तू असता तर झाले असते
जीवन सारे मंद सुगंधित
क्षणा-क्षणाला फुलला असता
ओला श्रावण नवीन धुंदीत
तु असता तर झाले असते
पायतळीचे काटे तृणवत
उदासलेल्या धुक्यामधुनी
उब तुझी ही असती घेरत
तु असता तर मी ही असते-
अशीच, तरीही वाटत रहाते
तू नाही तर मी ही आता
अशीच असते, कुठेच नसते
प्रतिक्रिया
17 Jun 2009 - 9:54 am | क्रान्ति
तु असता तर मी ही असते-
अशीच, तरीही वाटत रहाते
तू नाही तर मी ही आता
अशीच असते, कुठेच नसते
अत्यंत तरल, आर्त भावना! सुरेख कविता.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
17 Jun 2009 - 10:12 am | यन्ना _रास्कला
तू असता तर झाले असते
जीवन सारे मंद सुगंधित
क्षणा-क्षणाला फुलला असता
ओला श्रावण नवीन धुंदीत
हे सर्वकाय द्येवबाप्पाने निर्मान केलय. तेचासाठी दुसर्या कोनाची काय गरज. आनी तो
मानुस नस्ला तर काय फरक पडतो काय. आपन आप्ला आप्ल्या जिवनाचा आनंद घ्यायाचा. कोनासाठी खोलंबायच नाय.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
17 Jun 2009 - 10:22 am | पर्नल नेने मराठे
=))
फुलवा तु फुलवायच की नुस्तच झुल्वाय्च ;;)
चुचु
17 Jun 2009 - 11:35 am | आनंदयात्री
फुलवा नेहमीसारखीच अत्यंत सुरेख सुंदर कविता !! येउदे अजुन ..
वरच्या रास्कल लोकांकडे लक्ष देउ नकोस. नावातच भुषणाने रास्कल म्हणवतात स्वतःला ते. काहीतरी वैगेरे म्हणतात तर औकाद असेल तर लिहुन दाखवावे .. या किंवा कोणत्याही स्वत:च्या आयडीने त्यांनी.
चिप साले.
17 Jun 2009 - 12:10 pm | यन्ना _रास्कला
म्हनाय्चाय माला कि आपन उगाचच दुस्र्या मान्साला जादा भाव द्येतो आनी
त्या मान्साने आप्ल्याला सोडुन दिल कि दुख्ख करत र्हातो. आप्ल्या
जिवनाचा आनंद आपन दुस्र्यावर आवलंबुन का बर ठेवाय्चा?
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
17 Jun 2009 - 1:42 pm | मसक्कली
सगलच नाय कलल मला पन थोड कलल त्यावरुन सन्गते चान आहे.....
आनि काय हो प्रेमत लोक आन्धले होतत हे खर आहे.....हे जे लोक पदतत त्यानच कलेल नहि का.....
आसो............
आपन आपल बिन्दास कविता करा.....आजुन स्टॉक येउ द्या जरा.....
17 Jun 2009 - 1:55 pm | मदनबाण
छान कविता...
फुलवा ताई बर्याच दिसान आपण काही लिहल आहे. :)
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
17 Jun 2009 - 2:44 pm | दत्ता काळे
कविता आवडली.
17 Jun 2009 - 10:36 pm | प्राजु
तू नाही तर मी ही आता
अशीच असते, कुठेच नसते
खूप छान. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Jun 2009 - 12:54 pm | निखिलचं शाईपेन
खुपच छान, स्पेशली शेवटचे कडवे एक नंबर आहे.
-निखिल
19 Jun 2009 - 3:57 pm | राघव
मस्त. शेवटचं कडवं भाव खाऊन जातंय!! :)
येऊ देत अजून.
अवांतरः बर्याच दिवसांनी तुमचं लेखन दिसलं!!
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )