थांबुनी येथे जराशी

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in जे न देखे रवी...
26 May 2009 - 2:00 pm

राम राम मंडळी मिसळ पाव वर आमच्या स्वताच्या भाषेत लिहायचा हा छोटासा आणी पहिलाच प्रयत्न आहे बघा जमलाय का ते हे कॉपी पेस्ट नाहि बर नाहि तर उगाच ओरडाल ( सहकार्य मार्गदर्शन परिकथेतील राजकुमार ह्यांचे आहे)
आमची प्रेरणा थांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा हि आहे

थांबुनी येथे जराशी दारु पिवुन जा
आणि ना प्यायचे तर वळण हे टाळून जा

बांधलेल्या ह्या बारच्या टेबलाला हळूसा स्पर्श तू करुनी जा
अन्यथा सार्‍या स्मृतीना तु विसरुन जा

टेबलाच्या वरती बाटली जागते तव चिंतनी
संपवाया टेबलावर सावली ढाळून जा

जोवरी होती भरली, तुझ्यावर लुब्ध होउनि राहिली
तू पिण्याला उशिर केलास ते बोलून जा

मी इथे साक्षीस, ज्याने कच्चा पेग पचविला
भुक तहान विसरुन ओकुन, रे, पळून जा.

( नवविडंबककवी ) घाशीराम कोतवाल

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

26 May 2009 - 2:03 pm | आनंदयात्री

:|
वि डं ब नां चा बा झ व ला !!