अली अकबर गेले ! सूर लोपले!

टायबेरीअस's picture
टायबेरीअस in जनातलं, मनातलं
19 Jun 2009 - 7:15 pm

विश्वविख्यात सरोदवादक उस्ताद अली अकबर खा यांचे आज निधन झाले.
भारतीय सन्गीत जगप्रसिध्द करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

आज भारतीय संगीताला जे आंतरराष्ट्रिय व्यासपीठ मिळालय त्याची बीजं अलि अकबर आणि
रवि शंकर ह्यांनी रुजवली आहेत.

उस्ताद्जींना भावपूर्ण श्रध्दांजली.

- शुभंकर.

फार वाईट झाले.. माझी भावपूर्ण श्रद्धांजली!!

(एकाच बातमीचे दोन धागे झाल्याने दोन्ही धागे एकत्र करून दिले आहेत.)
- संपादक.

संगीतबातमी

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

19 Jun 2009 - 7:32 pm | चतुरंग

सरोदवादनाला आणि जुगलबंदीला ज्यांनी जगात पोहोचवले असा उस्ताद लोपला, आणखी एक दिग्गज काळाआड गेला.
त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांनी वाजवलेला राग मारवा इथे ऐकता येईल.
ईसकाळ मधील बातमी येथे पहा.

(खिन्न)चतुरंग

मुक्तसुनीत's picture

19 Jun 2009 - 7:35 pm | मुक्तसुनीत

एका महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली !

उस्ताद अली अकबर यांच्या कॅलिफोर्नियातल्या संस्थेसमोरचा बोर्ड :


उस्ताद अली अकबर माझ्या एका अतिशय साध्या तबलजी मित्राला आशीर्वाद देताना. त्यांच्या संस्थेमधे संगीताबद्दल आस्था असणार्‍या कुणालाही मुक्त प्रवेश होता. खान बाबा कुणालाही मनमोकळे भेटायचे. चौकशी करायचे. संगीताची उपासना आणि जोपासना शेवट्पर्यंत चालू होती. हा फोटो एक महिन्यापूर्वीचा.

प्रमोद देव's picture

19 Jun 2009 - 10:00 pm | प्रमोद देव

विख्यात सरोद वादक उस्ताद अलि अकबर खाँ ह्यांचे मूत्रपिंडाच्या दीर्घ आजाराने सॅन फ्रॅन्सिको येथे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

घाटावरचे भट's picture

19 Jun 2009 - 9:49 pm | घाटावरचे भट

या महान कलाकाराला माझीही श्रद्धांजली.
हा महान कलाकार अत्यंत आजारी असतानाही शिष्यांना राग दुर्गा शिकवत होता. त्यांची महती वर्णावी तितकी कमीच आहे.

- भटोबा

क्रान्ति's picture

19 Jun 2009 - 11:13 pm | क्रान्ति

भारतीय संगीतक्षेत्रातल्या महान विभूतीस माझीही विनम्र भावपूर्ण आदरांजली.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

विसोबा खेचर's picture

20 Jun 2009 - 12:07 am | विसोबा खेचर

उस्तादजींना माझीही आदरांजली..

सवाई गंधर्व महोत्सवात, ग्वाल्हेरच्या तानसेन समारोहात त्यांच्या सुंदर मैफली ऐकण्याचा योग आला होता..

तात्या.