ठाव ना तुझा तुला अजूनही
काय शोधसी मला अजूनही?
जागल्या कळ्या; सुकून चालल्या,
गंध मात्र राहिला अजूनही
ओळखू कसा तुझा स्वभाव रे?
जाणले न मी मला अजूनही
लांब जात सावल्याहि पांगल्या
तू दिवा न लावला अजूनही
सावळा न राधिका, न गोपिका
एकटा रिता झुला अजूनही
मीच जिंकले तरी हरायचा
डाव का न संपला अजूनही?
तोच नांदतो म्हणे चराचरी
का मला न भेटला अजूनही?
प्रतिक्रिया
28 Jun 2009 - 3:35 pm | श्रावण मोडक
३, ४, ६, ७ उत्तम.
28 Jun 2009 - 10:39 pm | ऋषिकेश
१,२,३ आवडले
इतरांमधे कल्पना छान मात्र एकदोन मात्रा कमीजास्त (खरंतर एखादी जास्तच) झाल्याने तालात चुकतंय असं वाटल्याने मजा आली नाहि
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
29 Jun 2009 - 12:34 am | विसोबा खेचर
तोच नांदतो म्हणे चराचरी
का मला न भेटला अजूनही?
क्या बात है!
तात्या.