मनाच्या पुष्पी अलगद येउन
मधुआत्म्यास निर्मळ आनंद देतो
त्या पाखरास आम्ही सुख म्हणतो
पिंजर्याचे ह्याच्या मोकळे छप्पर
पाखरू हे अवखळ चंचल
गाव ना ठाव हिंडे निरंतर
करीतो हा चोख व्यवहार
देवाण घेवाण भर नफ्यात
अपघातात विम्याला नसे भार
कधी ह्याची उंच भरारी
कधी विश्रांतीस पानाआडी
विहार ह्याचा त्याच्याच मर्जी