राम राम !

लिखाळ's picture
लिखाळ in जनातलं, मनातलं
15 Feb 2008 - 10:43 pm

नमस्कार मंडळी !
आज दोन महिन्यांनंतर पुन्हा रुजू होत आहे.
तसे ही आम्ही प्रतिसादापुरतेच जास्त असल्याने आपण अभिजात साहित्याला मुकला आहात असे मुळीच नाही. ( स्वतःला, आम्ही असे म्हणवून घ्यायची संधी आम्हाला इतरत्र कुठे मिळत नसल्याने संधीचा भरपूर उपयोग आम्ही इथे करत असतो. हे सांगणे न लगे :)

तर काय ! आज इथे येवून पुन्हा लिहायला सुरुवात केल्यावर आनंद झाला आहे. पुन्हा सर्वांच्या गाठी-भेटी होतील. खरडवह्यांतून महत्वाच्या माहितीची आदानप्रदान होईल असा विचार करता मन कसे प्रफुल्लीत झाले आहे. (आम्ही आताशा ललित लेख फारसे वाचत नसूनही पूर्व स्मृती जाग्या असल्याने डबक्यावर शेवाळ्या सारख्या साठलेल्या* शब्दातील काही शब्द आम्ही सुद्धा खिशात बाळगून असतो ! ) [*पुल सखाराम गटणे]

आमचा इथला वावर मुख्यत्वे (कोणी विचारले नसताना सुद्धा हे सांगणे म्हणजे आगाउपणा. पण आपण विचारलेच नाही तर मग कळफलक बडवायची संधी जाणार म्हणून हा प्रपंच :) हा... तर आमचा वावर मुख्यत्वे करमणूक, गप्पा-टप्पा यासाठीच असतो. अहो ! मराठी भाषेच्या अभिवृद्धी साठी वगैरे आम्ही येथे वावरतो असे म्हणणे, म्हणजे सकाळी पाण्यासाठी दोन तास रांगेत उभे राहून शिळोप्याच्या गप्पा मारल्यावर, जागतिक पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सभा आयोजित केली होती असे म्हणण्यापैकी आहे. तर काय की मौजमजा, विरंगुळा ही सदरे आमच्या आवडीची.

तर मंडळी ! आपण सर्व कशी आहात?
आपलाच,
-- लिखाळ.

वावरविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

16 Feb 2008 - 12:13 am | स्वाती दिनेश

वेलकम ब्याक लिखाळबाबू,
स्वाती

लिखाळ's picture

16 Feb 2008 - 6:54 pm | लिखाळ

धन्यवाद !
--लिखाळ.
मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

विसोबा खेचर's picture

16 Feb 2008 - 1:32 am | विसोबा खेचर

लिखाळराव,

मिपावार मनापासून स्वागत आहे...!

तर आमचा वावर मुख्यत्वे करमणूक, गप्पा-टप्पा यासाठीच असतो. अहो ! मराठी भाषेच्या अभिवृद्धी साठी वगैरे आम्ही येथे वावरतो असे म्हणणे, म्हणजे सकाळी पाण्यासाठी दोन तास रांगेत उभे राहून शिळोप्याच्या गप्पा मारल्यावर, जागतिक पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सभा आयोजित केली होती असे म्हणण्यापैकी आहे.

हम्म! मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी वगैरे काही लिहायचं- वाचायचं असेल तर 'तिथे जा! तिथे आहेत एकापेक्षा एक सरस आणि सकस लेखक! :)

मराठी सारस्वताच्या आंगण्यातली सगळी तुळशी वृंदावनच म्हणा ना तिच्यायला! :))

बाकी, मनमोकळा टाईमपास करायचा असेल, चार घटका मजेत घालवायच्या असतील, जिन्दादिलपणा, तरुणाई अनुभवायची असेल तर मिसळपाववर तुमचंही मनापासून स्वागत बरं का लिखाळराव!

अर्थात, इथेही तुम्हाला काही उत्तम, सकस आणि चांगलंचुंगलं वाचायला मिळेल याची खात्री बाळगा!

नाही, एकंदरीत तुमच्या प्रतिसादातून मिपावर फक्त आणि फक्त टाईमपासच चालतो असा सूर दिसला म्हणून म्हटलं! :)

असो.. मिपावर पुनश्च एकदा मन:पूर्वक स्वागत...

आपलाच,
तात्या.

लिखाळ's picture

16 Feb 2008 - 7:02 pm | लिखाळ

बाकी, मनमोकळा टाईमपास करायचा असेल, चार घटका मजेत घालवायच्या असतील, जिन्दादिलपणा, तरुणाई अनुभवायची असेल तर मिसळपाववर तुमचंही मनापासून स्वागत बरं का लिखाळराव!
आभार तात्या ..असाच लोभ असू द्या !

अर्थात, इथेही तुम्हाला काही उत्तम, सकस आणि चांगलंचुंगलं वाचायला मिळेल याची खात्री बाळगा!
नाही, एकंदरीत तुमच्या प्रतिसादातून मिपावर फक्त आणि फक्त टाईमपासच चालतो असा सूर दिसला म्हणून म्हटलं! :)

अहो इथेही सकस आणि उत्तम साहित्य असतेच. मला माहितच आहे की. माझ्या लिखाणातून असा वेगळा सूर उमटला असेल तर क्षमा करा.
(मी खरे तर माझ्या लेखनावर-वावरावर तो विनोद-टिप्पणी केली होती. तिथे ह.घ्या. असे लिहायचे राहिले खरे. असो.)

ठीक .. आता भेटूच सरखे..

आपला,
--लिखाळ.

तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)
मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची द