पावसाची गाणी

अनंत छंदी's picture
अनंत छंदी in जनातलं, मनातलं
23 Jun 2009 - 9:05 pm

नुकताच पाऊस सुरू झालाय. वाटतं अशावेळी माथेरान, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जावं. वस्तीपासून जरा दूर एकांत स्थळी असलेल्या एखाद्या व्हिक्टोरियन शैलीतील लॊजच्या एका कोप़रयातील सुट्च्या गॆलरीत मस्त आरामखुर्चीत पहुडावं, समोरची हिरवाई धुक्याचे झिरझिरीत वस्त्र ल्यायलेली असावी. सायंकाळच्या त्या वेळी हवेतील गारठा अंगावर घेतलेल्या शालीशी लगट करीत असावा. बाजूच्या टेपरेकॊर्डरमधून मस्तपैकी गुलाम अली किंवा मेहदी हसनचे सूर पाझरत असावेत. हातात सोनेरी छटा धारण करणार्या वारुणीचा ग्लास असावा. पाऊस आला की त्याची मजा अनुभवण्याचा हा मार्ग मला आवडतो. पण प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही. पावसावरची काही छान गाणी आठवत, ऐकत मी माझे दु:ख विसरायचा प्रयत्न करतो. ती आठवणारी गाणी अशी....
१.. वाट इथे स्वप्नातील संपली जणू
२.. येरे घना येरे घना
३.. केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
४.. ओलेत्या पानात सोनिया उन्हात भरून मेघ आले
५.. श्रावणात घन निळा बरसला
६.. आला आला वारा संगे पावसाच्या धारा
७.. रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
८.. नभ उतरू आलं
९.. गारवा
१०.. पाऊस दाटलेला
आपल्यालाही अशी काही गाणी आठवत असतील...
मग, वाट काय पहाता? टाका यादीत भर...

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

23 Jun 2009 - 9:13 pm | श्रावण मोडक

१. चिंब पावसानं रान झालं आबादानी...
२. (हे गंभीर आहे) पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने...

अनंत छंदी's picture

23 Jun 2009 - 9:19 pm | अनंत छंदी

श्रावणजी
तुमच्या निवडीला सलाम! खरं तर "पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने" हे माझंही आवडतं गाणं आहे पण ते जरा वेगळ्या मूडमध्ये ऐकायला आवडते.

घाटावरचे भट's picture

23 Jun 2009 - 9:25 pm | घाटावरचे भट

हम्म्म... गार वारा, पाऊस, धुक्याची शाल वगैरे गोष्टींशी वारुणी वगैरे जुळत नाय बॉ. तिथे वाफाळता इलायची चहाचा कपच हवा. असो, आवड आपली आपली.

बाकी गाण्यांमधे वर लिहिलेली गाणी आहेतच. शिवाय एखादा मल्हार वगैरे सुद्धा चालेल. वरच्या यादीत भर -

१. घन घन माला नभी दाटल्या

मैत्र's picture

24 Jun 2009 - 3:45 pm | मैत्र

मी तुमच्या सारखा चहा वाला आणि तो सुद्धा इलायची वगैरे नाही. आलं घातलेला कडक चहा. गवती चहा पण झकास लागतो या दिवसात...

चालते हो सोनेरी पेय सुद्धा...
जगजितसिंगची एक छान गजल आहे - अल्बम युनिक.
मान मौसम का कहा..
छायी घटा.. जाम उठा !!

मल्हारांमध्ये सूर मल्हारची पंडितजी अर्थात अण्णांची एक कॅसेट आहे
गरजत आये... ही विलंबित एकतालातली चीज
आणि
"बादरवा बरसन लागी ... नन्ही नन्ही बूंदन गरज गरज चहूं ओर .. बिजलि चमकत... "
ही अप्रतिम द्रुत ...

क्रान्ति's picture

23 Jun 2009 - 11:13 pm | क्रान्ति

१] आला पाऊस मातीच्या वासात ग
मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग
२] रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे
पाणीच पाणी चोहिकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे?
३] अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी पुकारे तुझी साजणी
४] अंबरातल्या निळ्या घनाची शपथ तुला
मयुरा रे फुलवित ये रे पिसारा

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

अथांग सागर's picture

23 Jun 2009 - 11:50 pm | अथांग सागर

घन ओथंबून येती, वनात राघू हो फिरती...

--अथांग सागर

फ्रॅक्चर बंड्या's picture

24 Jun 2009 - 12:14 pm | फ्रॅक्चर बंड्या

पाउस असा रुनझुनता, पैंजने सखीची स्मरली - संदीप खरे
तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाउस ही..

अश्विनि३३७९'s picture

24 Jun 2009 - 12:27 pm | अश्विनि३३७९

बरसून गेला
अश्विनि ....

जागु's picture

24 Jun 2009 - 1:17 pm | जागु

निशाणा तुला दिसला ना
मायेच्या हळव्या स्वप्नांनी झुलते

तर्री's picture

24 Jun 2009 - 7:41 pm | तर्री

नभ मेघानी आक्रमिले.....

सूहास's picture

24 Jun 2009 - 7:51 pm | सूहास (not verified)

गाणी तर भरपुर आठवतात..
पण आता बाहेर पाऊस नसल्याने आठवत नाहीत.

तरी ही
१)ये रे ये रे पावसा ,तुला देतो पैसा(हे सर्वात पहिले आठवत.)
२) गारवा...वार्‍यावर भिर-भिर पारवा...
३)सध्या तरी ...बरसो रे मेघा मेघा बरसो रे(गुरु..)

सुहास
आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे,
काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर,
उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे,
कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे,
मधे अडल्यास इश्वरास विनवायचे
सौजन्य : प्राजुताई

यन्ना _रास्कला's picture

24 Jun 2009 - 7:59 pm | यन्ना _रास्कला
माधुरी दिक्षित's picture

24 Jun 2009 - 8:08 pm | माधुरी दिक्षित

रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन्,भिगे आज ईस मौसम मे लगी कैसी ये अगन......................

लगी आज सावन की फिर वो झडी है, वही आग सिने मे फिर जल पडे है.....

नैनो मे बदरा छाये,बिजलि सी चमके हाये , ऐसे मे बलम मोहे ...........

प्राजु's picture

24 Jun 2009 - 8:19 pm | प्राजु

१.तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊसही...

२.मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले.

३. पाउस पहिला जणू सानुला..

४. पुन्हा पावसाला सांगायचे कुणाला कितीथेंब वाटायचे..

५. ऋतू हिरवा ऋतू बरवा..

आता इतकीच . :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

१. आला आला वारा संगे पावसाच्या धारा
२. आला आला पाऊस आला पाऊस आला (बालगीत)
३. ये रे ये रे पावसा रुसलास का, माझ्याशी कट्टी केलीस का (बालगीत)
५. भेट तुझी माझी स्मरते...अजून त्या दिसाची... धुंद वादळाची होती... रात्र पावसाची.... (अरुण दाते)
(पाऊसप्रेमी) सागर

टारझन's picture

24 Jun 2009 - 9:11 pm | टारझन

तम्मा तम्मा लोगे .. तम्मा तम्मा लोगे तम्मा !!
तु प्रेमी आहा .. मै प्रेमी आहा .. एक तुही मिला ..

असो !! भिगे होंट तेरे .. प्यासा दिल मेरा .... ऑल टाईम फेव्हरिट आहे बॉस ..
उन्हाळा-पावसाळा-हिवाळा .. वाचवा दिवस रात्र

सागर's picture

25 Jun 2009 - 11:19 am | सागर

टारुबाळा,

हिंदी गाण्यांची पण मोठी यादी प्रत्येकाकडे असेन बारिश, बादल, बरसात अशी कित्येक शब्दांची गाणी आहेत

"फक्त मराठी च" हा स्वाभिमान बाळगा राव....
एकाने हिंदी सुरु केले तर मराठी गाण्यांवरचा झोत हिंदी गाण्यांवर वळेन... मराठी गाणी कोणाला माहितीच होणार नाही...

सर्व प्रकारच्या मराठी गोष्टींना उत्तेजन द्या,... आपण स्वतःच प्रसार केला मराठीचा तर माहित नसलेल्या गाण्यांची माहिती पण आपला इतर मराठी बांधवांना होईन :)

जय मराठी
जय महाराष्ट्र
- सागर

मस्त कलंदर's picture

24 Jun 2009 - 11:17 pm | मस्त कलंदर

थेंब थेंब तळ्यात.... टपटप पानांत.... पावसाच्या रेघा.... झर झर धार... झाडांची भिजली इरली.. वाटतं जणू पाऊसच पडतोय.. हातातलं सगळं काम टाकून पावसात चिंब भिजावंसं वाटतं!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सचीन जी's picture

25 Jun 2009 - 9:28 am | सचीन जी

माझी आवड -

१. मेघा छाई आधी रात - शर्मीली
२. ओ सजना - परख
३. सुन सुन बरसात की धुन - सर

प्रमोद्_पुणे's picture

25 Jun 2009 - 12:06 pm | प्रमोद्_पुणे

झुन्जूर मुन्जूर पाऊस ..आशा भोसलेन्चे एक खूप छान गाणे आहे (बहुदा मधु काम्बीकरान्वर चित्रीत झाले आहे.)

कापूसकोन्ड्या's picture

29 Jul 2014 - 11:45 pm | कापूसकोन्ड्या

ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणुनी घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता
- ग्रेस

आयुर्हित's picture

30 Jul 2014 - 9:00 am | आयुर्हित

ए आई मला पावसात जाऊ दे, एकदा तरी चिंब चिंब होऊ दे

आणि

वादल वारं सुटल गं, वार्‍यानं तुफान उठलं गं
भिरिभर वार्‍यांत, पावसाच्या मार्‍यात, सजनानं होडीला पान्यात लोटलं
वादल वारं सुटलं गं

गडगड ढगांत बिजली करी
फडफड शिडात, धडधड उरी
एकली मी आज घरी बाय
संगतीला माझ्या कुनी नाय
सळसळ माडांत, खोपीच्या कुडांत
जागणार्‍या डोल्यांत सपान मिटलं

सरसर चालली होडीची नाळ
दूरवर उठली फेसाची माळ
कमरेत जरा वाकूनिया
पान्यामंदी जालं फेकूनिया
नाखवा माझा, दर्याचा राजा
लाखाचं धन यानं जाल्यांत लुटलं
गीतकार : शांता शेळके, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर