तीनचाकीवर तीन वर्षाचा मुलगा
मागे मी चालत चालत.
रस्त्यावर दिसणारी गांडुळे पाहून 'वर्म, वर्म' मोजत होता तो.
गांडूळांना वाचवण्याकरता
दिली दिशा मी त्याच्या सायकलीला ..एक दोनदा
त्याने कडेला दिसणारी रानटी फुले बघितली..उतरला खाली
एक फूल घेऊन म्हणाला, "आय विश, आय विश माय मॉम , डॅड, ताई, आज्जी'
हातात आणखी एक फूल घेऊन
उतारावर सुसाट पुढे निघून गेला.. मी जाईस्तोवर
एका गांडुळावर बूट ठेवून ..गेला पुढे .
मी रागावले.. बोलले त्याला..
तो मागे फिरला, वाटेत अनेक मेलेली गांडुळे होती.. कधीचीच..
प्रत्येक गांडुळाजवळ जात
आय विश आय विश असे फुटफुटला
मला म्हणाला, ' आता सगळी उठून हलू लागतील,
विगल स्वाड्ल करतील'
'आय विश'
प्रतिक्रिया
9 Jun 2009 - 6:43 pm | मुक्तसुनीत
कोलटकर मीट्स मर्ढेकर :-)
(कृपया हलके घ्या. )
9 Jun 2009 - 6:59 pm | श्रावण मोडक
दोनदा वाचली, काय बोलावे हे सुचत नाहीये. प्रतिसाद राखीव असे तूर्त म्हणतो.
9 Jun 2009 - 7:30 pm | चतुरंग
वाखाणण्यासारखी असते ती मरण कल्पू शकत नाहीत. झोपणे आणि जागे होणे असेच वाटत असते.
चतुरंग
9 Jun 2009 - 7:35 pm | धनंजय
वर्मावर बोट ठेवले छोट्या मुलाने.
9 Jun 2009 - 7:59 pm | निशिगंध
वर्मावर बोट ठेवले छोट्या मुलाने.
वर्मावर बुट ठेवले छोट्या मुलाने.
9 Jun 2009 - 7:53 pm | वेताळ
पाय ठेवला त्या छोट्या मुलाने. बिचारा नंतर वरमुन गेला असेल "आय विश ... आय विश"
कविता वाचल्यावर १२वीत असताना गाडुंळ व बेडकाची केलेली हत्या मला आठवली. अगांवर शहारा आला. माझी त्याची माफी मागायची राहुनच गेली.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
9 Jun 2009 - 8:04 pm | Nile
ओह! मला वाटले मुलगा म्हणाला: आय विश "आय" न्यु व्हॉट आय विश! ;)
10 Jun 2009 - 2:25 am | प्राजु
आऽऽऽई!!!
छान आहे कविता. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Jun 2009 - 8:08 am | विसोबा खेचर
ईऽऽऽऽ!!
गांडुळांची कायच्याबाय कविता!
जाम समजली नाही!
अगं सोनाली, तू अश्या चमत्कारिक कविता केव्हापासून करायला लागलीस?! :)
बाकी काय? मजेत ना? आज बर्याच दिवसांनी मिपावर? तिकडची सर्व मंडळी ठीक?! :)
तात्या.