खेळ जुने-नवे

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
3 Jun 2009 - 4:22 pm

पुर्वीचे खेळ म्हणजे पकडा-पकडी, लपाछूपी, डबाइसपैस, विठी दाडू, गोट्या, आंधळी कोशिंबीर, डोंगराला आग लागली, तळ्यात मळ्यात, संत्र लिंबू, आम्ही तुमच्या पाण्यात, रंग रंग कोणता रंग, म्हातारी म्हातारी, पायता पायता, आट्यापट्या, रुमाल उडवी, पतंग उडविणे, चाक फिरविणे (गाडा) आबादबी, खांबापकडी, आणि असे बरेचसे खेळ होते. ह्या खेळांमधून मुलांचे मनोरंजन तर होतच होते शिवाय त्यांचा व्यायामही होत होता.

तसेच काही खेळ होते जसे कवड्या उडविणे, अटक्-मटक, भोवरा फिरवीणे, चिठ्ठी चिठ्ठी, भातुकली ह्या खेळातुन मुलांचे निखळ, निरागस मनोरंजन होत होते.

काही बैठे खेळ होते जसे बुद्धीबळ, सापशिडी, व्यापार, लुडो, कोडी घालणे, गोष्टी सांगणे ह्यातून मुलांचा बौधिक विकास होत होता.

आता काळ बदलला आई बाबा दोन्ही नोकरी करु लागले आहेत. मुलांना द्यायला खुप कमी वेळ आहे. नोकरी मुळे म्हणा की न पटल्यामुळे कुटुंबे विभक्त झाली आहेत. घरात जुने खेळ खेळण्यासाठी आजी आजोबा नाहीत, मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदाने नाहीत जागा अपुरी आहे मग मुलांना. ह्या धकाधकीच्या जीवनाचा फायदा उठवून जुने खेळ कालबाह्य ठरवून व्हीडीओ गेम, कॉम्प्युटर गेम, कार्टून फिल्मस ही ह्या परकीय खेळ, मनोरंजनांनी धुमाकूळ घातला आहे.

हल्ली जे कार्टून फिल्म दाखवतात ते लहान मुलांचे आहेत अस वाटतच नाहीत. त्यातील बरीचशी पात्र हिंसक असतात. काही फिल्मस मधे तर हिंदी-इंग्लिश चित्रपटांप्रमाणे प्रेमकहाण्याही असतात. काही पौराणीक फिल्मही चालू आहेत. हा चांगला उपक्रम आहे, पण ह्यातील बरीचशी माहीती बनावट असते. त्यामुळे मुलांना योग्य माहीती मिळत नाही.

हे खेळ, मनोरंजन कॉम्पुटर, टी.व्हीच्या स्क्रिनवर असल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर परीणाम होतच आहे शिवाय मुलांच्या मनावर आई वडीलांपेक्शा जास्त वेळ कार्टून, गेम मध्ये घालवल्यामुळे अशा कार्टून चे संस्कार मुलांच्या मनावर रुजत चालले आहेत. तासन तास ते खेळ आणि टीव्ही पाहील्यामुळे शरीराचा व्यायाम तर खुंटलाच आहे. मुल सुस्त, हट्टी बनत चालली आहेत.अर्थात ही समस्या प्रत्येक घरात असेल असे नाही. अजुनही बरीच एकत्र कुटूंब आहेत, विभक्त असले तरी आई वडीलांचा मुलांना पुरेसा सहवास आहे.

पुर्वी मुलांना वाचनाचे, मातीची भांडि बनविण्याचे, चित्रकलेचे, तिकीट जमा करणे, नाणी जमा करणे, कागदांच्या वस्तू बनवणे व इतर अनेक असे छंद होते ज्यातून त्यांची कल्पना शक्ती वाढत होती.

पण आता बाजारात रेडीमेड क्ले सकट साचे मिळू लागले आहेत. रंगित टॅटु मिळू लागले आहेत. रेडीमेड चित्र रंगवायला मिळत आहेत. त्यामुळे मुलांच्या कल्पना साचेबंद झाल्या आहेत. वाचनाची गोडी मुलांमध्ये कमी झाली आहे त्यामुळे मुलांना बोधपर गोष्टी, जनरल नॉलेज, इतिहासाची माहीती ह्याला मुकावे लागत आहे.

ह्या सगळ्यामध्ये दोष मुलांचा वा पालकांचाच आहे अस नाही म्हणता येणार. दोष परिस्थीतीचा आहे. पण ह्यातून ही समस्या पालकांमार्फत दूर होऊ शकते. जेवढा वेळ मिळेल त्यातून पालकांनी स्वतः मुलांबरोबर लहान होऊन जुन्या खेळांची माहीती द्यायला हवी. बोधपर गोष्टी सांगायला हव्यात. कुठले कार्टून चांगले आहेत ते निवडून द्यायला हवेत. स्वतःवाचून मुलांमध्ये वाचनाची गोडी मुलांना लावायला हवी. कुठल्या कलेत आपल्या मुलाला रस आहे हे ओळखून त्या कलेत त्याला प्रोत्साहन द्यायला हवे.

चु.भु.द्या.घ्या.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

3 Jun 2009 - 4:28 pm | विनायक प्रभू

वर उधृत केलेले खेळ सगळ्यांच्या जीवाला चांगले

मराठमोळा's picture

3 Jun 2009 - 4:38 pm | मराठमोळा

खेळ शारिरिक व बौद्धिक विकास तर साधतातच पण उत्तम चारित्र्य सुद्धा घडवतात.
आजकाल लहान मुलांनी मैदानी खेळांकडे पाठ फिरविली आहे आणी फास्ट फुड खाण्याकडे कल वाढलेला आहे. दुरचित्रवाहिन्या, संगणक यामुळे मुले हिंसक आणी हट्टी बनत आहेत हे खरे आहे. इथे पालकांचे काम खुप महत्वाचे ठरते.

खेळासंबंधी नसला तरी आजकालच्या मुलांच्या स्वभावाबद्दल पुर्वी यासंदर्भात मिपावर मी एक चर्चाप्रस्ताव मांडला होता.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

विनायक प्रभू's picture

3 Jun 2009 - 4:59 pm | विनायक प्रभू

उत्तम प्रतिसाद मराठमोळा शेठ

अवलिया's picture

3 Jun 2009 - 6:33 pm | अवलिया

बोला पंढरीनाथ महाराज की जय !

तर मंडळी, मी कुठे होतो ? हो इथेच होतो की.....
मुलांना बाहेर खेळायला पाठवत चला ( अग एय कशाला त्याला बाहेर पाठवतेस ? कपडे मळतील ना?)
मुलांमधे मिसळु द्यायला हवे, म्हणजे कसे टिम बिल्डींग होते ( नको, मुलांमधे जातो आणि शिव्या शिकुन येतो)
पडतील झडतील, त्यांचे ते उठतील, शिकतील हळु हळू ( गुडघे फोडुन घेईल तर परत डॉक्टरची बिले वाढ्तात)
नवीन गोष्टी शिकतात, व्यवहारी बनतात (नाही त्या गोष्टी ऐकतो आणि विचारत बसतो, बिनडोक साला)
सारखे टीव्ही आणि अभ्यास काय कामाचा? (खेळुन काय भले होणार आहे? नोकरी का मिळणार आहे?)
नंतर आहेच कामाचा रगाडा ! खेळु द्या!! (एकदा का नोकरीला लागला, दोनाचे चार झाले की सुटलो)

तर मुलांना खेळायला पाठवा !! (बस रे मुकाट्याने अभ्यास करत. अग एय दार लावुन घे, यायला उशीर होईल, पार्टी आहे)

बोला पंढरीनाथ महाराज की जय !

(अविवाहित निपुत्रिक) अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jun 2009 - 6:41 pm | परिकथेतील राजकुमार

हाण तेज्यायला !

काही ठिकाणी हे अगदी असेच घडते. मुलांचे बालपण अनावश्यक अपेक्षांच्या ओझ्याखाली चिरडले जाते.

अवांतर :- आमच्या सोसायटीतले बालगोपाळ मात्र २४ तास उच्छाद मांडत असतात :(

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

3 Jun 2009 - 4:47 pm | अवलिया

वा ! उत्तम लेख.

--अवलिया

अनामिक's picture

3 Jun 2009 - 5:00 pm | अनामिक

चांगला लेख आणि वास्तव दाखवणारा.

-अनामिक

अमोल केळकर's picture

3 Jun 2009 - 5:05 pm | अमोल केळकर

ह्या खेळा बद्दल माहिती नाही.
'डोंगराला आग लागली' :|
कसा खेळला जातो? /जात होता?

--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

पर्नल नेने मराठे's picture

3 Jun 2009 - 6:18 pm | पर्नल नेने मराठे

=)) मी हि खेळ्लेय हा पण आता आथ्व्त नहिये
चुचु

विनायक प्रभू's picture

3 Jun 2009 - 5:29 pm | विनायक प्रभू

जरा जास्त तिखट खा.
खेळ आपोआप खेळशील

:))

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

अमोल केळकर's picture

3 Jun 2009 - 5:55 pm | अमोल केळकर

=)) =)) =)) =))
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

सायली पानसे's picture

3 Jun 2009 - 5:39 pm | सायली पानसे

जागु छान लिहिल आहेस... अगदी खर आहे....कार्टुन्स बद्दल तर काय विचारुच नाही आजकाल... मी फक्त टॉम अँड जेरी , नॉडी ..बघु देते मुलांना. बाकि आपणच सवय लावल्याशिवाय त्यांना खेळाची आणि वाचनाची आवड लागत नाही.
लेख खुप छान आहे.

मस्त कलंदर's picture

3 Jun 2009 - 6:09 pm | मस्त कलंदर

टॉम अँड जेरी माझा सगळ्यात आवडता प्रोग्राम.. कधी कधी पोपाय पण पाहते.. बाकी कार्टून या विषयात मला गती कमीच.. एकदा बहुधा मटामधे लेख आला होता.. "शिनचान" बद्दल.. म्हणे हा मुलगा इतका आगाऊ नि फटकळ आहे.. की तो प्रसंगी आईबाबांचा नि शिक्षकांचाही अगदी लीलया अपमान करतो.. ते पाहून मुलं उद्ध्ट बनताहेत... म्हणून आपल्याकडे त्यावर बंदी घातली होती.. बहुतेक हंगामावरती ती मालिका पुन्हा चालू झालीये..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jun 2009 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार

वाह वाह जुन्या आठवणी जाग्या केल्या ग बाई, जागु रे जागु रे जागु रे ;)

आमचे आवडते कार्टुन म्हणजे 'डोरेमॉन' , मी खरच पंखा वगैरे आहे त्या कार्टुनचा आणी रात्री झोप येत नसेल तर 'करेज द कॉवर्डली डॉग'. आधी घरी डिश वगैरे प्रकार न्हवता, आता आल्या मुळे धिंगाणा असतो नुसता. त्यात मी फक्त कार्टुन बघतो, मग आमच्या राजमाता म्हणतात "घोड्या नुसता वयानी वाढला आहेस, अक्कलेच्या नावानी शुन्य. कधी मोठा होणार काय माहीत ?" मग मी निरागसपणे "फॅशन टीव्ही लावु का ?" विचारतो मग आम्हाला अचानक लाटणे अथवा झाडुचा प्रसाद मिळतो.

अवांतर :- मराठमोळा अ प्र ति म प्रतिसाद बर का.

शिझुकाचा पंखा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

चतुरंग's picture

3 Jun 2009 - 7:08 pm | चतुरंग

वेळ नाही ही ओरड होऊनही आता मला वाटते जवळपास १५ एक वर्ष होत आली आहेत! पालकांनी निष्क्रीयता सोडायला हवी तरच ह्यावर मार्ग निघेल. नुसते ओरडून उपयोग नाही.
२० - २५ वर्षांखाली परिस्थिती बरी होती अफाट वहाने, गर्दी असे फार नसे. सुरक्षितताही खूप होती मुले पळवणे वगैरे प्रकार फारसे नव्हते, गुंडगिरी तुलनेने कमी होती अशावेळी मुलांना एकटे-दुकटे किंवा इतर लहानग्यांबरोबर मैदानावर पाठवणे शक्य होते. एकत्र कुटुंबामुळेही परिस्थितीत फरक होता. आता तशी स्थिती नाही. मुलांना असंख्य प्रकारचे धोके वेढून आहेत. काही मिनिटांचा अवकाश आणि होत्याचे नव्हते घडू शकते त्यामुळे पालकांनीच मुलांना वेळ देणे जरूर आहे त्याला सध्यातरी पर्याय नाही.
आपण पालक त्यांच्यासाठी काय करतो? रोज एखादा तास त्यांच्याबरोबर जवळच्या शाळेच्या/महाविद्यालयाच्या मैदानावर जातो? टिवी समोर स्वतः कमी बसतो? मुलांनी सतत अभ्यासच करायला हवा असा धोशा कमी करतो?
मुलांनी रोज अभ्यास जसा करायला हवा तसे रोज खेळलेच पाहिजे असा आग्रह धरतो? खेळात लागल्यावर त्याच्यावर/तिच्यावर न ओरडता ते समंजसपणाने घेतो? तुमच्या घरी त्याच्या/तिच्या सवंगड्यांना मनमुराद बागडू, खेळांचा पसारा करु देतो?

मुलांना हवा असतो तो मोकळा वेळ आणि समवयस्कांबरोबर भरपूर आरडाओरडा, पळापळ, धावणे. भरपूर पळून लालबुंद चेहेरा होऊन, छातीचा भाता धपापणार्‍या मुला/मुलीचं तुम्ही कधी कौतुक केलंय? वा काय मस्त दमला आहेस रे असं कधी म्हटलंय?
त्यांना आकडे, मुळाक्षरं, गणितं यायला हवीत म्हणून रागावताना; त्यांना पोहायला आलं पाहीजे, सायकल आली पाहीजे, झाडावर चढायला आलं पाहीजे असाही आग्रह धरा! ते गरजेचं आहे. अशा गोष्टीतून मुलांचा आत्मविश्वास वाढतो (आमच्यावेळी असं म्हणायला कोण होतं असा सूर नको - कारण त्यावेळच्या परिस्थितीची तुलनाच होऊ शकत नाही बर्‍याच गोष्टी करुन घ्यायला वडीलधारे असत आणि मोठ्या भावंडांचं बघून लहानगे शिकत. सध्याच्या मुलांचा एकटेपणा भयानक असतो. एकदा त्यांच्या मानसिकतेचा विचार करुन बघा. फक्त खाऊ आणि खेळणी त्यांना नको असतात.)

थोडी मोठी मुले/मुली असतील तर त्यांना तुमच्याबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला यायला सुद्धा आवडते. शनिवार्/रविवार पैकी कधी मुलांबरोबर सायकल चालवून बघा मजा येते.
टीवीसमोर स्वतः बसणे कमी करा मुले आपोआप कमी करतात कारण ती जे बघतात तेच करणार, ओरडून उपयोग नाही (जाता जाता - माझ्याघरी गेली पाच वर्षे टीवी नाहीये एकदाही त्याची कमी जाणवली नाही!
मी माझ्यासाठी सायकल घेतली आहे आणि मुलाबरोबर चालवतो, त्याच्याबरोबर आणि त्याच्या मित्रांबरोबर इथल्या सोसायटीत बास्केटबॉल खेळतो. खेळणारे पालक इथेही कमीच.)

चतुरंग

दत्ता काळे's picture

3 Jun 2009 - 7:43 pm | दत्ता काळे

फार चांगला धागा कारण हा नेहमी विचार करायला लावणारा विषय आहे. चतुरंगजीचं म्हणणं अगदी पटलं, पण ..
अश्या खूप गोष्टी आहेत कि ज्यातून मुले खेळण्याचा आनंद उपभोगू शकतात आणि त्यात बुध्दी आणि शारिरीक व्यायामसुध्दा होतो. उदा. माझ्या मित्राच्या मुलाला ट्रेकींग आवडते, जंगल भटकंती आवडते त्याचबरोबर तो दुर्गप्रतिकृती करण्याचा प्रयत्न करत असतो. अश्या अनेक वेगळ्या गोष्टी असू शकतात. मित्रांसोबत जवळपासची भटकंती करण्याजोगी ठिकाणे बघायला जाणे, छंद म्हणून विविध वस्तू तयार करणे, घरातल्या बिघडलेल्या वस्तूंची जुजबी दुरुस्ती असेल तर ती करणे, इ. अनेक गोष्टी करता येऊ शकतात.

टि.व्ही.मुळे मुलांना खेळाच्या बाबतीतसुध्दा आवड-निवड निर्माण झालेली आहे. ते बहुतेक खेळ खर्चिक आहेत आणि त्यातून मुलांनी त्यात सातत्य राखले नाही, कि त्याचा कुठ्ल्याचप्रकारे फायदा होत नाही. आजकालच्या मुलांना वाचनाचासुध्दा नाद नाही, नाहीतर त्याचासारखा विरंगुळा नाही.