झोप

वडापाव's picture
वडापाव in जे न देखे रवी...
10 Feb 2008 - 3:02 pm

दुपारी माझा सूर्य उगवे
मावळतीची नसे निश्चित वेळ
जाग आल्यास झोपी जाण्याचा
असाच आहे माझा हा खेळ

सकाळी उठवून म्हणते आई
शाळेला जायचंय कर घाई
दोन मिनिटांत उठतो म्हणुनी
माझी स्वारी झोपून जाई

कविता पाठ होत नाही
कडवे किती बडे बडे
झोपेत बनवे मी कित्येक गाणी
आनंदी आनंद गडे

संगीताचे जसे असतात सूर
तसेच असे माझे घोरणे
जी कुंभकर्णाची तत्वे होती
तीच आहेत माझी धोरणे

मला सारखी झोप येते
त्यावर काही नाही उपाय
तुम्हीच सांगा मंडळी आता
मी नेमके करू काय?

-पाणी पुरी
(ही कविता मध्यरात्री झोप लागत नसल्याने मी चंद्रप्रकाशात तयार केलेली आहे)

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

बुध्दू बैल's picture

10 Feb 2008 - 3:15 pm | बुध्दू बैल

श्री. पाणी पुरी,
तुम्ही केलेली कविता चांगली आहे. keep it up.

स्वाती राजेश's picture

10 Feb 2008 - 4:07 pm | स्वाती राजेश

मस्त लिहिले आहे.
बडबड गीत म्हणून छान आहे.
सुर्यप्रकाशातील कवितेची वाट पाहात आहे:)

वडापाव's picture

10 Feb 2008 - 4:19 pm | वडापाव

श्री. स्वाती राजेश,

आपण व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
- आपला नम,
पाणी पुरी

स्वाती राजेश's picture

10 Feb 2008 - 4:48 pm | स्वाती राजेश

अहो पाणीपुरी,
मी सौ स्वाती राजेश आहे.:)

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 6:22 pm | सुधीर कांदळकर

म्ह्टले की तुम्ही श्रीयुत आहात?

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 6:26 pm | सुधीर कांदळकर

छान आहे. मजा आली. आजच एक बडगा आणून आपल्या मातोश्रीना पाठवीत आहे. तेव्हा लवकर झोपा, लवकर उठा व सूर्यप्रकाशात कविता करा. म्हणजे चांदणे पाहायला तुम्ही जागे राहणार नाहीत. उशिरा उठलात तर बडगा हाणून मातोश्री ते सकाळीच दाखवितील.

प्राजु's picture

10 Feb 2008 - 7:55 pm | प्राजु

पाणीपुरी राव,
छान आहे कविता. आणखीही येऊद्यात.
मला तशी दुपारीची झोप ज्याला वामकुक्षी म्हणतात .. ती लागत नाही.. त्यावर एखादी अशीच कविता लिहून पाठवा..:))

- प्राजु