मी काय म्हणतोय....

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
13 Jun 2009 - 7:32 am

And then they say "Gravity is not needed to fall in love!!" So true.So beautiful.
माणुस प्रेमात "पडतो" हे वाक्यच मुळी पिक्चर "पडला",गड "पडला" , सर्कशीतला सायकलस्वार धड"पडला" आणि मग एकदाचा खाली "पडला" या वाक्यांच्या लायनीवर वाटतं.पण तरीही असं "पडणं" कुणालाही हवहवसं, निदान एकदा तरी पडुन पहावं असं वाटायला लावणारं आहे. प्रख्रोग "हृदयरोग" तज्ञ डॉ मुन्नभाइ MBBS ह्यांनी सांगिअतल्या प्रमाणे
कुठल्याही औषधाला जोड हवी "जादु की झप्पी" मिळायची. औषधी जगायला शक्ती देते. "जादु की झप्पी" औषधं घ्यायला उद्युक्त करते!!
तस्मात् माणसानं "जादु की झप्पी" या अनुभवातुन जावच. वरच्या पडण्याचं ते प्रकटीकरण आहे.
आता कदाचित विचारशील हे सगळं "लिहितोस" कशासाठी?"इ मेल " च्या जमान्यात जिथं विचार निर्माण होण्याच्या गतीनच पोहोचवले जातात, तिथं हे "लेटर"(हार्ड कॉपी) कशाला?हे लेटर लिहुन होणार काय आहे?लिहिलं नाही तर काय होणार नाही?
मा़हं उत्तर अगदी साधं आहे. एक्विसाव्या शतकात लोकशाहीचं भक्कम वरदान असलेल्या देशात "Long Live the Queen"का हवं? जेवुन झाल्यावर "अन्नदाता सुखी भव" म्हणत हाताच्या ओंजळित पाणीका घ्यावं ?आपण कुठही जाणार नसलो तरी गोबर्‍या गलाचा गोड पापा घेत छकुल्या बाळाला आपण "चल तुला भूsssssssssssssssssssssर नेतो" असं लाडानच क असेना खोटं खोटं का सांगावं? वकिलांनी नियमित काळा आणि डॉक्टरांनी नेहमी काळा पांढरा कोट किंवा अ‍ॅप्रन का घालावं?लहान लहान बछडे गुरकावत्र, अगदी ऐटित चपळाइ शिकत असतानाही वाघोबानं त्यांना अगदी "पेश्शल" ट्रेनिंग का द्यावं?
ह्यासगळ्याचं कारणं एकच आणि ते हेच की "तसं केलेलं शोभतं" म्हणुन. म्हणुन हे सगळं लिखाण आणि डायलॉगबाजी.

अरे हो ....
काहीतरी सांगणार होतो ना मी?खरं सांगु? सगळच सांगायचय.त्यातलं नक्की काय आधी आणि काय नन्तर ते ठरवायचय.
आणि सांगु तरी काय काय? इथं न सांगण्यासारखं काही नाही. तुला ह्या पत्रात सगळं सांगत बसलो तर कडाक्याच्या थंडीत ....
हिमलयाच्या सीमेवर ऐन रण धुमाळितही आपल्या जरबेचा पहारा देणार्‍या सहकार्‍याला मोकळं करता येणार नाही. त्याचा चार्ज घेता येणार नाही. तुझ्या आठवणी उरात घेउन इथं लढता लढता हौतात्म्य मिळायची संधी पुन्हा दिसणार नाही.
तुझाच
कॅ अशोक
जाता जाता :- A picture is worth thousand words. But a TOUCH is worth millions of picutres!
मला निरोप देतानाचा तुझा स्पर्श अजुन अनुभवतोय.
शब्द थिटे उण्या जाणिवा
स्पर्श तुझा उर्मी देइ जीवना ||
दि ३ मे १९९९

उपसंहार :- दि ४ मे १९९९ वर्तमन पत्राचा ठळक मथळा " घुसखोरांना थोपवताना कॅ अशोक ह्यांना कारगिल नजीक सीमेवर वीर मरण"
उपशीर्षक :- बाल्टिस्तान आणि कारगिल इथे भारतीय सैन्य आणि घुसखोरात धुमश्चक्री सुरु.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

अनामिक's picture

13 Jun 2009 - 9:41 am | अनामिक

मनसाहेब... वरच्या पत्राची तारीख ३ मे १९९९ आहे ज्यात मुन्नाभाई एम बी बी एस ह्या २००३च्या चित्रपटाचा उल्लेख आलाय... हे कसे काय बुवा?

इ-मेल मधून आलेले फॉरवर्डस् इथं छापण्या आधी तपासून तर पहा.

-अनामिक

मुन्नभाइ बद्दलची चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
मात्र .....इ-मेल मधून आलेले फॉरवर्डस् इथं...

ह्याबद्दल निषेध निषेध निषेध
हे कुठल्या ढकलपत्रातुन आलय ते पत्र खुशाल इथं सादर करा
अन्यथा काही आरोप करण्यापुर्वी खातरजमा करुन घ्या ही नम्र पण गंभीर विनंती.
हवं असल्यास माझ्या इथल्या "रेपो" तुम्ही खुश्शाल खात्री करुन घ्यावी इथल्या मान्यवर सदस्यांकडुन.
आपण वेळ काढुन प्रतिक्रिया दिलीत, वाचलत, ह्याबद्दल पुनश्च आभार.

आपलाच,
मनोबा

अनामिक's picture

13 Jun 2009 - 10:02 am | अनामिक

कारगिल नंतर अश्याप्रकारच्या ढकलपत्राचा सुळसूळाट झालेला. आता हेच पत्र जसंच्या तसं वाचलेलं आठवत नाही, परंतू हा ढकलपत्रातून आलेला संदेश आहे असे वाटले म्हणून तसे लिहिले. तो आरोप नव्हता. माझ्या मनात तुमच्या वाटचालीबद्दल कुठलाही किंतू नाही. तुम्ही दुखावला गेला असाल तर मी माफी मागतो. पण वर दिलेले पत्र हे ढकलपत्रातून आलेले नसले तरी ते तुमचे स्वतःचे नाही असे जाणवते (निदान पत्रातल्या कॅ. अशोक यांच्या नावावरून). तुम्ही ते प्रकाशित करण्यापुर्वी कॅ. अशोक यांच्या घरच्यांची परवानगी घेतली आहे का? दुसर्‍यानी लिहिलेलं वैय्यक्तिक पत्र स्वतःच्या नावखाली प्रकाशित करताना ते तुम्हाला कुठून मिळालं आणि ते तुम्ही ईथे का देताय याचं स्पष्टीकरणही तुम्ही दिलेलं नाही. तेव्हा वाचकांनी काय समजावे?

-अनामिक

अनामिक's picture

13 Jun 2009 - 10:33 am | अनामिक

मनसाहेब, मला खालच्या दोन-तीन लिंक्स मिळाल्या कारगिलमधे शहिद झालेल्या जवांनांच्या नावांच्या. त्यात कॅ. अशोक हे नाव कुठे दिसले नाही. ही यादी पुर्ण आहे की नाही ते माहीत नाही, तेव्हा माझी काही चुक असल्यास आधीच माफी मागतो.

http://www.angelfire.com/in2/kargil/
http://www.indianarmy.nic.in/ota/arotakheros.htm
http://ikashmir.net/kargilheroes/
http://www.kashmir-information.com/Heroes/index.html

तुम्हाला कॅ. अशोक (त्यांच पुर्ण नाव काय हो?) यांच्या बद्दल अधीक माहिती असल्यास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तसेच तुमच्याकडे ज्या वर्तमानपत्रात कॅ. अशोक यांच्याबद्दल बातमी आली होती त्याचा काही दुवा आहे का?

-अनामिक

मन's picture

13 Jun 2009 - 11:23 am | मन

हा उल्लेख असला तरीही लेखन पुर्णतः काल्पनिक आहे.
काल्पनिक असलं तरी वरिजनल आहे.
बहुदा हा डिस्क्लेमर आधिच टाकला असता तर बरं झालं असतं.
कॅ अशोक हे नावही काल्पनिक आहे.
असं काही लिहिणं चुक असेल तर सॉरी.(कायद्याचं काटेकोर ज्ञान मला नाही.)
जवानांचा उल्लेख अनवधानाने होउ नये याची काळजी घेइन. शक्य असल्यास कथा दुसरिकडे व़ळवत जाइन.
अवांतरः- लेखन लिहुन तयार होतं. पण पत्र नक्की कुणी कुणाल्का पाठवलय तो भाग अधिक स्प्ष्ट करावा म्हणुन जवानाचा उल्लेख.
थोडक्यात कायः- पत्र तयार होतं ....कारगिल प्रकरण हे "अ‍ॅड्-ऑन" कांपोनंट म्हणुन लिहिण्याच्या भरात घातलं गेलं.(लिहिताना जे जसं येइल तसं मी टंकित जातो....फारसं बांधेसूद करणं सध्यतरी जमत नाही. प्रयत्न नक्की करेन.)

आपलाच,
मनोबा

नितिन थत्ते's picture

13 Jun 2009 - 11:57 am | नितिन थत्ते

जनातलं मनातलं हे सदर साहित्य म्हणून गणले जाते. त्याला काटेकोर अचूकतेची पट्टी लावून मोजू नये असे वाटते. तेथे काही माहितीतील घटनांबद्दल / व्यक्तींबद्दल लिहिले असेल तरच अशी पट्टी लावता येईल.
काथ्याकूट मध्ये मात्र अशी पट्टी लावणे मान्य आणि ग्राह्य असावे.
अनामिक यांचा सौम्य निषेध. (ह. घ्या)
खराटा
(रंग माझा वेगळा)