आग लागो, `तसल्या' नजरेला!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
11 Feb 2008 - 5:36 pm

तसल्या नजरेनं तुला कधी पाहिलंच नाही रे (राजा!)
ज्या वाक्‍यांची अस्मादिकांना सर्वाधिक तिडीक आहे, (आणि तरीही "कोवळ्या' वयात जे किमान दहा-बारा वेळा तरी ऐकावं लागतं,) अशापैकी एक वाक्‍य.

परवा "असंभव'मधला एक लाडिक, मधाळ सीन पाहताना हे वाक्‍य डोळ्यासमोर नाचत होतं. नको-नको म्हणत असताना मन पुन्हा कॉलेजच्या दिवसांत गेलं.

डोंबलाची "तसली नजर'!

एकतर प्रेम आहे किंवा नाही!
तू मला आवडतोस, किंवा नाही!"
कधीपासून वाट पाहत होते तुझ्या या प्रश्‍नाची' किंवा "तोंड पाहिलंयस का आरशात?'

एखाद्या मुलीला "प्रपोज' केल्यानंतर उत्तरादाखल तिचा वरीलपैकीच काहितरी पर्याय असायला हवा, अशी आपली आमची साधी, सरळ अपेक्षा.

ही "तसल्या नजरे'ची काय भानगड?आम्ही तर आयुष्यभर (हो, हो, बायकोची नजर चुकवून अजूनही!) पाहण्यात, संपर्कात, माहितीत आलेल्या प्रत्येक मुलीला "तसल्या' नजरेनं पाहत आलो आहोत.

"तसल्या' म्हणजे वाईट नजरेनं नव्हे. तर हिच्याशी आपलं नातं काय? म्हणजे ही आपली संभाव्य बायको, जवळची मैत्रीण, खास मैत्रीण, नुसतीच मैत्रीण, नुसतीच परिचित, बहीण, किंवा यापैकी कुणीच नाही या वर्गवारीत पहिल्या एक-दोन भेटींतच (जमल्यास पहिल्याच भेटीत) तिची रवानगी करत आलो आहोत.

"आमची नुसतीच मैत्री आहे. एकमेकांचा तशा दृष्टीनं विचारच केला नाही अजून,' असला खोटारडेपणा आपल्याला आयुष्यात कधी जमला नाही, जमणार नाही.अरे हा काय तमाशा आहे?म्हणजे, एवढी वर्षं सांडासारखे उधळलात...गावभर बोंबलत फिरलात...मिळेल त्या मुलीशी/मुलाशी ओळख काढायला, लाईन मारायला रक्तच नव्हे, (बापाचे) पैसेही आटवलेत. तेव्हा कुठे गेली होती तुमची "तसली नजर'? अरे? एकदा-दोनदा-तीनदा-दहादा भेटलेल्या मुलाकडे/मुलीकडे तुम्ही मैत्रीच्या पलीकडे कुठल्याच दृष्टीने पाहिलेलं नाही? तिच्यात तुम्हाला संभाव्य बायको, सहचारिणी दिसलीच नाही? कसली तुमची नजर?

हिंदी पिक्‍चर पाहताना तर दरवेळी या संवादांनी आपलं डोकं उठत आलं आहे. ते दोघं एकमेकांशी उसासत, धपापत, (जमल्यास) अंग घुसळत बोलतात. एकमेकांना सूचक हावभाव, संवादांची देवाणघेवाण करतात. पण प्रत्यक्ष निर्णयाची वेळ आली, की मात्र एकमेकांबद्दल "प्रेम' असल्याच्या भावनेनं त्यांना धक्काच बसतो. त्यांची "तसली नजर' तडमडते मध्ये.

सब बकवास है. "तसली नजर' बिजर काही नाही. अंगाशी आलं की माणसं हात आखडता घेतात. पळवाटा आहेत सगळ्या. खरं बोलायची हिंमत नसते लोकांमध्ये.

-------

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

11 Feb 2008 - 6:09 pm | मनस्वी

ताक घुसळणे माहीत होते.

पळवाटा कसल्या? "तू माझ्या लायकीचा नाहीस" / "मला दुसरा कोणीतरी आवडतो" / "माझ्या अपेक्षा वेगळ्या आहेत" / "मला सध्या या भानगडीत पडायचे नाही", असे बोलून समोरच्याला दुखवण्यापेक्षा हे सरळ साधे उत्तर.

ऐकणार्‍याला भावना पोहोचल्या म्हणजे झाले!

नाहीतर समोरचा काही पिच्छा सोडत नाही!

(ताकप्रेमी) मनस्वी

जुना अभिजित's picture

11 Feb 2008 - 7:38 pm | जुना अभिजित

ठीक आहे म्हणायचं मग कसल्या नजरेनं पाहिलंस ते तरी सांग.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्राजु's picture

11 Feb 2008 - 8:59 pm | प्राजु

तसल्या नजरेनं नाही पाहिलं... याचा अर्थ सरळंच ना, की तू मला नवरा म्हणून किंवा सहचारी म्हणून नाही अवडत. माझा मित्र आहेस..
कारण मुलीची नव-याकडून वेगळी अपेक्षा असू शकते आणि एका चांगल्या मित्राकडून वेगळी. मित्र हा जर नव-याची अपेक्षा पूर्ण करणार नाहि असे वाटले तर तो मित्र नवरा नाही होऊ शकणार तिचा. आणि तो चांगला मित्र असेल तर गमवावे असे कोणाला वाटेल? मग "मी तुझ्याकडे त्या नजरेनं नाही पाहिलं" यात काय चूक?

- प्राजु

प्राजूताई,
आजकालचे जग पक्के 'व्यवसाईक' आहे आणि त्यात 'प्रेम' नावाचे नाटक तर मुलींकडून अतिशय जबरदस्त पद्धतीने केले जाते.
मला सांगा जरा आपण आपल्या 'कॉलेज' आणि 'व्यवसाईक जिवना'च्या पहिल्या काही अध्यायाचा विचार केला तर पोरींचा स्वार्थीपणा हा ढळढळीत पणे दिसून येतो [ याला काही सन्माननीय अपवाद आहेत पण एकंदरीत हा निष्कर्ष खरा आहे असे म्हणायला हरकत नाही.]

आपल्या गरजेच्या वेळी मुलांची मदत घेताना , स्वताच्या अध्यासावेळी, सबमिशन वेळी , परिक्षेच्या काळात महत्वाच्या गोष्टीवेळी , रात्री अपरात्री कुठल्याही प्रकारच्या मदतेसाठी , त्रास देणार्‍या मुलांपासून सूटका करून घेण्यासाठी [ यात बिचार्‍या पोराची विनाकारण हालत खराब होते ] शहरात पिक्चर, हॉटेलिंग, शॉपिंग करताना , प्रवासासाठी गाडीचे बूकिंग करण्यासाठी , नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळवण्यासाठी , त्यासाठी मुलाखतीची तयारी करण्यावेळी , नव्या ऑफिसमध्ये 'सेटल' होण्यासाठी , ऑफिसमध्ये कामाचा निपटारा करताना , बॉसकधून चांगले प्रोजेक्ट मिळवण्यासाठी, त्याचा 'फेवर' मिळवण्यासाठी , प्रमोशन मिळवण्यासाठी आणि इतर अनेक अशा गोष्टी पूर्ण करण्यासाठी "मुलीं"कडून "प्रेम" नावाचा एक मोहक धागा विणण्यात येतो.

ह्या धाग्याचा उपयोग करून अनेक गोष्टी साध्य केल्या जातात आणि गरज भागली किंवा अजून कुणी त्यापेक्षा कर्तबगार 'पाखरू' जाळ्याला लागले की "तसल्या नजरेनं नाही पाहिलं..." चा मंत्र वापरून त्या बिचार्‍या जून्या पाखराचे पंख कापले जातात. मग ते आपले रडत, कुढत, रखडत आयुष्य जगते व जन्मभर आपण केलेल्या चांगल्या गोष्टींची व [कदाचीत ] खर्‍या निर्व्याज प्रेमाची आठवण काढून झूरत बसते... [ याला पण बहूसंख्य अपवाद आहेत .... ]

तर तात्पर्य असे की "तसल्या नजरेनं नाही पाहिलं..." म्हणणे आणि तेच सत्य असणे यात जमिन-अस्मानाचे अंतर आहे ....

"तसल्या नजरांपासून सावध असलेला" छोटा डॉन ....

ता.क. : वरील प्रतिसादात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तीक आहेत. त्याचा कॄपया कुणी सर्वसाधारण निष्कर्ष काढून आम्ही ते सगळ्या स्त्री जातीला ऊद्देशून म्हणलो असे मानून आमच्याशी भांडायला येऊ नये ....

प्राजु's picture

12 Feb 2008 - 12:53 am | प्राजु

आपल्या गरजेच्या वेळी मुलांची मदत घेताना , स्वताच्या अध्यासावेळी, सबमिशन वेळी , परिक्षेच्या काळात महत्वाच्या गोष्टीवेळी , रात्री अपरात्री कुठल्याही प्रकारच्या मदतेसाठी , त्रास देणार्‍या मुलांपासून सूटका करून घेण्यासाठी [ यात बिचार्‍या पोराची विनाकारण हालत खराब होते ] शहरात पिक्चर, हॉटेलिंग, शॉपिंग करताना , प्रवासासाठी गाडीचे बूकिंग करण्यासाठी , नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळवण्यासाठी , त्यासाठी मुलाखतीची तयारी करण्यावेळी , नव्या ऑफिसमध्ये 'सेटल' होण्यासाठी , ऑफिसमध्ये कामाचा निपटारा करताना , बॉसकधून चांगले प्रोजेक्ट मिळवण्यासाठी, त्याचा 'फेवर' मिळवण्यासाठी , प्रमोशन मिळवण्यासाठी आणि इतर अनेक अशा गोष्टी पूर्ण करण्यासाठी "मुलीं"कडून "प्रेम" नावाचा एक मोहक धागा विणण्यात येतो.

पण मला कळत नाही की तुम्ही एखाद्या मित्राला जशी मदत करता तशी मैत्रिणीला का नाही करत? मित्राला मदत करताना तुम्ही त्यच्याही प्रेमात पडता का? तिला मदत करताना तिच्याकडून तशा प्रकारच्या प्रतिसादाची का अपेक्षा? साधी सरळ मदत होत नाही मुलांकडून. तिला मी मदत केली म्हणजे तिने माझ्या प्रेमातच पडायला हवं.. अशी का वृत्ती?
एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले कि त्यांच्यात प्रेमच हवं ही का अपेक्षा? केवळ मैत्रीसाठी हात का नाही पुढे होत??
याचाच मला मनस्वी संताप होतो. ती जर अंतर राखून बोलते तर.. तुम्ही हि अंतर राखूनच बोला ना.. म्हणजे पंख छाटले वगैर नाही वाटणार..

- प्राजु

माझ्या मते आपण प्रेमाचे संबंध आणि सर्वसामन्य संबंध यात थोडी गफलत करत आहोत.
कसे आहे आपण ऑफीस / कॉलेज याठिकाणी मदत करताना कधीही भेदभाव करत नाही. जशी मुलांना मदत करतो तशीच मुलींना पण करतो. माझ्या बाबतीत म्हणायचे झाले तर आमच्या ग्रूपमध्ये एकूण ४ मुली आणि ५ मुले होते पण आम्ही कधीही भेदभाव केला नाही.
पण सर्वसामान्य परिस्थीत "मुली" कडून असे काही पाऊले ऊचलली जातात अथवा संकेत दिले जातात [ नकळत अथवा कळून सुध्धा ] की मग मुलाला वाटते की आहे बाबा काही तरी प्रेम वगैरे आणि सामान्यता मुले तिथेच फसतात. काही वेळा "जास्त" फेवर मिळवण्यासाठी मुली मुद्दाम वागतात की मुलाला वाटते की तीचा आपल्याबरोबर प्रेमसंबंघाला काही अक्षेप असण्यास कारण नाही व त्यातूनच पुढे मुलाकडून पुढाकार घेऊन त्या मुलीला "प्रपोज" करणे व तीने "मी त्या नजरेने पहात नाही" म्हणून नकार देणे या गोष्टी घडतात.
पण याच वेळी त्या मुलाची ग्रूपमधल्या ईतर मुलींशी वागणूक मात्र सामान्यच असते कारण त्यांच्याकडून न मिळणारा संकेत अथवा प्रतिसाद. त्या मुलांचे संबंघ हे आपण सर्वसामान्य सम्बंध म्हणू शकतो.

तर तात्पर्य असे की प्रत्येक मुलाची प्रत्येक वेळी "तिला मी मदत केली म्हणजे तिने माझ्या प्रेमातच पडायला हवं.. ." अशी वॄत्ती बिलकूल नसते. काही "खास" जाणून बूजून अथवा अजाणता केलेल्या गोष्टी ही प्रवॄत्ती वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

जर कोणी प्रत्येक मदती मदती वेळी अपेक्षा ठेवत असेल तर त्याला वॄत्ती नसून विकॄती म्हणतात ....

तसल्या नजरेनं नाही पाहिलं... याचा अर्थ सरळंच ना, की तू मला नवरा म्हणून किंवा सहचारी म्हणून नाही अवडत. माझा मित्र आहेस..

अरे, मग तसं सरळ का नाही सांगायचं? माझा आक्षेप काय उत्तर दिलं जातं आणि काय संवाद साधला जातो, याबद्दल नसून, मनात काय विचार असतात, त्याबद्दल आणि खोटारड्या प्रुव्रुत्तीबद्दल आहे. `हा आपला फक्त मित्रच आहे, की अन्य कोणी' याचा विचार पहिल्या काही भेटींत पक्का व्हायला हवा, एवढंच माझं मत. निदान माझं तरी असंच होतं ब्वा.
माझीही एक मैत्रीण आहे. तिनं भरपूर संभाव्य नवरे बघून मग शेजारी राहणार्‍या तिच्या बालमित्राशी लग्न केलं. म्हणजे आधी तिच्या द्रुष्टीने तो तिचा फक्त मित्रच होता. नंतर त्यानं किंवा अन्य कुणी पुढाकार घेतल्यावर, तिला त्याच्यात `संभाव्य नवरा' दिसू लागला, हे पटू शकतं.

कारण मुलीची नव-याकडून वेगळी अपेक्षा असू शकते आणि एका चांगल्या मित्राकडून वेगळी. मित्र हा जर नव-याची अपेक्षा पूर्ण करणार नाहि असे वाटले तर तो मित्र नवरा नाही होऊ शकणार तिचा. आणि तो चांगला मित्र असेल तर गमवावे असे कोणाला वाटेल?

नकार देणं म्हणजे चांगला मित्र गमावणं, असा समज आणि अशी पद्धतही का आहे बुवा?
नंतर तशीच मैत्री नाही ठेवता येत?
मला `नकार' दिलेल्या मैत्रिणीशी अजूनही चांगली मैत्री आहे. `मी काय वाईट होतो,' अशी तिची चेष्टा मी अजूनही करू शकतो. त्यात काय एवढं?
एवढेही मोठे झालो नाही आपण अजून?
दोन भिन्न लिंगी व्यक्ती चांगले मित्र असू शकतात. चान्गले नवरा-बायकोही असू शकतात, पण एकमेकांची नाही, दुसर्‍यांची. हे समजून्-उमजून, सरळ, साधं, सोपं, निरहंकारी आयुष्य नाही जगता येत?

-अभिजित.

प्राजु's picture

12 Feb 2008 - 8:16 pm | प्राजु

अरे, मग तसं सरळ का नाही सांगायचं? माझा आक्षेप काय उत्तर दिलं जातं आणि काय संवाद साधला जातो, याबद्दल नसून, मनात काय विचार असतात, त्याबद्दल आणि खोटारड्या प्रुव्रुत्तीबद्दल आहे. `हा आपला फक्त मित्रच आहे, की अन्य कोणी' याचा विचार पहिल्या काही भेटींत पक्का व्हायला हवा, एवढंच माझं मत.

अच्छा... म्हणजे तुम्ही तिला मदत करायला गेलात की, काहीही कारण नसताना सुरूवातीलाच सांगायचे का की, " बाबा रे, तू माझी मदत करतो आहेस.. पण तुझ्याबद्दल माझ्या मनात काही तसले विचार नहियेत. तुझ्याही आणू नकोस. तू मला मदत केलिस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करणार नहिये.. आणि हे मान्य असेल तरच माझी मदत कर." ? हे ऐकून समोरचा हिच डोकं फिरलं आहे बहुतेक असाच विचार करेल.
मदत करतानाच तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि साधारपणे तिने "नाही" म्हंटले की, मैत्री तुटते अशी उदाहरणे माझ्या समोर आहेत. तो मुलगा तिच्याशी बोलणे बंद करतो.. ति हि मग गेला गेला तर गेला जाऊदे असा विचार करते .. आणि एक चांगली मैत्री अशी संपते.

- प्राजु

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2008 - 10:41 pm | llपुण्याचे पेशवेll

अभिजिता खरे बोललास रे(वयाने फार मोठे असाल तर "बोललात हो"...पण एकूण व्यथेवरून समवयीन वाटलास).. थोडक्यात हल्लीच्या काही मुलींच्या मते त्या मित्राना फक्त मित्र मानतात.. आणि मित्र मात्र बिचारे तसल्या नजरेने बघून बिचारीला सर्व कामात मदत करतात. तिही सर्व काही करून घेते(कदाचित तिला पण वास येतो तसल्या नजरेचा पण ती काही बोलत नाही). बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो. पण 'तसल्या नजरेने पहात नाही 'चा पत्ता मात्र बिचारा राबतो तेव्हा नाही लागू दीला जात.. असो.
या 'तसल्या नजरेने न पाहण्याची' व्यथा नकार पचविल्याशिवाय नाही कळत......

'तसल्या नजरेने न पाहिल्याने' व्यथित.
डॅनी.
पुण्याचे पेशवे

संजय अभ्यंकर's picture

11 Feb 2008 - 11:15 pm | संजय अभ्यंकर

'आपला अभिजीतने' योग्य मुद्दा मांडला आहे.

'तसल्या' नजरेचे (मासलेवाईक व तिडिक आणणारे) उत्तर मुली / मुले देतात,
कारण रोख ठोक विचार व्यक्त करण्यापेक्षा पळवाटी उत्तर सोपे असते.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

11 Feb 2008 - 11:51 pm | भडकमकर मास्तर

धनंजय राव....
थोडक्यात हल्लीच्या काही मुलींच्या मते त्या मित्राना फक्त मित्र मानतात.. आणि मित्र मात्र बिचारे तसल्या नजरेने बघून बिचारीला सर्व कामात मदत करतात. तिही सर्व काही करून घेते(कदाचित तिला पण वास येतो तसल्या नजरेचा पण ती काही बोलत नाही). बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो. पण 'तसल्या नजरेने पहात नाही 'चा पत्ता मात्र बिचारा राबतो तेव्हा नाही लागू दीला जात..
हे विश्लेषण अप्रतिम होते..अगदी सहमत......कसलं जबरदस्त वाक्य आहे...बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो.मी अजून हसतोय....
आता हे राबणे अनेक प्रकारचे असू शकते, सगळ्यात कॉमन म्हणजे जर्नल / शीट्स पूर्ण करायला मदत, परीक्षेच्या काळातच उत्तम नोट्स लिहिणारे मित्र आठवणे इतर वेळी विसरणे...तरी राबणारा आशा सोडत नाही...:))

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Feb 2008 - 12:00 am | llपुण्याचे पेशवेll

"आता हे राबणे अनेक प्रकारचे असू शकते, सगळ्यात कॉमन म्हणजे जर्नल / शीट्स पूर्ण करायला मदत, परीक्षेच्या काळातच उत्तम नोट्स लिहिणारे मित्र आठवणे इतर वेळी विसरणे...तरी राबणारा आशा सोडत नाही...:))"
अहो अनुभवाचेच बोल आहेत ते...... :)

पुण्याचे पेशवे

भडकमकर मास्तर's picture

12 Feb 2008 - 12:12 am | भडकमकर मास्तर

इट इज ऑल अबाउट सिग्नल्स.....
एखादा मुलगा प्रपोज करायला जाईपर्यंत खरंतर तो मनातल्या मनात तपासून पाहत असतो की आपण यशस्वी की अयशस्वी होणार आहोत... आणि ही तपासणी सर्वस्वी त्याला दिल्या जाणार्या कळत किंवा नकळत सिग्नल्स वर अवलंबून असते असे आमचे वैयक्तिक मत आहे.... सातत्याने पॉझिटिव्ह सिग्नल्स मिळायला लागल्यावरच सर्वसाधारणपणे मुलगा ऑफिशिअली प्रपोज करायला जातो,( अर्थात याला अपवाद आहेत, १. काहींना सगळेच पॉझिटिव्ह सिग्नल्स वाटतात.२. काहीतर दिसल्या दिसल्या लगेच प्रपोज करतात, पण असले महाभाग कमी). असो...
_ आम्हाला एवढेच सांगायचे आहे की मुलींना बरोबर अंदाज असतो की कोण त्यांना प्रपोज करायच्या विचारात आहे, त्यामुळे राबणार्या पोराला एकदम निगेटिव्ह सिग्नल दिला तर तो यापुढे राबणार नाही आणि फार पॉझिटिव्ह देणे मनातून आवडत नसते त्यामुळे काही मुली तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा सिग्नल्स चा जो अप्रतिम तोल साधताना आम्ही पाहिल्या आहेत, त्यामुळे मुलगा राबत राहतो आणि लगेच प्रपोजही करत नाही....
....त्यामुळे " काय बोलतोय्स तू हे? मला तर धक्का बसला , मी तसल्या नजरेने तुला पाहिले नाही" वगैरे सगळे झूठ असते,

'प्रेम' नावाचे नाटक तर मुलींकडून अतिशय जबरदस्त पद्धतीने केले जातेया छोटा डॉन च्या वाक्याशी अगदी १०० % सहमत

जुना अभिजित's picture

12 Feb 2008 - 9:36 am | जुना अभिजित

मुली तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा सिग्नल्स चा जो अप्रतिम तोल साधताना आम्ही पाहिल्या आहेत,

भडकमकरांशी १००% सहमत. आम्हीही अशा मुली पाहिल्या आहेत. ओळखीच्याही आहेत ;-)

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

मनीष पाठक's picture

14 Feb 2008 - 4:07 pm | मनीष पाठक

मुली तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा सिग्नल्स चा जो अप्रतिम तोल साधताना आम्ही पाहिल्या आहेत,

भडकमकरांशी १००% सहमत. आम्हीही अशा मुली पाहिल्या आहेत. ओळखीच्याही आहेत ;-) मी तर अनुभवलेल्या आहेत. (फक्त एकच हं!) :(

(राबण्याचा अनुभव घेतलेला ) मनीष पाठक

ऋषिकेश's picture

12 Feb 2008 - 12:32 am | ऋषिकेश

आपला अभिजीत आणि छोट्या डॉनशी पूर्णपणे सहमत :) भन्नाट लिहिलं आहेस ;)

-ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

12 Feb 2008 - 10:57 am | विसोबा खेचर

हो, हो, बायकोची नजर चुकवून अजूनही!) पाहण्यात, संपर्कात, माहितीत आलेल्या प्रत्येक मुलीला "तसल्या' नजरेनं पाहत आलो आहोत.

छान! :)

"आमची नुसतीच मैत्री आहे. एकमेकांचा तशा दृष्टीनं विचारच केला नाही अजून,' असला खोटारडेपणा आपल्याला आयुष्यात कधी जमला नाही, जमणार नाही

क्या बात है! खरं आहे तिच्यायला अभिजिता तू म्हणतोस ते!

आपला,
(बाईलवेडा) तात्या.

सब बकवास है. "तसली नजर' बिजर काही नाही. अंगाशी आलं की माणसं हात आखडता घेतात. पळवाटा आहेत सगळ्या. खरं बोलायची हिंमत नसते लोकांमध्ये.

वा अभिजिता, सडेतोड लेख आवडला... :)

आपला,
(एकेकाळी कालीजातल्या पोरींमध्ये लई फेमस असलेला) तात्या.

धमाल मुलगा's picture

12 Feb 2008 - 12:17 pm | धमाल मुलगा

@ प्राजुताई...
तुझ्या मता॑शी पुर्ण सहमत. अगदी ८०% मुली "तशा" नसतीलही...पण च्यामारी, आम्हा सगळ्या "परोपकारी" "सरळमार्गी सज्जन" जीवा॑ना (ह्यात जवळपास आम्ही सगळेच आलो) उरलेल्या २०% च का भेटतात?

तू म्हणतेस "तिला मदत करताना तिच्याकडून तशा प्रकारच्या प्रतिसादाची का अपेक्षा? एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले कि त्यांच्यात प्रेमच हवं ही का अपेक्षा? केवळ मैत्रीसाठी हात का नाही पुढे होत??"

अगदी बरोबर! पण डॅनीच्या म्हणण्याप्रमाणे "बिचारा आशेने राबतो आणि नंतर तसल्या नजरेने पाहीले नाही चा बळी होतो. पण 'तसल्या नजरेने पहात नाही 'चा पत्ता मात्र बिचारा राबतो तेव्हा नाही लागू दीला जात.." अस॑ का बुवा होत असाव॑?

भडकमकर म्हणतात ते तर अगदी पटल॑. "इट इज ऑल अबाउट सिग्नल्स.....
एखादा मुलगा प्रपोज करायला जाईपर्यंत खरंतर तो मनातल्या मनात तपासून पाहत असतो की आपण यशस्वी की अयशस्वी होणार आहोत... आणि ही तपासणी सर्वस्वी त्याला दिल्या जाणार्या कळत किंवा नकळत सिग्नल्स वर अवलंबून असते"

आणि तुला हे तर मान्यच असेल की मुलींना बरोबर अंदाज असतो की कोण त्यांना प्रपोज करायच्या विचारात आहे. मग तरीदेखील ह्या मुली (२०% च ह॑) अस॑ गोड गोड, लाडे लाडे बोलून त्या॑च्याकडे "तसल्या नजरेने" पाहणार्‍या मुला॑ना स्वतःच्या स्वार्थासाठी का बर॑ पाघळवतात?

माझा आपला असा अ॑दाज (मी तसा माठ आहे हे मिपाकरा॑ना वेगळ॑ सा॑गायला नको, पण माठही हल्ली अ॑दाज बा॑धू लागले आहेत.) की, आपली काम॑ साधून घेणे हे एक, पोरग॑ तस॑ जरा बर॑ असेल तर "राखीव" म्हणून गळाला लटकवलेल॑ (नाहीच मिळाला दुसरा कोणी तर असुदे बापडा), अन् जगातली अशी कोणती स्त्री असेल जी आपल्या मागे-पुढे करणार्‍या, आपल्यावर भाळलेल्या व्यक्तीला अस॑ फटकन तोडून टाकेल? झुरतोय तोवर ठीक आहे...अगदीच पाणी गळ्याशी आल॑ तर.... "तसल्या नजरेनं तुला कधी पाहिलंच नाही रे (बावळटा!)"

जर हे खर॑ नसेल तर प्रत्येक कामाच्या वेळी हक्काने आठवणारा तो खास-खास प्लॅन्सच्या वेळी नेमका का विसरला जातो, अन् त्यान॑ "अस॑ का?" विचारल॑च तर.."अरे इतकी गडबड झाली न्ना..(हे एक च्यामारी टिपीकल..ना मधला न दुप्पट केला की आमचा मजनू पार घायाळ) तुला सा॑गेन सा॑गेन म्हणत खर्रच (अस्त्र क्र.२ "र दुप्पट") राहूनच गेल॑ रे. रागावलास?" (घ्या, वर हे आणि! नाही बाई,फिरतो"आन॑दी आन॑द गडे" करत गावभर नाचत फिरतो !)

अर्थात, बरेचसे दिलफेक आशिक आहेतही तसे जे फक्त त्या एकाच कारणासाठी ओळखी वाढवतात आणि स॑धी मिळताच कार्यसिद्धी उरकण्याचा यत्न करतात.

असो, कोणाला दुखावण्याचा, हिणवण्याचा मुळीच हेतू नाही वर नमूद केल्यानुसार, आम्ही माठ असल्यामुळे आम्हावर कोणीही कसलीही कायदेशीर कारवाई करु शकत नाही (लै भारी !) आमचे विचार खेळीमेळीने घ्यावेत ही समस्त ग्रामस्था॑ना णम्र इन॑ती!

आपला,
- (सुदैवाने कधीही त्या वादातीत वाक्याची शिकार न झालेला पण इतर भाऊब॑दाबद्दल कळवळा असलेला अन् बर्‍याच ललना॑शी केवळ विशुद्ध मैत्री ठेवण्यात यशस्वी ठरलेला (क्या बात है! काय करता, बायको फोडून काढेल ना) ध मा ल.

ऋषिकेश's picture

12 Feb 2008 - 8:46 pm | ऋषिकेश

"Length of love line for any girl is exactly the same she wants it to be " असं एक इंग्रजी वचन आहे आणि माझ्यामते हेच सगळ्याचं सार आहे. "मुलीची प्रेमरेषा बरोब्बर तिला हवी तितक्याच लांबीची असते" :)

काय म्हणता बरुबर का न्हाइ?

-ऋषिकेश

वरदा's picture

12 Feb 2008 - 8:48 pm | वरदा

आणि तुला हे तर मान्यच असेल की मुलींना बरोबर अंदाज असतो की कोण त्यांना प्रपोज करायच्या विचारात आहे. मग तरीदेखील ह्या मुली (२०% च ह॑) अस॑ गोड गोड, लाडे लाडे बोलून त्या॑च्याकडे "तसल्या नजरेने" पाहणार्‍या मुला॑ना स्वतःच्या स्वार्थासाठी का बर॑ पाघळवतात?

अरे पण बावळटांनो (सॉरी पर्सनल नका बरं घेऊ) तुम्ही पाघळणारे कशाला पाघळता? अशी कीती जणं दिसतात जरा एखादी मुलगी गोड बोल्ली एखाद्या दिवशी त्यांच्याबरोबर घरापर्यंत आली..प्रेमाने म्हणाली माझं जरनल पुर्ण करशील का रे की गेले ढगात्..स्वतःचं काम ठेवणार बाजुला आणि तिचं काम करत बसणार ती मस्त दुसर्‍याबरोबर पिक्चरला जायला मोकळी आणि मग बसा बोंबलंत्...कुणी सांगितलेत हे नस्ते उद्योग? सांगा की मलाही माझं काम आहे आपण हवं तर एकत्र करु मी सांगेन कसं करायचं ते..पण ते नाही जमत कारण मग ती तुम्हाला सोडुन तुमच्याच मित्राला विचारेल आणि तुमचा चान्स जाईल ना..मुलं पण काही कमी नसतात.....

राहूनच गेल॑ रे. रागावलास?"

किती जणं म्हणतात होना खरंच रागावलोय्..आता मी बरा माझा अभ्यास किवा काम बरं? बरेचसे लगेच नाही ठिके पुन्हा कधीतरी म्हणुन सोडुन देतात्..पुन्हा मित्रांमधल्या स्टेटसचा प्रश्न असतो ना...

अरे तुम्ही जरा नीट वागा ना भाव नका ना देऊ "असल्या" मुलींना मग त्या "तसल्या" कुठल्याच गोष्टींचा प्रश्न नाही येणार....

प्राजु's picture

13 Feb 2008 - 12:07 am | प्राजु

हे कसं वरदाने अगदी नीट समजावून सांगितले...
वरदाशी पूर्ण सहमत आहे..

- प्राजु

धमाल मुलगा's picture

13 Feb 2008 - 12:13 pm | धमाल मुलगा

अरे तुम्ही जरा नीट वागा ना भाव नका ना देऊ "असल्या" मुलींना मग त्या "तसल्या" कुठल्याच गोष्टींचा प्रश्न नाही येणार....

आईशप्पथ...वरदाताई, तुझ्यासारखी अस॑ सडेतोड, स्पष्ट सा॑गणारी कोणीतरी ह्या सगळ्या॑च्या बरोबर असायला हवी ग॑ ! आम्ही काय कितीही सा॑गितल॑ तरी "तू गप रे येड्या, तुला काय कळत॑य? उगाच नाट लावत॑य..पेद्रट" असली मुक्ताफळ॑ पदरात.
पण...
तुम्ही पाघळणारे कशाला पाघळता?.....कुणी सांगितलेत हे नस्ते उद्योग?...किती जणं म्हणतात होना खरंच रागावलोय?
प्र्श्न असा असतो की, जिला "पटवायच॑य" तिला दुखावायच॑ कस॑? शिवाय इमानदारीत "तसल्या नजरेने" पहात असल्यामुळे अस॑ नाकारण॑ जरा जडच जात॑, नाही का?

कारण मग ती तुम्हाला सोडुन तुमच्याच मित्राला विचारेल आणि तुमचा चान्स जाईल ना..पुन्हा मित्रांमधल्या स्टेटसचा प्रश्न असतो ना... हे सगळ॑ त्या "दिलफेक" लोका॑च॑ झाल॑, पण जे खर॑च त्या मुलीवर प्रेम करत असतात / करायला लागलेले असतात त्या॑च॑ काय? त्या॑ना ह्या गोष्टी॑पेक्षा ती दुखावली जाण्याची अन् दूर जाण्याची भिती वाटते.
काय करणार, प्रेम हे आ॑धळ॑, मुक॑ अन् बहिर॑ पण असत॑....आणि ते करणारा तो सातगाढव !
(स्वानुभव हो...दुसर॑ काय? सुरुवातीला छान छान वाटल॑ खर॑ पण आता भोगतोय कर्माची फळ॑..रोज आपल॑ हल्या-हल्या! सुख म्हणून उरल॑ नाही हो नशिबाला....[विषया॑तर होत॑य धम्या..मुद्दा पकड मुद्दा पकड :)] )

ह॑ तर काय म्हणत होतो मी...ह॑ वरदाताई, तुझे मुद्दे अगदी सडेतोड आहेत पण ते लागु होतात ते दिलफेक्सना..प्रामाणिक म्हणजे आपल्या म्हराठीत "जेन्युईन" पोरा॑नी काय करायच॑?

अवा॑तरः वरदा"ताई" म्हणालो म्हणून "अरे तुरे" ..आपल॑ "अग॑ तुग॑" केल॑, आवडल॑ नसल्यास त्वरीत कळवावे, तात्काळ सुधारणा केली जाईल.

(एव्हढ॑ समजाऊनही पुन्हा तेच ते तुणतुण॑ लाऊन धरलेला)
ध मा ल.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Feb 2008 - 9:04 pm | llपुण्याचे पेशवेll

आपली काम॑ साधून घेणे हे एक, पोरग॑ तस॑ जरा बर॑ असेल तर "राखीव" म्हणून गळाला लटकवलेल॑ (नाहीच मिळाला दुसरा कोणी तर असुदे बापडा)अहो या ललना इतक्या चतुर असतात की त्याना आपल्यासाठी झुरणारे एकापेक्षा अनेक आहेत हे माहीत असेल तर त्यातल्या त्यात बर्‍या एकाला वरती "धमालरावानी " सांगितल्याप्रमाणे "असुदे बापडा" म्हणून धरून ठेवतात. म्हणजे इतर झुरणार्‍याना वाटावे की हीचे अन त्या 'बापड्याचे' सूत जुळले आहे. म्हणजे ते इतर झुरणारे तिच्या पासून दूर राहतात. आणि मग तिला अजून चांगला कोणी तिच्या मनासारखा मिळाला की या "बापड्याचा" 'त्या नजरेने न पाहीलेला बळी होतो'

बाकी बाकी धमालरावांशी अगदी सहमत..

पुण्याचे पेशवे

जुना अभिजित's picture

14 Feb 2008 - 4:46 pm | जुना अभिजित

या प्रकारातल्या मुलींची आदर्श म्हणून ऐश्वर्याची निवड करायला हरकत नाही. सल्लूला कटवायला विवेकला जवळ केला. म्हणे फोनवर रात्र्-रात्र गप्पा काय मारल्या. सल्लू कटताच ह्यालाही उल्लू बनवला. आता सल्लू आणि उल्लू दोस्त आहेत. ऐश्वर्या रायची ओबेराय न होता उत्तरेकडील गंगेकिनारी वसणार्‍या उंच लोकांच्या घरी गेली.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रभाकर पेठकर's picture

12 Feb 2008 - 10:57 pm | प्रभाकर पेठकर

आमच्या काळातही अशा मुली होत्या. नुसतेच गोड गोड बोलून चार हात दूर ठेवणार्‍या मुलींना आपणही गोड-गोड बोलून चार हात दूरच ठेवावे. फेकलेल्या जाळ्यात का फसावे? आपल्याला आवडलेल्या प्रत्येक मुलीला आपण आवडूच आवडू अशा भ्रमात का राहावे? बहुतांश 'दिलफेक' तरूण अशा 'वस्ताद' मुलींच्या जाळ्यात सापडतात. ती आपल्याला 'लाईन देते आहे' ह्या गोड कवी कल्पनेत तिच्यासाठी 'वाट्टेल ते' करण्यास तयार होतात आणि शेवट मनाविरुद्ध झाला की थयथयाट करतात. (काही दिवस) देवदास वगैरे बनून, दाढी वाढवून (का कोण जाणे), आपल्या (ओढावून घेतलेल्या) दू:खाचे प्रदर्शन करीत फिरतात. दूसरी मिळाली की पुन्हा तिच्या मागे.....
जून्या प्रकरणातून धडा शिकत नाहीत.

तिला 'तसल्या नजरेने' पाहायला लावायची जीद्द बाळगा. नाहीच जमले तर....

स्त्री-पुरूषात निव्वळ मैत्रीही शक्य आहे. पुरुषाने 'तशी' चाचपणी केल्यावर 'निगेटीव्ह' किंआ 'न्यूट्रल' सिग्नल मिळाले तर त्याने मनातून 'ते' विचार काढून टाकावे. एक व्यक्ती म्हणून त्या मुलीतील 'गुणांकडे' पाहून स्वच्छ मैत्री ठेवावी. आपल्या समस्या, आनंदाच्या क्षणांमध्ये, सुखात, दु:खात तिला सहभागी करून घ्यावे, सल्ले द्यावे, घ्यावे एकमेकांच्या मदती करीता तत्पर राहावे. मनातील ताण-तणाव दूर राखण्यात मदत होते.

विकिमधील दुवा -
http://en.wikipedia.org/wiki/Men_Are_From_Mars,_Women_Are_From_Venus

मुळात मुले आणि मुली ह्यांच्या विचार करण्याच्या पध्दतीमधे नैसर्गिकरीत्याच फरक असतो.
(बहुतांशी ) मुले ही सहचरी शोधताना बाह्यगोष्टींनी चटकन आकर्षित होतात त्याउलट (बहुतांशी ) मुली ह्या सुरक्षितता, स्थैर्य यांना अधिक महत्व देतात.

प्राण्यांमधली मादी ही वंशवृध्दी करीत असल्यामुळे तो वंश चांगला निपजावा ह्या हेतूने आपला जोडीदार निवडताना फार सावध असते - ही एक मूलभूत संवेदना (इंस्टिंक्ट) आहे. माणूस त्याला अपवाद नाही.
आता काळानुरुप त्यात इतरही गोष्टी मिसळत जातात त्यामुळे बरेच फाटे फुटतात शिवाय माणूस प्राणी आपल्या 'हुषारी' मुळे त्याला वेगळे रुप देतो तो भाग निराळा पण मूळ संवेदना ही आदिम आहे.

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Feb 2008 - 12:34 am | llपुण्याचे पेशवेll

तिला 'तसल्या नजरेने' पाहायला लावायची जीद्द बाळगा. नाहीच जमले तर....
हे फार आवडले.
अहो प्रेमात विफल होऊन रडणारे आम्ही नव्हे पण केली माझ्या काही मित्रांची व्यथा कथन.
अहो आम्ही भाऊसाहेब पाटणकरांच्या तालमीत तयार झालो असे आम्ही मानतो. प्रेमात रडणे भाऊसाहेबाना मान्यच नाही ते म्हणत 'प्रेमातही अस्मिता सोडली नाही आम्ही'('अस्मिता हे मुलीचे नाव नव्हे). ते मजनू ला उद्देशून लिहीतात.
"मजनू थोडा आम्हा का भेटला असतास तू,
एकही अश्रू खरोखर गाळला नसतास तू,
एक नाही लाख 'लैला' मिळविल्या असत्या आम्ही,
मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटील्या असत्या आम्ही"

डॅनी..
पुण्याचे पेशवे

भडकमकर मास्तर's picture

13 Feb 2008 - 9:25 am | भडकमकर मास्तर

तिला 'तसल्या नजरेने' पाहायला लावायची जीद्द बाळगा. नाहीच जमले तर....

क्या बात है !!!पेठकर साहेब,
आम्हीही या वाक्याशी सहमत......
वरदाचा पोस्ट आवडला...किती जणं म्हणतात होना खरंच रागावलोय्..आता मी बरा माझा अभ्यास किवा काम बरं? आमचा एकदाच असा वापर झाला , आणि हे लक्षात आल्या आल्या आम्ही तो नाद सोडला...पुढे एकदम हलके हलके वाटायला लागले.... :))

अवलिया's picture

13 Feb 2008 - 12:46 pm | अवलिया

जय जय राम कृष्ण हरी

किशोरी's picture

13 Feb 2008 - 1:08 pm | किशोरी

वरदा आणि प्राजु शी सहमत
कुठल्याही अपेक्षेने मदत कशाला करायची,अपेक्षा केली की अपेक्षाभंग होनारच्,मग त्याचे खापर
मुलींच्या माथी कशाला मारायचे,आणी मला तर वाटत मुल प्रत्येक सुंदर मुलीला तसल्या नज्रेनेच पाहतात
बरयाच वेळेला त्यांना माहीत असते की ही मुलगी आपल्याला पटनार नाही,तरी पण स्वताचा बी.पी.(बावळट पणा)
वाढवत,गुढग्याला बाशींग बांधुन तीच्या पुढे-मागे करत राहतात,आणी जर एखाद्या मुलगी स्पष्ट बोलली की तु मला
आवडत नाहीस,मग ती मुलगी आकडु आहे अशी लेबल लावायला मुल मोकळी
एक चांगली मैत्री करा मग़ पुढे काही जुळल तर छानच नाहीतर ती आपल्यासाठी नव्हतीच अस समजा

आपला अभिजित's picture

13 Feb 2008 - 1:23 pm | आपला अभिजित

नेहमीप्रमाणे इथेही मुलगे विरुद्ध मुली, असाच संघर्ष सुरू झालेला दिसतो.
माझ्या लेखाचा हा हेतू नव्हता. (हे दर वेळी का सांगावं लागतं?)

मुलगे आपली बाजू पटवून देणार आणि मुली त्यांची. पण एकमेकांच्या बाजूने सहसा कोणी विचार करत नाही.

प्रत्यक्षात काय उत्तरं मिळतात आणि काय दिली पाहिजेत, याविषयी मी काहीच म्हणालो नव्हतो.
मनात काय वाटतं आणि स्वत:शी आपण किती प्रामाणिक असतो, याविषयी मला बोलायचं होतं.
ते लक्षात आलं नसेल, तर लिखाणाचा हेतू फुकटच गेला म्हणायचा.

बाकी, मी इथे मुलींच्या बाजूने आहे. मुलंच लवकर पाघळतात आणि मुली धोरणी, किंबहुना मुत्सद्दी असतात, हे बरीक खरे हो!

-अभिजित.

विसोबा खेचर's picture

13 Feb 2008 - 1:45 pm | विसोबा खेचर

माझ्या लेखाचा हा हेतू नव्हता. (हे दर वेळी का सांगावं लागतं?)

हा हा हा! हे बाकी आवडले... :)

आपला,
तात्या वाळंबे! :)

वरदा's picture

14 Feb 2008 - 6:41 pm | वरदा

आपल्या म्हराठीत "जेन्युईन" पोरा॑नी काय करायच॑?

धमाल दादा अगदी सहज अरे तुरे करा ना काही प्रॉब्लेम नाही....
तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर...
"जेन्युईन" मुलांनी "जेन्युईन" मुली शोधायच्या अशा उगाच मदत मागून पाघळवून काम झालं की पळणार्‍या पोरी माझ्या मते बर्‍याचदा "नखरेल" कॅटेगरीतल्या असतात्..त्या साधारण १-२ वेळा बोल्लात की ओळखता येतात..आता तुम्ही सग्ळे माझ्यापेक्षा जास्तं जाणता मुलींच्या कॅटेगरीज असतात ... काही मध्यमवर्गीय अभ्यासू....ज्या मदत मागतात पण कधीतरी आणि स्वतःही मेहेनत करत असतात....काही मदत मागतात तुम्हाला कामाला लावतात आणि स्वतः मजा मारतात आणि अशा अनेक्...तर मुद्दा काय.... साधारण ती कशी आहे...बाकीच्या मुलांशी कशी वागतेय...जशी तुमच्याशी वागते तशीच त्यांच्याशीही वागत असेल तर लगेच समजुन घ्यायचं इथे काही विशेष भाव मिळणार नाहीये.....अशा मुलीच्या मागे जाच कशाला?
कॉलेजमधे वॅलेंटाईन डे ला एकाच मुलीला १००० गुलाब मिळायचे आणि माझा एक मित्र तरीही तिच्यावर मरायचा...शेवटी तिने अगदी हेच सांगितलं तु माझा चांगला मित्र आहेस रे.....
हे झालं मझं मत त्यातून कुणाच्या आणखी वेगळ्या स्टोरीज असतीलही.......

मन१'s picture

20 Jul 2012 - 4:41 pm | मन१

नवप्रवेशितांना नजरेस पडावा असा धागा....
सध्या ध्यानस्थ असणार्‍यडादिग्गज आयडींच्या कमेंटा त्याहून भारी.

बॅटमॅन's picture

20 Jul 2012 - 5:11 pm | बॅटमॅन

का कुणास ठाऊक आम्ही या लेखाकडे त्या नजरेने पाहिलेच नसल्याने तो नजरेतून सुटला.

इरसाल's picture

20 Jul 2012 - 5:12 pm | इरसाल

आमच्या बाबतीत उलट झालेय. मी लेक्चर बंक केले तरी डाटा माझ्या वहीवर उतरवुन मिळायचा तोही सुवाच्य अक्षरात.
तसल्या नजरेची कधी गरज पडली नाही.

लेख वाचताना 'तसल्या नजरेला' बळी पडलेली दोन-तीन उदाहरणं झरझर डोळ्यासमोरुन गेली. कोणतीही ललना कितीही गोग्गोड बोलली तरी ती उदाहरणं डोळ्यासमोर येतात आणि सावध होतो. :D

जेनी...'s picture

25 Nov 2013 - 10:11 am | जेनी...

=))

वामन देशमुख's picture

25 Nov 2013 - 10:41 am | वामन देशमुख

तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाची नशा
त्यादिवशी खाडकन उतरली,
ज्यादिवशी मी जोश्यांच्या बाळ्याला पाहिलं
…तुझ्या भावाचा बेदम मार खाताना!

बोलो, वामन महाराज्ज की… ज्जय!

मुलानी प्र्यत्नसुरू करण्या आधीच अंदाझ घ्यावा कोण आपल्या कडे कोणत्या नजरेने पहाटे आहे. नंतर रडून काही उपयोग नाही :)

की मग मुलाला वाटते की आहे बाबा काही तरी प्रेम वगैरे आणि सामान्यता मुले तिथेच फसतात.

मुले फसत असतील तर हा दोष मुलांचा नाही का?
स्वतः फसायचं आणि त्याचा दोष मुलींना का द्यायचा ? मुलीने नुसतं हसून बघितलं तरी मुलं तिने संकेत दिला असा करून घेतात . त्याला मुलींनी काय करावं बरं ?

इरसाल's picture

28 Nov 2013 - 3:37 pm | इरसाल

मुलीने नुसतं हसून बघितलं तरी मुलं तिने संकेत दिला असा करून घेतात . त्याला मुलींनी काय करावं बरं ?

मग मुलीने दुसरा संकेत द्यावा...............................रडुन !

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Nov 2013 - 8:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

असे धोरण ठेवले तर फार त्रास होत नाही आणि प्रत्येक वेळी नव्याने प्रयत्न करायला उत्साह वाटतो. बाकी असे अनुभव येणारच...त्यासाठी देवदास बनायची किंवा आपले प्रयत्न सोडायची काय गरज :)