पाकिस्तानमधील अराजकाची बीजे कशात?

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
13 Jun 2009 - 8:19 am

पाकिस्तानमधील अराजकाची बीजे कशात?
(This article was published in eSakal's web edition
http://beta.esakal.com/2009/06/05114456/international-Pakistans-cond.html or
http://tinyurl.com/kjldqp)

आज पाकिस्तानात जे अराजक माजले आहे त्याची मूलभूत कारणे शोधली तर एक गोष्ट सहज दिसते की पाकिस्तानने स्वत:च्या खर्चासाठी लागणारे पैसे स्वत: कधीच कमावले नाहीत. कायम कुणा ना कुणापुढे हात पसरायचे व हातात काही ना काही पडतच राहिल्यामुळे 'कमवायची गरजच काय?' अशी स्वभिमानशून्य सवय त्या राष्ट्राला लागली व फुकटची कमाई गोडही वाटू लागली.

प्रत्येक पाकिस्तानी सरकारने अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्रपतींच्या कारकीर्दीत स्वत:चे खिसे फुकटात गरम करून घेतले. पकिस्तानचे "आद्य" हुकूमशहा फील्ड मार्शल अयूब खान यांच्या कारकीर्दीत प्रथम "सीटो" संस्थेचा सभासद म्हणून मागितलेल्या, त्यानंतर जनरल झिया-उल्-हक यांच्या कारकिर्दीत रशियाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून मागितलेल्या व शेवटी जनरल मुशर्रफ यांच्या कारकिर्दीत तालिबान आणि अल् कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून मागितलेल्या अमेरिकन लष्करी व वित्तीय मदतीचा ओघ चालूच राहिला.

नुकत्याच झालेल्या अमेरिकावारीत तालिबानशी लढायला लष्कर पाठवायला पैसे नसल्यामुळे अमेरिकेची मदत मिळेपर्यंत आपण फौज पाठवू शकणार नाही, असे निर्लज्जपणे सांगून व त्या युद्धात साधे पोलीस दल पाठवून पाकिस्तानने स्वत:चे हसेच करून घेतले. यातून असा प्रश्न निर्माण होतोच, की इतके दिवस मिळालेले पैसे कुठे गेले? अर्थातच ते भारतासारख्या शांतताप्रिय देशाविरुद्ध युद्धाची तयारी करण्यातच खर्च झाले.

पाकिस्तानने भारताबरोबरच्या वैराचा उगीचच बागुलबुवा केलेला असून भारताने टाकलेल्या अनेक चांगल्या लोकाभिमुख पावलांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. उदा. अतिशय श्रीमंत व अतिशय गरीब नागरिकांतील आर्थिक दरी कमी करण्यासाठी 'कसेल त्याची जमीन, राहील त्याचे घर' अशा तर्‍हेचे कायदे घडवून आणून शेतकर्‍यांना व भाडेकरूंना भारत सरकारने दिलासा मिळवून दिला. कारखानदारांच्या पिळवणुकीला तोंड देता यावे म्हणून कितीतरी कामगाराभिमुख कायदे भारत सरकारने केले. या तर्‍हेचे समाजाभिमुख कायदे करून भारताने एक व्यापक मध्यमवर्ग निर्माण केला जो पाकिस्तान निर्माणच करू शकला नाही. आजही त्यांच्या राजकारणवर जमीनदारांची इतकी घट्ट पकड आहे की गोरगरीबांना राजकारणात शिरणे शक्यच नाहीं. त्यामुळे अतिशय गरीबीत हाल-अपेष्टा सहन करणार्‍या जनतेला तालीबानचे आकर्षण वाटले यात नवल ते काय?

भारतात महात्मा फुले व महर्षी कर्वे यांच्यासारख्या समाजपरिवर्तन करणार्‍या दृष्ट्यांनी भारतीय नारीला विमुक्त व सुशिक्षित करून पुढील भारतीय पिढीला अधिक सुशिक्षित व अधिक कार्यक्षम बनविले, तर "भूदान" चळवळीचे प्रणेते असलेल्या विनोबा भावेंच्यासारख्या आधुनिक संतांनी भारतात एक वेगळीच क्रांती घडवून आणली. त्यापैकी ज्योतीबा फुले "महात्मा" म्हणून गौरविले गेले, तर महर्षी कर्वे व विनोबा भावेंना भारतरत्न या सर्वोच्च पदवीने गौरविले गेले. असे कुणी पाकिस्तानात पुढे आले नाही. याउलट पकिस्तानमध्ये एका पाठोपाठ एक हुकुमशहाच जन्माला आले.

भारताप्रमाणे पाकिस्तानला आर्थिक उत्कर्ष साधताच आला नाही. उलट भारताविरुद्धच्या (नसलेल्या) वैराचे बुजगावणे उभे करून येनकेनप्रकारेण अमेरिका व युरोपीय देशांकडून त्याने जे पैसे उकळले त्यातले बरेचसे लष्करशहांच्या खिशात गेले व जे थोडेफार उरले ते भारताविरुद्ध वापरले गेले. पाकिस्तानला आर्थिक वैभव निर्माणच करता आले नाही, पण असंख्य दहशतवाद्यांच्या टोळ्या त्यांनी उभ्या केल्या व या दहशतवादी टोळ्यांना भारतात हैदोस घालून आपल्या प्रगतीस खीळ घालण्यास मुक्त परवानगी दिली.

पण पैसे व धर्मांधता या गोष्टीवर उभ्या केलेल्या या "सैन्या"ची कुणावरच निष्ठा नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या सरकारवरच उलटले व दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले बनून या सैन्याने पाकिस्तानातच थैमान घालायला सुरुवात केली आहे.

भारताबरोबर वैर करून पाकिस्तानचा काहीच फायदा झालेला नाहीं, उलट अतोनात नुकसानच झाले आहे. म्हणून भारताने केलेल्या अनेक सुधारणांचे अनुकरण करून, श्रीमंत-गरीबातली दरी कमी करून, एका सुखवस्तू मध्यमवर्गाची निर्मिती करून आणि फुकटात मिळणारी मदत नाकारून स्वत:च्या पायावर उभे रहायची तयारी दर्शविली तर त्या राष्ट्राचे अजूनही कल्याण होईल.

-सुधीर काळे, जकार्ता

राजकारणलेख

प्रतिक्रिया

वेताळ's picture

13 Jun 2009 - 10:25 am | वेताळ

पाकिस्तान च्या दुराअवस्थेला तुम्ही जे वर कारणे सांगितली आहेत ती देखिल जबाबदार आहेत. छान लेख लिहता तुम्ही.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

धन्यवाद!

नितिन थत्ते's picture

13 Jun 2009 - 10:41 am | नितिन थत्ते

बर्‍याचशा प्रमाणात सहमत.

अवांतरः या लेखाच्या चौथ्या परिच्छेदात भारताची प्रगती होण्यास कारणीभूत जी धोरणे लिहिली आहेत (कामगार कायदे, कूळकायदा वगैरे) तशाच धोरणांमुळे भारत कित्येक दशके मागे पडला असे आपल्या देशातील अनेक बाजारवादी लोकांचे मत आहे ;)

अतिअवांतरः हा लेख मराठीत कोणी टंकला? :D

खराटा
(रंग माझा वेगळा)

सुधीर काळे's picture

13 Jun 2009 - 11:24 am | सुधीर काळे

खराटासाहेब,
पाकिस्तानवरील हा लेख जन्मतःच मी बराहा पद्धतीने टंकला होता. पण "काळेज लॉ" हा लेख मी पूर्वी (जेंव्हा मला बरहाबद्दल माहिती नव्हती) लोकसत्ता फ्रीडम या सॉफ्टवेअरने लिहिला होता. कदाचित तुम्हाला माहीत असेल की असे लेख ई-मेलने पाठवले तर त्यात नुसते चौकोनच दिसतात व ई-मेलसाठी वापरल्या जाणार्‍या बरहासारख्या सॉफ्टवेअरने लिहिलेले लेख प्रिंट करताना नीट उठत नाहींत. म्हणून तो मी पीडीएफ मध्ये convert केला.
पण असा अविश्वास का? मी कामचोर नाही हो! "काळेज लॉ" हा लेख जर योग्य सॉफ्टवेअरमध्ये माझ्याकडे उपलब्ध असता तर मला असं "लाजायचं" काय कारण होतं? फारच संशयी दिसता तुम्ही!

नितिन थत्ते's picture

13 Jun 2009 - 11:33 am | नितिन थत्ते

अहो ते मी अतिअवांतर म्हणून टंकले होते. :D या स्मायलीसह.
मनाला लावून घेऊ नका.
(लावून घेतले असलेत तर... सॉरी). :S :SS L) :/ =((

खराटा
(रंग माझा वेगळा)

सुधीर काळे's picture

13 Jun 2009 - 11:28 am | सुधीर काळे

खराटासाहेब,
खरे आहे. आपण कामगार कायदे, कूळकायदा वगैरे करताना वहावत गेलो पण आता पुन्हा दुसर्‍या दिशेने पावले लडू लागली आहेत. आणि त्याला कारणीभूत आहे आय एम एफ ने पिरगाळलेला आपला हात जेणेकरून नरसिंहरावांना मुकाट्याने लायसेन्स राज संपवावे लागले.
माझ्या मते लोकशाहीत असे "push-pull" होतच रहाते!
<<अवांतरः या लेखाच्या चौथ्या परिच्छेदात भारताची प्रगती होण्यास कारणीभूत जी धोरणे लिहिली आहेत (कामगार कायदे, कूळकायदा वगैरे) तशाच धोरणांमुळे भारत कित्येक दशके मागे पडला असे आपल्या देशातील अनेक बाजारवादी लोकांचे मत आहे.>>

नितिन थत्ते's picture

13 Jun 2009 - 11:40 am | नितिन थत्ते

आपल्या देशात ती धोरणे राबवली म्हणून आपला देश मागे पडला असे न-समाजवादी लोक म्हणतात. ती धोरणे न राबवल्यामुळे आणि वाहावत न गेल्यामुळे पाकिस्तान आपल्या कितीतरी पुढे जायला हवा होता. किमानपक्षी आपल्याइतकी तर प्रगती व्हायलाच हवी होती.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

16 Jun 2009 - 12:46 am | विकास

>>>आपल्या देशात ती धोरणे राबवली म्हणून आपला देश मागे पडला असे न-समाजवादी लोक म्हणतात. ती धोरणे न राबवल्यामुळे आणि वाहावत न गेल्यामुळे पाकिस्तान आपल्या कितीतरी पुढे जायला हवा होता. किमानपक्षी आपल्याइतकी तर प्रगती व्हायलाच हवी होती.<<<

एक चूक आहे म्हणून दुसरे आपसूक बरोबर ठरत नसते. :-)

सुधीर काळे's picture

13 Jun 2009 - 12:19 pm | सुधीर काळे

अहो, कायदे कसलेही केले असले तरी पं. नेहरूंच्या "नॉन-अलाइन्ड" धोरणामुळे आपण कुणापुढे हात पसरले नाहींत, त्यामुळे आपल्याला "चकटफू" पैसेही मिळाले नाहींत व म्हणूनच आपण चिवट व सशक्त बनलो असे मला वाटते!

नितिन थत्ते's picture

13 Jun 2009 - 12:25 pm | नितिन थत्ते

*पंडित नेहरूंचे तर सगळेच वागणे भारताच्या दुरवस्थेला कारणीभूत आहे असे आपल्या देशातील मध्यमवर्गीयांचे आवडते मत असते*

खराटा
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

16 Jun 2009 - 12:49 am | विकास

>>पंडित नेहरूंचे तर सगळेच वागणे भारताच्या दुरवस्थेला कारणीभूत आहे असे आपल्या देशातील मध्यमवर्गीयांचे आवडते मत असते<<

पंडित नेहरूंचे तर सगळेच निर्णय योग्य होते असे आपल्याला म्हणायचे आहे का?

-
मध्यमवर्गीय-मध्यममार्गी विकास :-)

नितिन थत्ते's picture

16 Jun 2009 - 10:43 am | नितिन थत्ते

(माझ्या प्रतिसादाला खोडून काढायलाच हवे असे विकासभाऊंना का वाटत असावे?)

येथे नेहरू बरोबर की चूक हे दाखवण्याचा उद्देश नाही. पण ज्या गोष्टींसाठी नेहरूंवर सामान्यतः टीका केली जाते त्यातल्याच काही गोष्टी भारताचा विकास का झाला (आणि त्या गोष्टी केल्या नाहीत म्हणून पाकिस्तान मागे पडला) त्याची कारणे म्हणून सांगितल्या आहेत. हा विरोधाभास दाखवण्यासाठी मी हा प्रतिसाद लिहिला होता.
खराटा
(रंग माझा वेगळा)

सुधीर काळे's picture

13 Jun 2009 - 12:52 pm | सुधीर काळे

पं नेहरूंच्या धोरणाबद्दल "जितक्या व्यक्ती तितकी मते" अशी परिस्थिती आहे. काय बरोबर-काय चूक हा मुद्दा जरासा बाजूला ठेवून जर विचार केला तर एक गोष्ट नक्की की ते होते म्हणून आपण आत्मनिर्भर झालो व कुठल्याच "तबेल्यात" दाखल झालो नाही! (जरी कांहींसे रशियाधार्जिणे झालो तरी)
आपण कुणाकडून भीक घेतली नाही! विकासासठी कर्जे काढली व फेडलीही. म्हणून रेशनिंगसारख्या भयानक परिस्थितीतूनही आपण तावून-सुलाखून बाहेर पडलो. माझ्या लहानपणी कित्येक दिवस भाताशिवाय "कण्या" खाऊन काढावे लागत, पण तसे दिवस काढले म्हणून आज आपण कणखर झालो आहोत असे मला वाटते.
तरुण पिढीला याची कल्पना कमी असेल, पण घरातील वडिलधार्‍या लोकांना विचारल्यास माहिती मिळेल.

सुधीर काळे's picture

13 Jun 2009 - 1:15 pm | सुधीर काळे

काय झाले माहीत नाहीं! मी एकदा लिहिले तर पाचदा पोस्ट झाले!
आपण क्यूबा किंवा उत्तर कोरियाप्रमाणे कधीच "कम्युनिस्ट" झालो नाहीं.

*पंडित नेहरूंचे तर सगळेच वागणे भारताच्या दुरवस्थेला कारणीभूत आहे असे आपल्या देशातील मध्यमवर्गीयांचे आवडते मत असते*

यावरून एक विनोद आठवला.

फोर्ड कंपनीचा संस्थापक एकदा टॅक्सीने घरी आला व बिल दिल्यावर एक डॉलर टिप म्हणून ड्रायवरच्या हातावर ठेवला. ड्रायवर म्हणाला साहेब आपले चिरंजीव पाच डॉलर देतात. तेव्हां फोर्ड सिनियर म्हणाले, "त्याचे वडील श्रीमंत आहेत, माझे नव्हते"

ज्याना कठीण परिस्थितीतून जायची सुदैवाने वेळच आली नाहीं त्यांची मते अशीच असणार व त्याच्या आमच्या पिढीला आनंद वाटतो. एका पिढीत सारे बदलून किती झकास होऊन गेले!

सुधीर काळे's picture

15 Jun 2009 - 10:30 am | सुधीर काळे

आजच्या बातम्या पहाता तालीबानचे "जिहादी" स्वयंसेवक पाकिस्तानी शहरांत हाहाकार माजवून राहिले आहेत. खरंच पाकिस्तानी सरकारने व आय.एस.आय.ने एका भस्मासुरालाच जन्माला घाललेय असंच वाटतंय!

JAGOMOHANPYARE's picture

15 Jun 2009 - 1:53 pm | JAGOMOHANPYARE

बाप कर्मदरिद्री... म्हटल्यावर पोरगे तसेच उपजणार...... शेवटी पाकिस्तान हे फादर ऑफ नेशनचं कारटं...

| हे राम|

नितिन थत्ते's picture

15 Jun 2009 - 2:57 pm | नितिन थत्ते

(|: >:P
जागोमोहनप्यारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

16 Jun 2009 - 1:25 am | विकास

मायावतींनापण यानिमित्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन टाका ;)

हेची फळ काय मम तपाला:-
(While addressing a meeting of MPs and legislators of her Bahujan Samaj Party (BSP) on Saturday, Mayawati called the Father of the Nation a "natakbaaz" (fake). She also distributed pamphlets condemning both Mahatma Gandhi and Congress general secretary Rahul Gandhi for being insincere about the improvement in socio-economic status of Dalits )

नितिन थत्ते's picture

16 Jun 2009 - 10:27 am | नितिन थत्ते

प्रत्येकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायची गरज नाही.
दुसरे म्हणजे गांधींचे दलितोद्धाराविषयीचे विचार/धोरण हे कनवाळू/कृपाळू स्वरूपाचे होते. दलितांना 'दयाबुद्धीने' चांगले वागवावे (एकाच ईश्वराची लेकरे वगैरे) अशी त्यांची विचारसरणी होती. त्यांना आपल्यासारखेच जगण्याचा 'हक्क आहे म्हणून' आपण त्यांच्याशी समानतेने वागले पाहिजे असा दृष्टीकोन नव्हता. (म्हणजे ते समान नाहीयेत पण आपण त्यांच्याशी चांगले वागायला हवे असा काहीसा विचार होता असे माझे मत आहे). त्या दृष्टीने त्यांचे अस्पृश्यतानिवारण कार्य थोडे हीन दर्जाचे (वैचारिक दृष्ट्या) होते असे मला वाटते. म्हणून मी मायावतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाहिये.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

16 Jun 2009 - 9:28 pm | विकास

गांधीजींचे विचार कुणाला पटोत न पटोत, मला त्यांचे सर्वविचार आणि विशेष करून दलीतोद्धाराविषयीचे, अजिबात मान्य नाहीत. त्या संदर्भात आपल्याशी सहमत. तरी देखील, त्यांना नाटकबाज म्हणणे योग्य वाटले नाही. अर्थात मायवती म्हणत असल्या म्हणून आपल्याला पटत असेल तर गोष्ट वेगळी ;) पण विचार करा असेच जर एखादा हिंदूत्ववादी म्हणाला तर त्यावर काय प्रतिक्रीया होतील त्या. त्यात तो मध्यमवर्गीय असेल तर मग काय विचारायालाच नको. मला वाटते यालाच काय ते "डबल स्टँडर्ड" का असेच काहीसे म्हणतात...

>>>त्या दृष्टीने त्यांचे अस्पृश्यतानिवारण कार्य थोडे हीन दर्जाचे (वैचारिक दृष्ट्या) होते असे मला वाटते. म्हणून मी मायावतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाहिये.<<<

अहो सावरकर-गांधीजींचा पण या संबंधात वाद/संवाद घडला होता. सावरकरांना जातच मान्य नाही तर गांधीजींचे तसे नाही. सावरकर म्हणाले की आपण सर्वच हरीची मुले मग कुणाला तरी हरीजन म्हणून आपण समाजात फूट पाडतो, त्यांना सामावून घेण्याऐवजी नकळत वेगळेच ठेवत रहातो. तुम्हाला माहीत आहे, सावरकरांच्या नशिबी त्याबद्दल शाबसकी आली का ते.

असो.

नितिन थत्ते's picture

16 Jun 2009 - 10:25 pm | नितिन थत्ते

>>मायवती म्हणत असल्या म्हणून आपल्याला पटत असेल तर गोष्ट वेगळी
मला याचा अर्थ नीटसा कळला नाही पण मला जो अर्थ वाटला त्याप्रमाणे प्रतिसाद लिहित आहे.

मला पटणारी/न पटणारी गोष्ट कोण म्हणत आहे यावर माझी प्रतिक्रिया अवलंबून नसते. गांधींचे अस्पृश्यतेविषयीचे विचार मला मान्य नाहीत हे मी प्रतिसादात अगोदरच लिहिले आहे. त्यामुळे गांधींवर त्या विषयासंदर्भात कोणी टीका करीत असेल तर मला त्याचे दु:ख नाही.

नाटकबाज या शब्दाबाबतच आक्षेप असेल तर मला काही म्हणायचे नाही. तो आक्षेप असायला किंवा नसायला माझी हरकत नाही.

पुढेही मी गांधींचे या संबंधातील कार्य थोडे हीन दर्जाचे आहे असे लिहिले आहे. एखादा हिंदुत्ववादी असे म्हणाला तरी मी त्यावर काही बोलणार नाही. हिंदुत्ववादी असे म्हणाल्यास त्याचा असे म्हणण्याचा उद्देश काय हे पडताळून पाहण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. कारण सध्याचे हिंदुत्ववादी हे दलितोद्धाराविषयी (त्यांचा हक्क म्हणून) गांधींइतकेही उत्सुक असल्याचे दिसत नाही.

पण सावरकरांचे या क्षेत्रातले कार्य मर्यादित का होईना, गांधींपेक्षा उजवे होते असेही म्हणायला मला अडचण वाटणार नाही.

असो.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

16 Jun 2009 - 11:14 pm | विकास

>>>नाटकबाज या शब्दाबाबतच आक्षेप असेल तर मला काही म्हणायचे नाही. तो आक्षेप असायला किंवा नसायला माझी हरकत नाही.<<<

प्रश्न आपण हरकत घेता का नाही याचा नाही. तर असले हलके शेरे हे अ-हिंदूत्ववादीने (म्हणून मायावती असे सुरवातीस म्हणालो) केले तर चालतात. त्यात उद्देश पडताळून पहाणे आपल्याला गरजेचे वाटत नाही. मात्र एखाद्या हिंदुत्ववाद्याने टिका केली तर मात्र, "हिंदुत्ववादी असे म्हणाल्यास त्याचा असे म्हणण्याचा उद्देश काय हे पडताळून पाहण्याचा प्रयत्न नक्कीच करीन." असे म्हणताना मात्र आपल्याला त्यात वावगे अथवा असमतोल (इम्पार्शल) वाटत नाही.

तीच कथा सावरकरांची, एखाद्या कम्युनिस्टाचे चांगले सांगताना माझ्यासारखा कम्युनिझमचा टिकाकार/विरोधक पण हातचे राखत नाही कारण चांगला हेतू हा चांगलाच असतो तो पक्षापेक्षा अथवा विचारापेक्षा बर्‍याचदा व्यक्तिवर अवलंबून असतो असे प्रामाणिकपणे वाटते. मात्र आपल्यासारख्यांना सावरकरांचे योग्य शब्द देखील मान्य करताना जेंव्हा, "पण सावरकरांचे या क्षेत्रातले कार्य मर्यादित का होईना, गांधींपेक्षा उजवे होते असेही म्हणायला मला अडचण वाटणार नाही," असे म्हणत, किती अडखळावे लागते, यातून एखाद्या प्रामाणिक सामाजीक हेतू पेक्षा पक्षिय अथवा वैचारीक निष्ठाच जास्त योग्य असे आहे का असा नक्कीच प्रश्न पडतो.

Nile's picture

16 Jun 2009 - 1:45 am | Nile

हा हा! कोटी वाचुन जाम हसु आले! :)

सुधीर काळे's picture

15 Jun 2009 - 2:49 pm | सुधीर काळे

हा, हा, हा, हा, हा, हा!
झकास शेरा! एकदम पटला.

पाकिस्तानने झिया उल हक च्या काळापासून आपण शुद्ध इस्लामी राष्ट्र आहोत असे ठरवले त्यानंतर हा भस्मासुर बनला जो आता पाकच्या मुळावर उठला आहे. इस्लाम हा धर्म अत्यंत कडवा व असहिष्णू आहे. सौदी अरेबिया व अन्य श्रीमंत अरब राष्ट्रे जी (केवळ जमिनीखाली तेल सापडले म्हणून श्रीमंत झाली) ती मोठ्या प्रमाणात पैसा पुरवून अनेक मदरसे उघडतात. असल्या मदरशात अत्यंत धर्मपिसाट तत्त्वज्ञान शिकवले जाते. गरीब लोक आणि आपल्या कुटुंबातील एकाला तरी कुराण तोंडपाठ यावे म्हणजे आपल्याला स्वर्गात स्थान मिळेल अशा खुळचट विचारांनी अनेक मध्यमवर्गीय आपल्या मुलांना तिकडे धाडतात. तिथे व्यवहारोपयोगी काही न शिकवता जेहाद शिकवतात. मग ही बाळे डोक्याला कफन बांधून आपला आणि इतरांचा जीव घ्यायला उद्युक्त होतात. याविरुद्ध कोणी टीका केली तर त्याला धर्मभ्रष्ट ठरवले जाते. अशा धर्मभ्रष्टांना मारून टाकणे हे मुस्लिमांचे कर्तव्य आहे असे लोकांच्या मनावर ठसवलेले असते. मग कोर्टकचेरीची भानगड न करता सरळ ह्यांना ठार मारले जाते. ह्या प्रकाराला घाबरून विचारवंत गप्प बसतात आणि हा भस्मासूर माजतच जातो.
कुराण व शरियत ह्यातल्या अनेक गोष्टी कालबाह्य आहेत. त्यात सुधारणा केल्या पाहिजेत हे मुसलमान लोक स्वीकारत नाहीत तोपर्यंत हा प्रकार होतच रहाणार.

Nile's picture

16 Jun 2009 - 2:00 am | Nile

धर्मांधता हेच मुळ असावे असे मलापण वाटते.

"जोपर्यंत मुस्लीम स्वतः शिकुन स्वतःची उन्नती करुन घेत नाहीत तो पर्यंत त्यांची हालत सुधारणार नाही" हे विधान कुण्या एका मुस्लिम तत्वज्ञाने केले होते असे आठवते.

जरा सुधारित विधानः जोपर्यंत मुस्लिम स्त्रिया शिकून तयार होत नाहींत तोवर त्यांची हालत सुधारणार नाहीं. कारण "जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी" हे अगदी १००टक्के खरे आहे. कदाचित यामुळेच मुस्लिम धर्मगुरू स्त्रीशिक्षणावर भर देत नाहींत. आता तर बरीच मुलेही "मदारसा" प्रकारच्या शाळेत जातात, मग मुलींचे काय होत असेल कुणास ठाऊक. सुशिक्षित माता हा हिंदू, ख्रिश्चन व इतर धर्मांच्या सुधारणांमागील मूलभूत पाया आहे.
भस्मासुरापुरतं बोलायचं तर खास "एक्सपोर्ट मार्केट"साठी बनविलेलं हे उत्पादन आता "एक्सपोर्ट सरप्लस" म्हणून "डोमेस्टिक मार्केट"मध्ये खूप खपून राहिले आहे (खरं तर थैमान घालतय) व आता तर इराण हे नवे मार्केट त्याला मिळेल अशी भीती वाटते.
Principle? Whenever angry, blow up something in opposition camp with the help of suicide bombers!
Jai Ho!

विकास's picture

16 Jun 2009 - 9:40 pm | विकास

>>>जोपर्यंत मुस्लिम स्त्रिया शिकून तयार होत नाहींत तोवर त्यांची हालत सुधारणार नाहीं....सुशिक्षित माता हा हिंदू, ख्रिश्चन व इतर धर्मांच्या सुधारणांमागील मूलभूत पाया आहे.<<<

शहाबानो खटल्यात एका मुस्लीम महीलेचाच मुस्लीम समाजातील महीलांच्या साठीचा आवाज होता. काय झाले तो आता इतिहास आहे. शबाना आझमी, टिस्टा सेटलवाड-जावेद, आदी अनेक चळवळ्या महीला या समाजात आहेत ज्यांनी स्वतःच्या धर्मात चाललेल्या एकाधिकार शाही विरुद्ध कधी आवाज केल्याचे ऐकलेले नाही. शिवाय विचार करा कितीतरी मुस्लीम लेखिका आहेत, नायिका आहेत, गायीका आहेत वगैरे वगैरे पण त्यांनी स्वतःला मुस्लीम प्रश्नांपासून दूरच ठेवले.

तुम्ही म्हणाल पण साध्या महीलांचा हा प्रश्न आहे. ते बरोबरही आहे. पण तो सुटण्यासाठी ज्या जगात पुढे गेल्यात त्यांनी आवाज करायला हवा आणि दिशा देयला हवी. हिंदू आणि इतर धर्मियात भारतात आणि इतरत्र असेच होत आले आहे - सर्व पुढे गेलेल्या महीलांनी कुठल्यान कुठल्या रुपात इतर महीलांना पुढे येण्यासाठी वाट तयार केली. दुर्दैवाने शबाना, टिस्टा सारख्या व्यक्ती तसे करत नाहीत केवळ स्वतःची प्रतिमा तयार करतात.

सुधीर काळे's picture

16 Jun 2009 - 11:18 am | सुधीर काळे

आपण लिहिले आहे ते कांहींसे खरे आहे. रशियाने आपल्याला रुपया चलनात शस्त्रे वगैरे दिली व सुरक्षा परिषदेत व्हेटो वापरून काश्मीरच्या प्रश्नावर साथ दिली. पण त्याचे मूळ कारण आपण अमेरिकेच्या तबेल्यात जायला नकार दिला व त्यामुळे अमेरिकेला पाकिस्तानला त्यात सामील करावे लागले. त्यामुळे त्यांची जवळीक वाढली व आपली कमी झाली.
पण याचा फायदा घेऊन पाकिस्तानने खोर्‍याने अमेरिकेच पैसे (डॉलर्स) ओढले जे परत करायची तर अटही नव्हती. याउलट आपण पैसे उसने घेतले व परतही फेडले.
त्यामुळे पाकिस्तानची उच्चभ्रू (एलीट) जनता ऐटीत राहिली व गरीब जनता वैतागून तालीबानच्या मागे गेली.
थोडक्यात काय? पैशाचे सोंग आणता न ये! आणि स्वाभिमानाला पर्याय नाहीं. आपण अभिमानाने वागलो तर पकिस्तानी वागले भिकार्‍यासारखे!

विकास's picture

16 Jun 2009 - 9:44 pm | विकास

>>>पण त्याचे मूळ कारण आपण अमेरिकेच्या तबेल्यात जायला नकार दिला <<<

तेच तर म्हणतोय. तसे जायला पाहीजे असे म्हणायचे नव्हते पण आपण रशियाशी जवळीक करून स्वतळ्चे स्वतंत्र स्थान निर्माण करायला नक्कीच वाजवीपेक्षा जास्त वेळ लावला. त्याऐवजी चीन ने पहा, परमनंट मेंबर होण्यासाठी भारताकडून (थँक्स टू नेहरू - अमेरिकेला भारताला करायला पाठींबा असताना चीनला करा म्हणून बालहट्ट केला!) पण मदत घेतली, अमेरिकेकडूनपण धंदा मिळवला आणि रशियाशीपण संबंध ठेवले पण स्वतःचे सामर्थ्य वाढवतच ठेवले आणि स्वतंत्र अस्तित्वपण ठेवले.

चिरोटा's picture

16 Jun 2009 - 11:19 am | चिरोटा

एके काळी सौदी अरेबिया,अफगाणिस्तानातले धार्मिक लोक हे 'प्रगत' अमेरिकेचे डार्लिन्ग होते.शेख लोकाना खूष ठेवायचे आणि त्याबदल्यात स्वस्तात खनिज तेल उकळायचे हे धोरण अमेरिका/ब्रिटन/पास्चिमात्य राष्ट्रांचे होते.

इस्लाम हा धर्म अत्यंत कडवा व असहिष्णू आहे

असे असते तर त्या धर्माचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर जगभर झाला नसता.अफगाणमधील धर्मांधता ही गेल्या २० वर्षातली आहे.आणि त्याचे मूळ कारण राजकारणातच आहे.
ईराक धर्मांध कधीच नव्हता.७०/८०च्या दशकात अनेक ईराकी कंपन्यांच्या प्रमुखपदी महिला असायच्या.तीच गोष्ट ईराणची.१९७९ साली अमेरिकेच्या पाठिंब्यावर असलेली भ्रष्ट शहाची राजवट लोकानी उलथवली आणि खोमेनि ह्याना सत्तेवर आणले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

रम्या's picture

16 Jun 2009 - 1:43 pm | रम्या

>>इस्लाम हा धर्म अत्यंत कडवा व असहिष्णू आहे

असे असते तर त्या धर्माचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर जगभर झाला नसता
<<

इस्लाम धर्माचा प्रसार झाला तो दहशतीच्या जोरावर, तो धर्म सहिष्णू आहे म्हणून नव्हे! आठवा शिवरायांच्या वेळचा आणि त्यांचा आधीचा काळ. इस्लामी दहशतवाद हा काही या जगाला नवीन नाही. त्याच वय फक्त वीस वर्ष असल्याचा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात?
बाकी तुमचं हे मत म्हणजे तुम्ही सहिष्णू आणि आशावादी असल्याचा पुरावा मानायला हरकत नाही!! :)

आम्ही येथे पडीक असतो!

आजवर अमेरिका पाकिस्तानसारख्या प्याद्यांना पैसे देऊन युद्धात लढायला पाठवत असे. मग ते रशिया असो, वॉर-ऑन-टेरर असो, मग ती प्यादी व्हिएतनामी असोत किंवा पाकिस्तानी असोत किंवा अफगानिस्तानचे जिहादी असोत. अमेरिकन रक्त सांडू नये म्हणून केलेलली ही सोयच म्हणा ना?
एकदा आपले काम झाले कीं मग त्याला फुटवायचे असे चालले होते. पण ओसामा त्यांना पुरून उरला.
याशिवाय सगळीकडे सोयीच्या राजे-रजवाड्यांना, शेखांना व हुकुमशहांना अमेरिकेने पुरस्कार व आर्थिक मदत देऊन सांभाळले होते. इराणचे शहा काय, आमचे सुहार्तो काय, फिलिपीन्सचे मार्कोस काय, किंवा एकदा तर सद्दामही त्यांनी जवळ केला होता. अशांच्या कच्छपी लागून पाकिस्तानी जनतेची जरी वाट लागली तरी सत्तेवर बसलेल्यांनी मुलकी व लष्करी नेत्यांनी आपले उ़खळ भरपूर पांढरे करून घेतले आहे.
इस्लाम का इतका फोफावतो हे एक कोडेच आहे. पूर्वी कदाचित तलवारीच्या जोरावर असेल, पण आज? पैशाचे आमिष? एक गोष्ट मला कधीच कळलेली नाहीं कीं जो धर्म स्त्रियांवर इतकी बंधने घालतो, चार-चार बायकांशी लग्न करायला मुभा देतो अशा धर्मात बायका कशा काय टिकतात? त्या अन्यायाशी लढायला धर्म सोडून बाहेर कां नाहीं पडत? तीनदा तलाक म्हटले कीं घटस्फोट, पोटगीच्या नावाने आनंदी-आनंद, कसलेही अधिकार नाहींत, चेहेरा नेहमी झाकलेला, कसले हे जिणे? पण तरी या स्त्रिया धर्मावर बहिष्कार घालून बाहेर कां नाहीं पडत हे कोडे मला पडते. मी आज इंडोनेशियात रहातो व हे प्रकार रोज बघतो. म्हणून तर जास्तच आश्चर्य वाटते!
पण उत्तर मिळत नाहीं. माझ्या पूर्वीच्या मुस्लिम ड्रायव्हरला मी हे विचारायचो, तर तो नुसता हसायचा! त्यालाही हे कोडेच असेल!

नितिन थत्ते's picture

16 Jun 2009 - 3:40 pm | नितिन थत्ते

>>जो धर्म स्त्रियांवर इतकी बंधने घालतो, चार-चार बायकांशी लग्न करायला मुभा देतो अशा धर्मात बायका कशा काय टिकतात? त्या अन्यायाशी लढायला धर्म सोडून बाहेर कां नाहीं पडत?

वाचून गंमत वाटली. असे धर्मातून फुटणे शक्य असते का? आणि तेही केवळ बायकांना? अगदी पूर्ण समाजगटाला सुद्धा धर्मातून फुटणे शक्य नसते.
कारण फुटूनसुद्धा त्याच समाजाच्या जोडीने रहायचे असते.

या बायकांनी धर्मातून फुटून दुसर्‍या धर्मात जावे म्हटले तर दुसर्‍या धर्मातील बायकांना काही फार मोठे अधिकार आहेत किंवा त्यांचे शोषण होत नाही असे नाही. तर मग फुटून या बायका जाणार कुठे? हिंदू बायकांना तरी असे फुटून बाहेर पडता येईल काय?

भारतातील गैरव्यवस्था, भ्रष्टाचार याला विटून जर एखाद्याने समाजातून फुटायचे ठरवले तर त्याला असे फुटता येईल? हां. आता मी कंटाळून देशच सोडून जायचे ठरवले आणि ते मला जमले तर फुटून जाऊन भारताशी संबंध न ठेवता राहता येईल. पण मला जर भारतातच रहायचे असेल तर समाजातून असे फुटता कसे येईल?

खराटा
(रंग माझा वेगळा)

मराठी_माणूस's picture

16 Jun 2009 - 3:39 pm | मराठी_माणूस

त्या अन्यायाशी लढायला धर्म सोडून बाहेर कां नाहीं पडत?

असे त्याना कोणी आव्हान केले , त्यांचे स्वागत होइल असे आश्वासन दिले आणि अशा काहि घटना घडल्या तर कदाचित त्या हे धाडस करतिल

सुधीर काळे's picture

16 Jun 2009 - 4:13 pm | सुधीर काळे

अहो साहेब, इतके दूर कशाला जाताय? चातुर्वर्णीय प्रथेचा निषेध म्हणून दलित समाज हिंदु धर्म सोडून नवबुद्ध तर आपल्यासमोरच झाला कीं.
बस, या मुस्लिम बायकांना असाच एक बाबासाहेब अंबेडकरांसारखा द्रष्टा आणि खंबीर नेता मिळाला तर या बायका एका रांगेत बाहेर पडतील.

नितिन थत्ते's picture

16 Jun 2009 - 5:29 pm | नितिन थत्ते

अहो दलितांनी संपूर्णसमाज म्हणून धर्मांतर केले. एकट्या पुरुषांनी किंवा बायकांनी नवे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

हुप्प्या's picture

16 Jun 2009 - 5:08 pm | हुप्प्या

इस्लाममधे बायकांना अत्यंत गौण स्थान आहे. आणि त्यात आजतरी काही बदल होणार नाही. काही उदाहरणे
१. पुरुष चार विवाह एकाच वेळी करू शकतात. बायका नाही.
२. तलाक हा केवळ पुरुष देऊ शकतो बायका नाही. केवळ तीनदा तलाक म्हटले की पुरुषाचे काम झाले.
३. पुरुषाने स्त्रीला मारायला परवानगी आहे. त्याला "योग्य" ती कारणे असावीत वगैरे पुस्ती आहे. पण जवळपास कुठलेही कारण ह्या "योग्य" कारणांच्या गटात मारून मुटकून ठोकून बसवता येते इतपत ह्यात लूपहोल्स आहेत.मग मुस्लिम बायका ज्या समाजाच्या जवळपास ५०% संख्येने आहेत त्या समाजसुधारणा का घडवून आणत नाहीत?
नोनी दर्विश नावाच्या मूळ इजिप्तच्या बाईने एक पुस्तक लिहिले आहे त्यात यावर विवेचन आहे. त्यात म्हटले आहे की जिथे असले इस्लामी कायदे आहेत तिथे बायका बायकांवर विश्वास ठेवत नाहीत. कधी आपल्याला घटस्फोट मिळेल आणि आपण रस्त्यावर येऊ ते सांगता येत नाही अशी सततची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर असते. अविवाहित, टाकलेल्या, एकट्या स्त्रीकडे विवाहित स्त्री एक प्रतिस्पर्धी म्हणूनच पहाते. ही स्त्री माझी सवत तर बनणार नाही ना अशी कुशंका कायम असते. त्यामुळे स्त्रियांच्या संघटना वगैरे इतक्या सहज बनत नाहीत. ज्या व्यक्तीला अशी मूलभूत भीती कायम असते ती समाजसुधारणा वगैरे लष्करच्या भाकरी काय भाजणार? म्हणून ह्यात सुधारणा होत नाहीत. आता कदाचित नव्या माध्यमांमुळे स्त्रियांना संघटित होण्याची संधी मिळेल (स्वतःचे स्थान धोक्यात न घालता). पण किती मुस्लिम राष्ट्रे तसे होऊ देतील ते बघायचे.
जाता जाता, पाकिस्तानातील तालिबानीकरणामुळे हिंदुस्थानी संस्कृतीवर आधारित त्यांचे कामधंदे धोक्यात आले आहेत. जसे संगीत, वाद्ये बनवणे आणि वाजवणे, चित्रकला, नाटके, सिनेमे. ह्या सगळ्या गोष्टींना वहाबी पंथाचे पिसाट लोक विरोध करतात त्यामुळे ह्यावर ज्यांचे पोट चालत असे ते देशोधडीला लागत आहेत. ही संस्कृती लयाला जात आहे. पाकिस्तानातील भाषा बदलू लागली आहे. रुळलेले फारसी शब्द बदलून तिथे अरबी शब्द वापरायचा अट्टाहास सुरु झाला आहे.

सुधीर काळे's picture

16 Jun 2009 - 5:16 pm | सुधीर काळे

झकास! अतीशय सुंदर लेख. यावर एक स्वतंत्र लेख आपण लिहावा असे वाटते.
सुधीर काळे

चिरोटा's picture

16 Jun 2009 - 5:33 pm | चिरोटा

फक्त बायकाच बाहेर पडणार? आणि संसार्?आधि म्हंटल्याप्रमाणे ते अशक्य वाटते.इस्लाम सगळीकडे सारखा नाही. पाकिस्तान मधला इस्लाम आणि तुर्कस्तानमधला इस्लाम सारखे नाहीत. उ.दा. तुर्कस्तानच्या सर्वोच्च न्यायालयच्या न्यायमुर्तीपद महिलेने भुषविले आहे,अमेरिकेच्या कितीतरी आधी.पण अर्थातच हे बदल झाले मुस्तफा कमाल अतातुर्क ह्यांच्या धोरणांमुळे.
ईराणमध्ये अजुनही बरेच कायदे पुरुषप्रधान आहेत पण इतर इस्लामिक देशांसारखी बंधने तिकडे स्त्रियांवर नाहीत्.उ.दा. तेहेरानमधे अनेक महिला टॅक्सी चालक आहेत.बहुतांशी विद्यापीठांमध्ये ६०% पेक्षा जास्त मुली आहेत.(भारतातल्या किती राज्यांमध्ये अशी टक्केवारी असेल?)
आजही इराणमधे शरियतचा कायदा आहे पण इराणच्या धार्मिक गुरुनी गेल्या काही वर्षात स्त्री-पुरुष समानतेसाठी अनेक कायदे आणले.
उ.दा. न पटणारी कारणे देवून पतीने तलाक दिल्यास पत्नीस अर्धी मालमत्ता मिळवण्याचा अधिकार आहे.
राष्ट्राच्या जडणघडणीत तेथील संस्क्रुतीचा वाटा मह्त्वाचा असतो.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

नितिन थत्ते's picture

16 Jun 2009 - 5:46 pm | नितिन थत्ते

>>इस्लाममधे बायकांना अत्यंत गौण स्थान आहे. आणि त्यात आजतरी काही बदल होणार नाही. काही उदाहरणे
१. पुरुष चार विवाह एकाच वेळी करू शकतात. बायका नाही.
२. तलाक हा केवळ पुरुष देऊ शकतो बायका नाही. केवळ तीनदा तलाक म्हटले की पुरुषाचे काम झाले.
३. पुरुषाने स्त्रीला मारायला परवानगी आहे. त्याला "योग्य" ती कारणे असावीत वगैरे पुस्ती आहे. पण जवळपास कुठलेही कारण ह्या "योग्य" कारणांच्या गटात मारून मुटकून ठोकून बसवता येते इतपत ह्यात लूपहोल्स आहेत.

हे सर्व १९५५ पर्यंत हिंदूंमध्येही होते. (चार विवाहांविषयी नक्की माहिती नाही. पण असावेच. बहुपत्नित्वाची पद्धत असणारच म्हणूनच मुद्दाम कायदा करून ती रद्द करावी लागली.)
हिंदू पुरुषालातर तीन वेळा तलाक म्हणण्याचेही बंधन नव्हते -तीनवेळा तलाक असे म्हणून त्याग करणे हे अर्थातच समर्थनीय नाहीच. त्याला तर एका वाक्यातच पत्नीचा त्याग करता येत असे.
१९५५चा कायदा होताना देखील त्याला (काँग्रेसमधूनदेखील) प्रचंड विरोध झाला होता.

खराटा
(रंग माझा वेगळा)

सुधीर काळे's picture

16 Jun 2009 - 5:52 pm | सुधीर काळे

मी अलीकडेच तुर्कस्तानला जाऊन आलो. तिथली परिस्थितीही हळू-हळू सनातनवादी होत आहे. आताचे सरकार "खाष्ट" प्रकारात मोडते. पण तुर्कस्तानचे अफगाणिस्तान व्हायला २० वर्षें तरी लागतील. पण तो देश सध्या तरी त्याच (चुकीच्या) दिशेने चालला आहे.

सुधीर काळे's picture

16 Jun 2009 - 8:57 pm | सुधीर काळे

जर फक्त बायकांचाच छळ होत असेल तर बायका एकीने कां बाहेर पडणार नाहींत? फक्त "योजकस्तत्र दुर्लभः"!
समर्थ नेता हवा. अनुयायी लाखानी मिळतील.

नितिन थत्ते's picture

16 Jun 2009 - 9:06 pm | नितिन थत्ते

फक्त बायका कशा बाहेर पडणार? काहीतरीच बॉ तुमचं.

खराटा
(रंग माझा वेगळा)

सुधीर काळे's picture

16 Jun 2009 - 9:01 pm | सुधीर काळे

आपण विषयांतर करतोय! पाकिस्तानातील अराजक बाजूला राहिले व मुस्लिम धर्माबद्दल चर्चा होतेय!

नितिन थत्ते's picture

16 Jun 2009 - 10:27 pm | नितिन थत्ते

सहमत

खराटा
(रंग माझा वेगळा)

सुधीर काळे's picture

17 Jun 2009 - 7:32 am | सुधीर काळे

बायका बाहेर पडल्या कीं पुरुष सुधारतील आणि "लाइनी"त येतील! पण हे माझे शेवटचे विषयांतर!!

चिरोटा's picture

17 Jun 2009 - 9:26 am | चिरोटा

प्रत्येक पुरुषाच्या त्या 'चार चार' बायका इस्लाममधुन बाहेर पडल्या की त्याना हिंदु धर्मात सामिल करायचे आणि मग हिंदु पुरुषानी लग्न करुन हिंदुंची संख्या वाढवायची.अशी मांडणी तर नाही ना करत आहात? :)
(क्रुपया हलकेच घेणे).
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

सुधीर काळे's picture

17 Jun 2009 - 10:53 am | सुधीर काळे

मला वाटलेच होते कीं कुणी तरी असा टोमणा मारणार! हा हा हा हा!