'सप्रे'म नमस्कार !
परवा म्हणजे रवेवार ३१ मे '०९ रोजी , गडकरी रंगायतन ठाणे येथे "बांधण" प्रतिष्ठान तर्फे मराठी गज़लांचा सुरेख कार्यक्रम झाला.त्यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री आप्पा ठाकूर यांनी त्यांची एक अप्रतिम गझल सादर केली ती पुढे देत आहे.
फारच सुंदर अशी लय आणि गेयता आहे या गझलीला , खेरीज आपांच्या आवाजात कै.शांता जोग यांच्या आवाजातील कंप पण असल्याने त्यांनी ही गझल म्हटलेली ऐकताना ती कधी संपूच नये असे वाटत होते ! एक फारच सुखद अनुभव !
पुढील मोठा कार्यक्रम पुणे येथे होणार आहे २०१० सालचा , लोकसत्ता, म.टा. मधेजाहिरात येतेच , मी पण कळवीनच मिपा करांना !
बाकी आहे.....
आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे
मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे !
आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदरगेली
संध्येची मज फिकीर नाही , दुपार बाकी आहे !
आधाराने कसेबसे मज जगावयाचे नाही!
जगण्यासाठी मनात उर्जा चिकार बाकी आहे !
स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही,
फाटत आलो , तरी भरजरी किनार बाकी आहे !
सर्वा थरावर खरेच माझे जगून आता झाले,
माणुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे !
सरणावरती अता खरोखर निघेन आनंदाने,
पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे !
प्रतिक्रिया
2 Jun 2009 - 9:20 am | मदनबाण
व्वा..सॉलिड्ड... :)
उदयराव ही गझल इथं दिल्या बद्धल धन्यवाद... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
2 Jun 2009 - 8:57 pm | Dhananjay Borgaonkar
लैइइइइइइइइइ भारी गजल आहे...
अजुन असतील तर प्लीज लवकर पाठ्वा....
2 Jun 2009 - 9:18 pm | प्राजु
अ फ ला तूऽऽऽऽन!!!!!!!!!!!!!!!!!!
दुसरा शब्द नाही. :)
हॅट्स ऑफ!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Jun 2009 - 9:29 pm | चतुरंग
अत्यंत साधे सोपे शब्द आणि अतिशय परिणामकारक काव्य असा सुरेख संगम! :)
भरजरी किनार आणि मृत्यूचा नकार भन्नाटच कल्पना आहेत!!
चतुरंग
2 Jun 2009 - 9:32 pm | लवंगी
शब्दनि शब्द सुंदर.. ओळी-ओळीतून कस जगाव ते सांगीतल आहे. अस जीवन जगता आल पहिजे!!!