जमा - खर्च !

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in जे न देखे रवी...
20 Jun 2009 - 12:43 am

काय म्हणावं गणिताला?
तऱ्हेवाईकच वागण्याला
मोजून दुखल्या बोटांना
जमा-खर्च ना जुळण्याला ….१

काय जमा? खर्च सगळा
वजाबाकीचा हिशोब हा
जरा साठवू धन म्हणता
पाय फुटती पैशाला ….२

थेंबे थेंबे तळे साचवा
ऐका रे हा सल्ला ऐका
(काय करावं जिथे पाणी
तयार नाही थांबायला !) ….३

उलटा अनुभव वजन घटवता
काय सोसशी बा मना !
सांभाळावे जरी जिभेला
हवा फुगवते शरीराला ….४

धावा किंवा खूप चाला
फरक कुठचा पडायला ?
वजनकाटा आहे बसला
इथे नुसता खिजवायला ….५

काय म्हणावं गणिताला?
आकड्यांच्या गोंधळाला
कष्ट पैसा जमवायला
कष्ट वजन घटवायला …. ६
-----------------------------------------------
माझा ब्लॉगः www.atakmatak.blogspot.com
-----------------------------------------------

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

रेवती's picture

20 Jun 2009 - 8:38 am | रेवती

धावा किंवा खूप चाला
फरक कुठचा पडायला ?
वजनकाटा आहे बसला
इथे नुसता खिजवायला
मघाशीच तीन मैल चालून आल्यावर खूप भूक लागली व नेहमीपेक्षा दुप्पट जेवले. काय करणार?;)
कविता आवडली. जमाखर्च जुळवतानाची त्रेधातिरपीट्......आणखी काय?:)

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jun 2009 - 12:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता आवडली. अधूनमधून वजनाच्या हिशोबाची जाणीव करून घेतलेली बरी.

कपिल काळे's picture

20 Jun 2009 - 10:02 am | कपिल काळे

चित्र्यांनी जमाखर्चाचे चित्र चांगले रंगवले आहे !

धावा किंवा खूप चाला
फरक कुठचा पडायला ?
वजनकाटा आहे बसला
इथे नुसता खिजवायला ….५

हे सगळ्यात आवडले . उद्या घरी मिसळपाव+ नाटक्याचा चॉकलेट- बनाना मिल्कशेक असा बेत आहे.

आज शनिवार असून हापिसात आल्यामुळे बायकोने दया येउन डब्यात पुरी- श्रीखंड्-काळ्या वाटाण्याची उसळ असा स्वयंपाक रांधून दिला आहे.

कोबे मध्ये सिझलर खायची मुलीची मागणी आता थोपवून धरावी लागणार असं दिसतय!

सहज's picture

20 Jun 2009 - 10:09 am | सहज

पटेश!!

कविता आवडली. :-)

जागु's picture

20 Jun 2009 - 12:04 pm | जागु

वा मजा आली कविता वाचताना. आवडली.

विनायक प्रभू's picture

20 Jun 2009 - 12:09 pm | विनायक प्रभू

भारी जमा खर्च

चतुरंग's picture

20 Jun 2009 - 4:01 pm | चतुरंग

ह्या वजनदार जमा-खर्चात मी कधीही तोट्यात नसतो! :D
वजनकाट्याला माझी अशी दहशत बसली आहे की आता तो माझे वजन कायम एकच दाखवतो किंचितही कमी नाही! :B

(धनको)चतुरंग

चित्रा's picture

20 Jun 2009 - 10:04 pm | चित्रा

कविता आवडली. आहेत खरे सगळे कष्ट.

ऋषिकेश's picture

20 Jun 2009 - 11:14 pm | ऋषिकेश

:) कविता आवडली रे!
मस्त कल्पना आहे.. आणि चालीत बसलीये पण नीट
मस्त!

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विकास's picture

21 Jun 2009 - 7:48 pm | विकास

एकदम वास्तववादी दर्शन देणारी कविता आहे. :-)
>>
कष्ट पैसा जमवायला
कष्ट वजन घटवायला …
<<

ही बाकी अगदी मनची व्यथा बोलून दाखवली :S

लिखाळ's picture

21 Jun 2009 - 10:27 pm | लिखाळ

वा ...
मस्त आहे कविता :)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

विसोबा खेचर's picture

22 Jun 2009 - 10:52 am | विसोबा खेचर

धावा किंवा खूप चाला
फरक कुठचा पडायला ?
वजनकाटा आहे बसला
इथे नुसता खिजवायला ….५

मस्त! :)

तात्या.

चन्द्रशेखर गोखले's picture

27 Jun 2009 - 8:43 am | चन्द्रशेखर गोखले

सहज सोप्या शब्दात मांडलेले वास्तव! रचना आवडली !!