काळा राजहंस, गोरा मोर आणि इतर

विकास's picture
विकास in कलादालन
24 May 2009 - 7:39 pm

काल आम्ही एका जवळच्या प्राणिसंग्रहालयात गेलो होतो. "साउथविक्ज झू" असे त्याचे नाव आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे न्यु इंग्लंड (अमेरिकेतील उत्त्तरपूर्व भागातील ६ राज्ये) मधील हे सगळ्यात मोठे प्राणिसंग्रहालय आहे. खरे खोटे माहीत नाही. पण त्यात काढलेली काही छायाचित्रे येथे दाखवत आहे. मी काही छायाचित्रकार म्हणून तज्ञ नाही पण एखादे आवडणारे दृश्य तात्काळ टिपायचा प्रयत्न करतो. हा त्याचाच भाग आहे. फक्त वरील शिर्षकाच्या अनुक्रमाने हे फोटो नाहीत...

तर हा खालील २-३ छायाचित्रे आहेत ती चिडलेल्या सिंह आणि सिंहीणीची. एका चित्रात ती केवळ जाळीच्या मागे दिसेल ज्यात ती उठण्याच्या पोज मधे आहे (खाउ की गिळू). कारण ही तसेच होते. दोघे बिचारे शांतपणे बसले होते. बाजूला काही मुले त्यांनी डरकाळी फोडावी म्हणून जोरजोरात ओरडायला लागली. ते त्यांना शेवटी असह्य होऊ लागली आणि ती सिंहीण एकदम उठून आता ती जाळी सोडून बाहेर येणार का काय अशा त्वेशाने उठली... मग त्या सिंहाने बाजूला असलेल्या एका दरवाज्याला (ज्यातून त्यांना खाणे दिले जाते त्याला) धक्के मारून पाहीले. शेवटी रागारागाने दुसरीकडे जाऊन चालू लागले... हे वास्तवीक मला बघताना अस्वस्थ होत होते. पण तरी देखील छायाचित्र काढण्याचा मोह टाळता आला नाही...



खालील छायाचित्राला काही लिहीण्याची गरजच नाही...!

खालील चित्रात दाखवलेला मोर मी तरी प्रथमच पाहीला. हा सगळीकडे हिंडत होता. त्याचा आधी नुसताच फोटो आहे, नंतर पिसारा फुलवलेला दिसला म्हणून जसा मिळाला तसा काढला. त्यानंतर अजून छान काढता आला पण एक हरणाच्या जातीतील प्राणि त्याच्याशी मस्ती करत होते (आणि मोर पण त्याच्याबरोबर) त्यामुळे जरा मधेमधे आले आहे... तरी देखील त्याचे देखणेपण लपलेले नाही...



छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

टारझन's picture

24 May 2009 - 8:22 pm | टारझन

कोड उठलेला मोर लै भारी आहे राव !!

अनामिक's picture

24 May 2009 - 8:40 pm | अनामिक

सह्ही आहे गोरा मोर!

-अनामिक

llपुण्याचे पेशवेll's picture

25 May 2009 - 8:08 am | llपुण्याचे पेशवेll

छान दिसतो आहे गोरा मोर. आपल्याइकडचा मोर गोरा-मोरा झाला तर असाच वाटेल..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2009 - 8:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला !

स्वगत : हा माणूस कोण-कोणत्या विषयात एक्सपर्ट आहे, कोणास ठाऊक ! :?

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

24 May 2009 - 10:46 pm | मदनबाण

सुंदर मोर. :)
काळा राजहंस तर मी पहिल्यांदाच पाहतोय !!!

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

नाटक्या's picture

24 May 2009 - 9:52 pm | नाटक्या

"मोरा गोरा अंग लै ले.."

मोराने हे गाणे ऐकून ते शब्द:श पाळण्याचे ठरवले असावे...

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

विकास's picture

24 May 2009 - 10:20 pm | विकास

>>"मोरा गोरा अंग लै ले.."

=)) =))

अवलिया's picture

25 May 2009 - 6:29 am | अवलिया

सुरेख फोटो ! आवडले !!

--अवलिया

सुनील's picture

25 May 2009 - 6:59 am | सुनील

फोटो उत्तम. गोरा मोर अगदीच वेगळा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

25 May 2009 - 7:04 am | सहज

गोरा मोर फोटो मस्तच!

अजुन फोटो येउ दे.

क्रान्ति's picture

25 May 2009 - 7:39 am | क्रान्ति

काळे हंस आणि शुभ्र मोर खासच. वनराज आणि वनराणीचा मूडही मस्त टिपलाय.
मोराचेच काय फोटो घेताय? मी पण आहे ना इथे, असं तर म्हणत नाही ना हरीण ?
:) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

विसोबा खेचर's picture

25 May 2009 - 8:57 am | विसोबा खेचर

सुरेख चित्रे. खास करून सिंह-सिंहिणींची चित्रे जबरा..!

तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

25 May 2009 - 10:51 am | परिकथेतील राजकुमार

चाबुक फोटु विकास भौ !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

25 May 2009 - 11:08 am | स्वाती दिनेश

विकास, फोटो मस्त आहेत,
गोरा मोर बंगलोर की मैसूरच्या प्राणीसंग्रहालयात पहिल्यांदा पाहिला होता आणि काळा राजहंस तोक्यो मध्ये आणि नंतर म्युनस्टर मध्ये..:)
स्वाती

अन्या दातार's picture

25 May 2009 - 12:53 pm | अन्या दातार

मोराचे चित्र भारीच आहे, आवडले........

अवांतरः मोराची पिसे सर्वांनाच गालावरुन फिरवावीशी वाटतात; पण कोणाचाच लक्षात नसते कि ती पिसे त्याच्या *गणावरची असतात.

विजुभाऊ's picture

25 May 2009 - 12:59 pm | विजुभाऊ

पांढरा मोर / पांढरे वाघ हे सर्वसाधारणतः अल्बीनो असता॑त.
मानवातही ही जन्मजात असणारी मेलॅनीनची कमतरता आढळते

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

ऋषिकेश's picture

25 May 2009 - 4:30 pm | ऋषिकेश

वा.. राजबिंडा सिंह बघून खुप मस्त वाटले.. बाकी फोटोहि चांगले आहेत

काहिसे अवांतरः गिरसारख्या ठिकाणी हडकलेले सिंह केलेल्या शिकारीपेक्षाहि केविलवाणे दिसतात

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विकास's picture

25 May 2009 - 5:35 pm | विकास

सुरवातीलाच म्हणल्याप्रमाणे मी काही छायाचित्रे काढण्यात तज्ञ नाही आणि इथे एकापेक्षा एक बघितली असल्याने जरा बिचकूनच टाकली होती. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल म्हणूनच विशेष धन्यवाद!

बाकी वर ऋषिकेशने म्हणल्याप्रमाणे बर्‍याचदा प्राणिसंग्रहालयात बघावे लागणारे प्राण्यांचे हाल इथे सिंहाच्या बाबतीत बघावे लागले नाहीत. तरी देखील (एक चिम्पाझी सोडल्यास) माकडे आणि पक्षी यांना त्यामानाने कमी जागा असल्यासारखे वाटले.

विजूभाउंनी दिलेली माहीती पण मला नवीनच आहे. तेथे हा मोर कुठेही उंडारत होता त्यामुळे त्याची माहीती दाखवणारा फलक दिसू शकला नाही.

संदीप चित्रे's picture

25 May 2009 - 10:00 pm | संदीप चित्रे

पहिल्यांदाच पाहिला :)
छान दिसतोय पण परका वाटतोय !

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

धनंजय's picture

26 May 2009 - 10:34 pm | धनंजय

आणि सफेत मोराने अगदी पिसारा फुलवून दाखवला आहे!

चतुरंग's picture

26 May 2009 - 10:53 pm | चतुरंग

ये दिल मांगे मोर! ;)
मागल्या महिन्यातल्या सॅन दिएगो भेटीत तिथल्या प्राणिसंग्रहालयातला रंगीत मोर असाच सुखावून गेला!
(तरी फोटू घेताघेतानाच मधेच रोहित पक्षी घुसलेच! /:) )

चतुरंग

विकास's picture

27 May 2009 - 1:33 am | विकास

छानच फोटो आहे.

या प्राणिसंग्रहलायात पण नेहमीचा रंगीत मोर होता, पण तो एका घराच्या कौलावर निवांत उन्ह खात बसला होता. अर्थात पिसारा फुललेला नव्हता.

राघव's picture

26 May 2009 - 10:57 pm | राघव

मस्त फोटू विकासदा!
काळा राजहंस ऐकूनही माहित नव्हता राव. त्याबद्दल विशेष धन्यवाद!
फुललेल्या पिसार्‍यातला पांढरा मोर खासच. पण साधा चालतानाही राजबिंडा दिसतोय!! :)

राघव

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2009 - 10:58 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच फोटो. सिंहदांपत्य मस्तच आहे. भारी पोझ दिली आहे.

पण अजून फोटो टाकायला हरकत नाही.

बिपिन कार्यकर्ते

बट्ट्याबोळ's picture

27 May 2009 - 2:52 am | बट्ट्याबोळ

जब्रा मोर. रंगीत मोराला कोड आल्यावर गो-या मोरासारखा दिसेल.
लै भारी पण!!