांच्या गॅलरीज, ऑथेंटीक युरोप मधून आलेल्या काही गोष्टी इत्यादी दुकानांतून फिरताना दिसतात..
तिथे हे पण दिसले !
From Cachuma Lake, Solvang 1
१०१ $ ला ठेवली होती ही मूर्ती!
आणि ही पवनचक्की!
From Cachuma Lake, Solvang 1
अशी ही सफर.. इथेदेखील अजुन बरंच काही करता येईल.. घोड्यांवरून रांच मधून फिरणे तसेच तो स्पेशल डॅनिश क्लॉगींग डान्स अशा बर्याच गोष्टी हुकल्या! तरीही खूप मजा आली! अमेरिकेतल्या तीच ती सेम स्ट्रक्चर असलेल्या जागांमधून अचानक युरोप मधे फिरल्यासारखे वाटले!
प्रतिक्रिया
29 Jun 2009 - 11:08 am | पर्नल नेने मराठे
सुरेख!!!
चुचु
29 Jun 2009 - 1:19 pm | सहज
अमेरिकेत युरोपच की..
छान आहेत फोटो, वर्णन.
29 Jun 2009 - 2:33 pm | शाल्मली
असंच म्हणते :)
--शाल्मली.
29 Jun 2009 - 4:43 pm | रेवती
छान सफर!
गणपतीची मूर्ती मस्त!
रेवती
29 Jun 2009 - 5:54 pm | अनामिक
गणपतीची मुर्ती खुपच सुंदर आहे!
-अनामिक
30 Jun 2009 - 12:59 am | स्वाती२
भाग्यश्री, छान लेख आणि फोटो.
>>अमेरिकेत युरोपच की..
असेच म्हणते.
30 Jun 2009 - 1:55 am | नंदन
सचित्र वर्णन आवडले. क्लॉग डान्स विशिष्ट दिवशी/वेळेलाच असतो का?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
30 Jun 2009 - 2:18 am | भाग्यश्री
नंदन, बहुतेक असं काही नसावे.. परंतू आम्ही रवीवारी संध्याकाळी तिथे पोचल्याने बरीचशी दुकानं व क्लॉग डान्ससारखी अॅट्रॅक्शन्स बंद झाली होती..
पण सप्टेंबरमधे डॅनिश डेज फेस्टीवल असतो.. तेव्हा अजुन छान होत असेल हा परिसर..
http://www.bhagyashree.co.cc/
30 Jun 2009 - 3:45 am | Nile
मस्त! पवनचक्की दिसली पण डॉन क्वीक्झोट दिसत नाही कुठं? ;)
30 Jun 2009 - 7:04 am | अवलिया
वा! छान लेख आणि फोटो !!
--अवलिया
30 Jun 2009 - 9:14 am | विसोबा खेचर
मस्त चित्र, छान लेख..!
आपला,
(भाग्यश्रीचा फ्यॅन) तात्या.