गडबडगीत

ॐकार's picture
ॐकार in जे न देखे रवी...
24 May 2009 - 1:22 pm

बोला बोला बोला, बोला बोला बोला
नीरा प्या की, कशाला हवा कोका कोला?

बोला बोला बोला, बोला बोला बोला
सत्काराला चालेल का नारळ असोला?

बोला बोला बोला, बोला बोला बोला
खिसा कसा गरम, हात कसा ओला?

बोला बोला बोला, बोला बोला बोला
बुलढाणा, परभणी, रायगड(?), अकोला

बोला बोला बोला, बोला बोला बोला
कोण देई टक्का, कोण ढुंगणटोला?

कविताशब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

24 May 2009 - 1:27 pm | केशवसुमार

ॐकारशेठ,
धमाल गडबडगीत..
टोला एकदम बेश्ट.. बाकी चालू दे..
(असोला)केशवसुमार

टारझन's picture

24 May 2009 - 1:41 pm | टारझन

बोळा बोळा बोळा, बोळा बोळा बोळा
नीट र्‍हा की, कशाला हवा कौला कौला?

बोळा बोळा बोळा, बोळा बोळा बोळा
टप्पा टाकायला चालेल का एक व्यनि हिरवा ?

बोळा बोळा बोळा, बोळा बोळा बोळा
खिसा कसा गरम, हात कसा ओला? (ह्या कडव्यावर हिणकस टाळ्या =)) )

बोळा बोळा बोळा, बोळा बोळा बोळा
शर्टाराम,तुकाराम, बोळाराम (?) सोवळा

बोळा बोळा बोळा, बोळा बोळा बोळा
कोण देई राखिव जागा, कोण ती बाला ?

-(कविवर्य) काव्याराम पाडणे

अनंता's picture

24 May 2009 - 2:52 pm | अनंता

काव्यफटकारे जोरातच आहेत!
चालू द्यात.

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

चतुरंग's picture

24 May 2009 - 6:55 pm | चतुरंग

मस्त हो ॐकारशेट!
एकदम असोले टोले टाकलेत की!
आमची दाद इथेही वाचायला मिळेल. ;)

चतुरंग

कपिल काळे's picture

24 May 2009 - 10:28 pm | कपिल काळे

समजले नाही.
काही मराठी आंतरजालिय घडामोडींचा संदर्भ आहे का?

धनंजय's picture

25 May 2009 - 2:46 am | धनंजय

ॐकार यांचा नेहमीचा दर्जा जाणवला नाही.

पथनाट्याच्या सूत्रधाराच्या, शाहिराच्या गाण्याचे सामर्थ्य या कवितेला मिळू शकले असते. यासाठी आवश्यक लय, ठेका हे सगळे शेवटच्या कडव्यात उत्तम जमलेले दिसते आहे. (ॐकार यांना नेहमीच हे जमते). मग पहिले कडवेच इतके बेताल का?

विसोबा खेचर's picture

26 May 2009 - 9:27 am | विसोबा खेचर

मस्त! :)

ढुंगणटोला हा शब्द लै आवडला! :)

तात्या.