व्हाय मेन डोन्ट लिसन अ‍ॅण्ड विमेन कान्ट रीड मॅप्स

शितल's picture
शितल in जनातलं, मनातलं
25 Jun 2009 - 3:29 pm

अ‍ॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे जगातील अनेक भाषेत अनुवादन झाले आहे. मराठीत त्याचे अनुवादन अ‍ॅड.शुभदा विव्दांस यांनी केले आहे.

पुस्तकातील माहिती अचूक व परिपुर्ण असावी यासाठी अ‍ॅलन आणि बार्बरा पीस दोघे ही भरपूर मेहनत घेतात. त्यासाठी ते देशोदेशीच्या एक्स्पर्टसना भेटतात, लोकांच्या मुलाखती घेतात, सेमिनार्स घडवुन आणतात. या पुस्तक निर्मीतीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत पुस्तक वाचताना वाचकांच्या लक्षात येते.

या पुस्तकात अनेक स्त्रीयांच्या मनात असलेले पुरूषां बद्दल प्रश्न जसे, पुरूष असे का वागतात ? मनातील गोष्टी बोलुन का दाखवत नाहीत? किंवा पुरूषाला स्त्रीचे मन कधीच का समजत नाही? स्त्रींया इतक्या का बोलतात ? याची उत्तरे आपल्याला सापडतील.

"स्त्री व पुरूष यांच्यातील नातेसंबंध बिघडतात
ह्यांचे कारण म्हणजे पुरूषांना हे समजत नाही की बायका त्यांच्या सारख्या का नाहीत;
आणि बायकांना वाटते की आपण जसे करतो तसे पुरूष का करत नाहीत.
ह्यांचे कारण म्हणजे, स्त्री व पुरूष वेगळे आहेत.
ते समान पेशीपासुन बनलेले आहेत,
एवढी एकच गोष्ट त्यांच्यात समान आहे.
पण हे दोघे वेगवेगळ्या जगात रमतात.
त्यांची मूल्ये वेगवेगळी असतात.
पण फारच थोडे पुरूष हे मान्य करतात.
एक सामायिक गोष्ट असी की स्त्री व पुरूष कुठल्याही धर्माचे, पथांचे, वर्गाचे असले तरी त्यांचे दृष्टीकोन व विश्वास सारखेच असतात."

हा परिच्छेद वाचल्यावर पुस्तक वाचण्याचा मोह आवरत नाही हे खरे.
"मेहता पब्लिशिंग हाऊस" प्रकाशित या पुस्तकाची किमंत रू.१२०/- आहे आणि पान संख्या -१२१ आहे.

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

सूहास's picture

25 Jun 2009 - 3:51 pm | सूहास (not verified)

आपण जरा ऊशीर केला वाचायला..आमच २००१ मध्येच वाचुन झालय...भाषा॑तर नव्हे...
(झाले का ईथुनच मतभेद सुरु)

बाकी आम्हाला Men Are from Mars, Women Are from Venus" (१९९२-जॉन ग्रे)ह्या पुस्तकाची आठवण झाली.त्याबद्दल धन्स्...आजच एक कॉपी आणतो..

सुहास
आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे,
काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर,
उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे,
कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे,
मधे अडल्यास इश्वरास विनवायचे..
सौजन्य : जागुताई..

अवलिया's picture

25 Jun 2009 - 4:04 pm | अवलिया

वा! मस्त पुस्तक परिचय !!

--अवलिया

विनायक प्रभू's picture

25 Jun 2009 - 4:08 pm | विनायक प्रभू

तर बायको सांगते तसे सर्व्व करतो बॉ.
तरी सुद्धा बोलणी खावीच लागतात.
हे पुस्तक उपयोगी पडेल काय?

धमाल मुलगा's picture

25 Jun 2009 - 4:09 pm | धमाल मुलगा

वाचायला पाहिजे. आम्हाला तर जळ्ळं आमची बायको काय म्हणते तेच कळत नाही. वर बायकोलाही आपला अजागळ नवरा असा का कुठंतरी तंद्री लाऊन बसतो हे कळत नाही.
आता हे पुस्तक घेतो आणि सत्यनारायणाची कथा ऐकायला बसतात तसं जोडीनं वाचायला बसतो :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

दशानन's picture

25 Jun 2009 - 4:17 pm | दशानन

हॅ हॅ हॅ !!!!

****

पुस्तक वाचायलाच पाहीजे.

थोडेसं नवीन !

ब्रिटिश टिंग्या's picture

25 Jun 2009 - 4:23 pm | ब्रिटिश टिंग्या

राजे तुम्हाला या पुस्तकाचा काही एक उपयोग नाही!

हॅ हॅ हॅ!

अवलिया's picture

25 Jun 2009 - 4:26 pm | अवलिया

तुला वाचुनही काही फायदा नाही !

हॅ हॅ हॅ

--अवलिया

ब्रिटिश टिंग्या's picture

25 Jun 2009 - 4:29 pm | ब्रिटिश टिंग्या

सांगण्यास थोडासा (म्हणजे साडेचार वर्षे) उशीर केलात!

असो, अवलिया, तुम्हारा चुक्याच!

हॅ हॅ हॅ!

शितल's picture

25 Jun 2009 - 8:09 pm | शितल

>>>तुला वाचुनही काही फायदा नाही !
=))
खरे आहे नाना तुमचे, त्याला हे पुस्तक वाचायला न सांगता त्याच्या होणार्‍या तिला हे वाचायला दिले पाहिजे निदान शेजा-यांनी तरी शांतता. :)

यशोधरा's picture

25 Jun 2009 - 4:29 pm | यशोधरा

तूच वाच धम्या, तुझ्या बायकोला काही गरज नाय्ये! गरीब बिचारी बायको मिळाली आहे तुला! :)

दशानन's picture

25 Jun 2009 - 4:33 pm | दशानन

हेच म्हणतो आहे ;)

थोडेसं नवीन !

विनायक प्रभू's picture

25 Jun 2009 - 4:32 pm | विनायक प्रभू

गैरसमज यशोधरा तै.

धमाल मुलगा's picture

25 Jun 2009 - 5:04 pm | धमाल मुलगा

_/\_
प्रभुबाबा क्की...ज्जय!!!!!!!!!!!!!!!!

हा एकटाच माणूस भेटला माझं खरं दु:ख्खं ओळखणारा :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

सूहास's picture

25 Jun 2009 - 5:08 pm | सूहास (not verified)

<<<हा एकटाच माणूस भेटला माझं खरं दु:ख्खं ओळखणारा >>>
तरास करुन घेऊ नको...
बायका म्हणजे.....

सुहास

यशोधरा's picture

26 Jun 2009 - 1:54 pm | यशोधरा

>>हा एकटाच माणूस भेटला माझं खरं दु:ख्खं ओळखणारा

धम्या, उमांसा अशातली गत. आता उ कोण आणि मां कोण ते तुम्ही दोघे आपापसात ठरवा, म्हणजे तू आणि मास्तर. :P

अनामिक's picture

25 Jun 2009 - 5:54 pm | अनामिक

चांगला पुस्तक परिचय.
पुस्तकांच्या यादीत नुसती भर पडते आहे... पण पुस्तके काही वाचून होत नाहीत!

-अनामिक

Dhananjay Borgaonkar's picture

25 Jun 2009 - 6:31 pm | Dhananjay Borgaonkar

तुम्हि पुस्तक वाचा नाहीतर त्यावरचे सिनेमे बघा...
बायका हे न उलगडलेल कोडच आहे.

सोपा उपाय म्हणजे आपण जसा विचार करतो त्याच्या विरुध्द विचार करायचा म्हणजे बायको काय विचार करते हे कळत...
***आचार्य बाबा बर्वे.****

धमाल मुलगा's picture

25 Jun 2009 - 6:47 pm | धमाल मुलगा

अहो पण, समजा आपण विचार 'अ' करतोय, तर बायको त्याच्या उलट म्हणजे विचार 'ब' करणार असं म्हणताय ना? मग आपण विचार 'ब' केल्यावर त्याच्या उलट म्हणजे विचार 'अ' हा बायकोचा असणार ना?
म्हणजे आपण 'अ' मधून 'ब'मध्ये पाहतो तर 'ब'कडून 'अ' कडे जाऊ लागतो आणि 'अ'पर्यंत पोहोचल्यावर 'ब' कडे जाण्याची गरज आहे म्हणून .........

इच्चिभनं...काय होतंय काय मला हे?
च्छ्या: डोस्क्याचं पार भुस्काट झालं. जाऊद्या, एक कटींग चहा मारुन येतो! :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

Nile's picture

26 Jun 2009 - 8:30 am | Nile

हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही अब अब करत बसता अन त्या क चा विचार करत असतात. आता तुम्ही क कडे जाई पर्यंत बाराखडी होउन जाईल, जाउ द्या! ;)

संदीप चित्रे's picture

25 Jun 2009 - 7:06 pm | संदीप चित्रे

माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकाचा परिचय दिलास शितल.
माझ्याकडे मूळ इंग्लिश पुस्तक आहे.
ह्या पुस्तकाचं वैशिष्ठ्य म्हणजे -- स्त्री / पुरूष ह्यांच्यापैकी कुणीही उच्च / नीच नाहीयेत फक्त आपण हे मान्य करायला हवं की त्यांच्या मेंदूचं वायरिंग वेगळ्या पध्दतीचं आहे. (अर्थात अशा प्रकारची पुस्तकं हे 'अंतिम सत्य' नसतात पण ढोबळ मानाने मापदंड खरे ठरतात)
-------
ह्या पुस्तकातलं एकच उदाहरण देतो ज्याच्यामुळे पुस्तक न वाचलेल्यांची उत्सुकता अजून ताणली जाईल :)
"किती तरी घरांमधून असं दिसतं की बायको नवर्‍याला फ्रीजमधून एखादी वस्तू आणायला सांगते. नवरा फ्रीज उघडतो आणि दोन मिनिटांत बायकोला म्हणतो -- ती वस्तू सापडत नाहीये किंवा ती वस्तू इथे नाहीये ! बायको येते, फ्रीजमधे हात घालते आणि पटकन ती वस्तू काढते !" (प्रसंग ओळखीचा वाटतोय का? म्हणजे तपशील थोडे वेगळे असतील म्हणजे फ्रीजच्या ऐवजी कपाट वगैरे.)
तर, लेखकांनी ह्याचं दिलेलं कारण म्हणजे आदिमानवाच्या काळात पुरूष बाहेर शिकारीला जायचे आणि स्त्रिया गुहेत मुलांना सांभाळायच्या / एकूणच गुहा नीट सांभाळायच्या. हजारो वर्षे एकामागून एक गेली; जगण्याची पद्धत बदलली पण पुरूषांची 'लांबपर्यंत बघण्याची दृष्टी (टनेल व्हिजन) आणि बायकांची 'आसपासचे बघण्याची दृष्टी '(पेरिफेरल व्हिजन) विकसित होत राहिली. त्यामुळे बरेचदा असंही दिसतं की ज्याप्रमाणे पुरूषांना फ्रीजमधल्या, कपाटातल्या इ. वस्तू पटकन सापडत नाहीत त्याप्रमाणे स्त्रियांना रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करताना दूरवरचं पहायला अडचण वाटते.
-------------------
जाता जाता -- स्त्री मुक्ती किंवा स्त्री मुक्ती विरोध, सेक्शुअल डिस्क्रिमिनेशन वगैरे प्रकारांचा ह्या पुस्तकाचा संबंध नाही. पुस्तकाचं सूत्र असं आहे आपल्या क्वॉलिटीज एकमेकांपेक्षा भिन्न आहेत / असून शकतात हे स्त्री - पुरूष दोघांनीही मान्य केल्यास सुसंवाद वाढेल.
---------
अवांतर : अशा प्रकारची पुस्तकं वाचायला आवडत असतील तर ही पुस्तकंही वाचा --

  • Men are from Mars, Women are from Venus
  • I'm OK, You are OK
  • Don't say Yes when you want to say No
  • How to Behave So Your Chidren Will Too
  • (हे मी अजून वाचलं नाहीये पण मित्रांनी खूप प्रशंसा केलीय)

  • What to expect when you are expecting
    (थोडी वेगळी कॅटेगरी पण 'गोड बातमी'च्या कृतीआधीपासूनच नवरा - बायको दोघांनीही आवर्जून वाचावं, नऊ महिने आणि नंतरही वाचत राहवं असं पुस्तक !)
सुहास's picture

26 Jun 2009 - 12:04 am | सुहास

तुम्हांस "टनेल व्हिजन" ऐवजी "सेन्ट्रल व्हिजन" किंवा "डायरेक्ट व्हिजन" तर म्हणायचे नाही ना?

बाकी पुस्तक परिचय छानच आहे...

-- सुहास

संदीप चित्रे's picture

26 Jun 2009 - 1:24 am | संदीप चित्रे

पुस्तकात लिवलंय ते सांगितलं !

सुहास's picture

26 Jun 2009 - 1:39 am | सुहास

मग ठीक आहे! आणि आता थोडं थोडं लक्षात पण येतंय..

-- (थोडा गोंधळलेला) सुहास

क्रान्ति's picture

25 Jun 2009 - 7:18 pm | क्रान्ति

वाचण्यासारख्या इतक्या पुस्तकांचा छानसा परिचय करून दिल्याबद्दल शीतल आणि संदीप दोघांनाही धन्यवाद.
जगण्याची पद्धत बदलली पण पुरूषांची 'लांबपर्यंत बघण्याची दृष्टी (टनेल व्हिजन) आणि बायकांची 'आसपासचे बघण्याची दृष्टी '(पेरिफेरल व्हिजन) विकसित होत राहिली. त्यामुळे बरेचदा असंही दिसतं की ज्याप्रमाणे पुरूषांना फ्रीजमधल्या, कपाटातल्या इ. वस्तू पटकन सापडत नाहीत त्याप्रमाणे स्त्रियांना रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करताना दूरवरचं पहायला अडचण वाटते.
हे पटलंही आणि रुचलंही!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

विनायक प्रभू's picture

25 Jun 2009 - 7:50 pm | विनायक प्रभू

टनेल विजन वर चर्चा आवडेल.

पाषाणभेद's picture

26 Jun 2009 - 6:24 pm | पाषाणभेद

मला तरी वाटते की रात्री अंधार असल्यामुळे टनेल मध्ये गाडी चालवतांना टनेल व्हिजन व पेरिफेरल व्हिजन दोन्ही आवश्यक आहे. नाहीतर आपण गाडी निट न चालवू शकल्याने अपघात होवू शकेल.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

प्राजु's picture

25 Jun 2009 - 8:17 pm | प्राजु

सुंदर!!
हे पुस्तक अगदीच थोडं वाचलं आहे. पूर्ण नाही वाचलं.
संदीप या प्रकारच्या पुस्तकांची यादी दिल्याबद्दल धन्यवाद. :)
शितल, तुलाही धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

25 Jun 2009 - 9:30 pm | टारझन

वा !! छाण टाईमपास चालुये !!
बाकी संदिप चित्रेंची प्रतिक्रिया आवडली !! संदिप चित्रे अवांतर पणा करत नाहीत म्हणून मला आवडतात. टारझन फारच अवांतर पणा करतो . अवांतरपणा केल्याने तात्यांना मालक म्हणून 'शरम' वाटते. 'शरम' वाटल्याने हिणकस विडंबणे णिघतात. चतुंरंग काका आणि केसु जी हे उत्तम विडंबण कार आहेत. दोघेही सिनियर मिपा मेंबर आहेत. चतुंरग काका तर युएसमधे रहातात. युएस मधे बरेच मिपाकर रहातात ..मिपाकर ठाण्या-पुण्यात सर्वाधिक आहेत. ठाण्या-पुण्यात खायची सुविधा तर छाणच आहे .. सुविधा तर विषिष्ट ही असतात .. विषिष्ट लेख मला फार आवडतात ... संदिप चित्रेंची प्रतिक्रिया आवडली !!

शितलताई ... मला वाटलं की एखादा छाणसा धडा लिहीलास की काय तु :)

(असो) टारझन

भाग्यश्री's picture

25 Jun 2009 - 10:22 pm | भाग्यश्री

शितल वेलकम बॅक! :) आता तुझे मस्त लेख येऊदेत परत!
पुस्तक वाचायला आवडेल असा लेख व प्रतिक्रिया आहेत.. संदीप, गुड लिस्ट! तू चांगला पुस्तक सुचवणारा आहेस असं माझं मत झालंय आता ! :)

मेन आर फ्रॉम मार्स.. मला खूप आवडलं नव्हतं..(म्हणजे आवडलं नाही असंही नाही! दोन्हीच्या अधलंमधलं काहीतरी! :) ).. पण याचा ट्राय नक्की मारून पाहीन..

http://www.bhagyashree.co.cc/

आता अशी गाडी चालवली तर दुसरं काय होणार म्हणा?

(ह घ्या बरं का!!) ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छोटा डॉन's picture

26 Jun 2009 - 8:23 am | छोटा डॉन

मस्त परिचय दिला आहे पुस्तकाचा, लेख आवडला.
काही प्रतिसादही एकदम अफाट आहेत, मस्त टवाळक्या सुरु आहेत ...

हम्म्,
पुस्तक वाचायला हवे असे म्हणत नाही, पण असे प्रश्न "समोरासमोर बसुन चर्चा करुन " सोडवायल हवेत अशा मताचा मी आहे. पाहु कसे जमतेय ते. ;)

येऊद्यात अजुन असेच ...

------
(बॅड लिसनर) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अवलिया's picture

26 Jun 2009 - 11:13 am | अवलिया

>>>पण असे प्रश्न "समोरासमोर बसुन चर्चा करुन " सोडवायल हवेत अशा मताचा मी आहे.

समोरासमोर आणि बसुन ? अवघड आहे.

>>>पाहु कसे जमतेय ते.

मास्तर, घ्या तुमच्यासाठी एक केस रेफर करत आहे.. समजावुन सांगा नीट... कसे बसले पाहिजे चर्चा करायला ते.

--अवलिया

विनायक प्रभू's picture

26 Jun 2009 - 11:47 am | विनायक प्रभू

अवघड आहे.
ते फक्त योगी लोकांनाच जमते.

छोटा डॉन's picture

26 Jun 2009 - 1:27 pm | छोटा डॉन

अवघड असु द्यात हो मास्तर, तसेही सोपी कामे करण्याची आम्हाला आवड नाहीच.

काय म्हणता ?
योगी व्हावे लागेल ? म्हणजे अजुन एक दुसरा आयडी काढावा म्हणता ?
हे मात्र अवघड आहे ;)

------
छोटा योगी
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

विनायक प्रभू's picture

26 Jun 2009 - 1:30 pm | विनायक प्रभू

योगासने शिकावी लागतील.

छोटा डॉन's picture

26 Jun 2009 - 1:40 pm | छोटा डॉन

आता योगासने शिकायची म्हणली की त्यात २ प्रकार आले ...
१. देशी उर्फ क्लासिकल
२. वेस्टर्न उर्फ भंपक

आता पुन्हा ह्यातले श्रेष्ठ कुठले आणि आवश्यक कुठले ह्यावर मारामार्‍या ...
त्यापेक्षा आम्ही हिमालयातच निघुन जातो कसे, वलियासाहेब तुमच्या हिमालयातल्या फ्लॅटची किल्ली द्या पाहु, तिकडेच "समोरासमोर बसुन चर्चा" करावी म्हणतो ... ;)

-----
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अवलिया's picture

26 Jun 2009 - 1:48 pm | अवलिया

वेलकम !
तशी दोन चार काम चलावु योगासने येतात आम्हाला... शिकवतो तुम्हाला बसल्या बसल्या !! :)

--अवलिया

विनायक प्रभू's picture

26 Jun 2009 - 5:17 pm | विनायक प्रभू

नको.
फक्त अर्धउत्तामांगासन शिकवा.
मान आणि पाठ सशक्त व्हावी लागते.

नितिन थत्ते's picture

26 Jun 2009 - 10:34 am | नितिन थत्ते

>>पण असे प्रश्न "समोरासमोर बसुन चर्चा करुन " सोडवायल हवेत अशा मताचा मी आहे

सहमत. नुकतेच काही तरूण मिपाकरांना 'समोरासमोर बसून चर्चा करायला' कोणीतरी मिळाल्याचे कळले. त्यांचे अभिनंदन.

खराटा
(रंग माझा वेगळा)

स्वाती२'s picture

26 Jun 2009 - 5:19 pm | स्वाती२

छान पुस्तकाचा छान परिचय. हे पुस्तक नविन आले तेव्हा लायब्ररीतून मिळवले. काऊंटर वरची आजीबाईने माझ्याकडे काय खुळचट आहे असं बघत ऐकवले. "लग्नाला ४० वर्ष झाली माझ्या." भाषा वेगळी पण सूर मात्र "एवढी वर्ष सोसतेयचा." मला मात्र हे पुस्तक आवडले. आता रात्री पार्टी करुन येताना नवरा designated driver असतो. घसा ओला करायची सोय नाही. काय करणार? बायकांना मॅप बघणे, रात्री गाडी चालवणे जमत नाही ना.

रेवती's picture

26 Jun 2009 - 7:24 pm | रेवती

हि हा हा हा!
मस्त!

रेवती

वेताळ's picture

27 Jun 2009 - 11:00 am | वेताळ

चालायचे...आम्ही पण खुपच सोसतो आहे.सांगणार कुणाला?
span style="color: #6600CC;">वेताळ

रेवती's picture

26 Jun 2009 - 7:27 pm | रेवती

आता हे पुस्तक मिळवून वाचावेच लागणार.
धन्यवाद शितल!

रेवती