अंतराळ

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
9 Jun 2009 - 8:51 am

अंतराळ हा तुझाच, पंख तुला स्वप्नांचे
चंद्रबिंब प्रतिभेचे, तारांगण शब्दांचे

या विशाल अंबरात उंच उंच विहरत जा
साद देतसे दुरून आमंत्रण पक्ष्यांचे

वाजते दिशांमधून मंद धून वा-याची,
इंद्रधनू गुणगुणते भावगीत रंगांचे

शांत या जलाशयात नाव बुडे किरणांची,
भांडारच जणु लुटले कुणि सुंदर रत्नांचे

पंखांवर नभ तोलुन मानस वाचत फिरते,
बंधमुक्त पाखरू तुझ्या ऋणानुबंधांचे

मनकवड्या पाखरास गुपित मुळी सांगु नको,
अवघ्या काही क्षणांत होईल ते विश्वाचे!

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

9 Jun 2009 - 9:15 am | मदनबाण

मनकवड्या पाखरास गुपित मुळी सांगु नको,
अवघ्या काही क्षणांत होईल ते विश्वाचे!
एकदम मस्त... :)
मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

दत्ता काळे's picture

9 Jun 2009 - 11:28 am | दत्ता काळे

इंद्रधनू गुणगुणते भावगीत रंगांचे

- हि कल्पना फार आवडली.

जागु's picture

9 Jun 2009 - 2:06 pm | जागु

सुंदर.

मराठमोळा's picture

9 Jun 2009 - 2:25 pm | मराठमोळा

सुंदर कविता!!!

आवड्ली :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

ऋषिकेश's picture

9 Jun 2009 - 2:28 pm | ऋषिकेश

ठिक वाटली

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विसोबा खेचर's picture

10 Jun 2009 - 8:01 am | विसोबा खेचर

मनकवड्या पाखरास गुपित मुळी सांगु नको,
अवघ्या काही क्षणांत होईल ते विश्वाचे!

या ओळी आवडल्या..!

तात्या.

प्राजु's picture

10 Jun 2009 - 8:12 am | प्राजु

शांत या जलाशयात नाव बुडे किरणांची,

जबरी कल्पना. :)
खासच !!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/