पावसाला विनंती
अरे अरे पावसा, तू पड भसाभसा
तू पड भसाभसा
वेडा झाला बळी राजा
नको देऊ त्याला सजा
वर पहाता पहाता, जीव झाला रड्कासा
तू पड भसाभसा
का रुसला आम्हावरी ?
तुझ्याविना कोण तारी
सा~या सजिवांचा देव, तुझ्यावरच भरवसा
तू पड भसाभसा
पुर्वी तानसेन राग म्हणायचा
धो धो पाऊस पडायचा
तु नाही पडला तर, सुर गवसेल कसा
तू पड भसाभसा
नद्या नालेही ओसरली
तळे सुध्दा खाली झाली
गुरं ढोरं वेडी झाली, जसा पाण्याविणा मासा
तू पड भसाभसा
तुझ्या विणा शेती नाही
शेती विणा काम नाही
पाण्याच्या शोधात, माऊलीचा जीव झाला रड्कासा
तू पड भसाभसा
आकाश झाले कोरडे
जमिनीला गेले तडे
कोठे लपला वरुण राजा, ये जसा येशील तसा
तू पड भसाभसा
राजाभाऊ गायकवाड.
प्रतिक्रिया
16 Jun 2009 - 6:15 pm | मदनबाण
राजाभाऊ तुम्ही वरुण राजाला केलेली विनंती आवडली... :)
शेतकरी बिचारे बियाण घेऊन बसले आहेत आणि चातका प्रमाणे पावसाची वाट पाहण्याशिवाय ते काहीच करु शकत नाहीत. :(
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka