-: माझे कौलारू घर :-

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
22 Jun 2009 - 8:03 pm

-: माझे कौलारू घर :-

खाली आहे हिरवळ हिरवी
दोन बाजूंनी डोंगर कडे
उंच बघावे आभाळ निळे
सोनेरी सुर्यकिरण त्यातून पडे ||

घाट सोपा लांब चढा
किंवा डोंगर चढा छोटा वाकडा
दिसेल खाली तलाव नितळ
आणि़क बाजूस सुबक देवूळ ||

खळखळ खळखळ वाहे झरा
वाट आपली पुढे सावध उतरा
चला पुढे चला, हे आहे चिंचबन
थकला तर थांबा थोडे, जीरेल सगळा शिण ||

ती खालची, ती मधली आळी
पाटील गाल्ली अन मोठी आळी आहे ती वर
आता आहे थोडा उतार
त्यानंतर दिसेल तुम्हां माझे कौलारू घर ||

- पाषाणभेद

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

सूहास's picture

22 Jun 2009 - 8:08 pm | सूहास (not verified)

घर आवडले...

अवा॑तर : कुठे होतास रे !!!

सुहास

पाषाणभेद's picture

22 Jun 2009 - 8:20 pm | पाषाणभेद

धन्यवाद भाऊ,

सध्या 'शिप्ट डुटी' च्या चरकात पिळवुन घेतो आहे म्हणून ईच्छा असूनही येथे येता येत नव्हते.

कवितेचे नाव आधी "माझ्या घराचा पत्ता" असे ठेवले होते. पण नंतर विचार केला की आपल्याकडे (मराठीत) "कौलारू घराची" (बंगला, ईमला, राजवाडा आदी. नव्हे हो. मराठी माणुस ना.) फॅशन आहे, चला बनवून टाकू कौलारू घर.

बाकी असा असणारा निसर्गातील भागात एकदा गेलो होतो त्यावरून कविता सुचली. असो.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

क्रान्ति's picture

22 Jun 2009 - 9:26 pm | क्रान्ति

मस्त आहे खेड्यामधले घर कौलारू!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2009 - 9:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर कविता !

माझ्या आईच्या पाठ्यपुस्तकात एक कविता होती... "खेड्यामधले घर कौलारू"!!!
लहानपणी कधी ऐकली होती.. आता शब्द आठवत नाहीयेत.. पण तुमच्या कवितेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा आठवली.. ते खेड्यातले घरही असेच असावे असे वाटते..
बाकी कविता अगदी छान... कोणतेही जडजव्याळ(हाच शब्द किती जड नि जव्याळ आहे!!!) शब्द न वापरता... अगदी साध्या-सोप्या शब्दांत डोळ्यांसमोर घर उभे केले!!!! :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

पाषाणभेद तुमची कविता छान आहे.

मला एकदम आमच्या पाठ्यपुस्तकातल्या माधव ज्युलीयनांच्या देवद्वार छंदामधल्या कवितेची आठवण झाली. त्या कवितेचे पहिले कडवे असे होते :

आमुचे घर छान
शेजारी वाहे ओढा
कागदी होड्या सोडा
दूर जाती . . . . .

ह्याची चाल आम्हाला सरांनी जात्यावरच्या ओवी सारखी लावून शिकवली होती

दिपक's picture

1 Jul 2009 - 11:49 am | दिपक

सहज आणि सुंदर कविता. अगदी पाठ्यपुस्तकात शोभेल अशी..
मस्त कलंदर म्हणतात तसे साध्या-सोप्या शब्दांत डोळ्यांसमोर घर उभे केले!!!!

आवडली !:)