निसर्ग माझा सोबती
रममाण मी निसर्ग संगती
डोंगर दर्या मने हिंडती
तरंग लहरी मी नदी-सागरी
माय बाप मज वृक्ष वल्ली
फळे फुले ती सखे सोबती
फुलपाखरे ती गोंडस हसरी
कोकीळ स्वरात मज धुंदी
मयुरासंगे तन डोलती
पवन मुक्त मज छेडती
वर्षा संगे स्वप्ने ओली
दवस्पर्श तो रोमांचकारी
ग्रिष्म वसंती आशा हिरवी
शेत्-आगर ती अन्नदात्री
विहीरी-तलाव तृष्णा भागती
चंद्रचांदण्यांची दिपावली
विजेची ती आतषबाजी
सुर्य बिंबाचे तेज ललाटी
संध्येची ती छाया अंतरी
प्रतिक्रिया
5 Jun 2009 - 7:51 pm | मदनबाण
व्वा...अगदी हिरव गार वाटल. :)
(विश्व पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.