फुलत्या क्षणी फुलणे ना जमले
सुकताना ही खंत नको
गंधित होउन बहरुन जावे,
पाचोळ्यापरी अंत नको
जगणे अवघड झाले तेव्हा
दिला सुरांनी जन्म नवा
जन्मांतरी हे सूर भिनावे,
नुसता कोकिळकंठ नको
रंग-रूप, रस-गंध साठवित
फुलाफुलावर लहरत जावे
फूलपाखरू जीवन व्हावे,
कोशातिल सुरवंट नको
क्षणाक्षणाला कणाकणातुन
उसळावे चैतन्य अनोखे
खळाळते आयुष्य असावे,
गती कधीही संथ नको
अद्भुत काही असे घडावे
असणे-नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो, रडवून गेलो
इतका साधा अंत नको
प्रतिक्रिया
19 May 2009 - 10:12 am | मराठमोळा
केवळ सुरेख कविता.
आयुष्याच्या प्रत्येक क्षणात सुख असो वा दु:ख त्यात जीवन असते आणी ते पुर्णत्वाने जगावे हेच खरे. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
19 May 2009 - 11:59 am | मनीषा
अद्भुत काही असे घडावे
असणे-नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो, रडवून गेलो
इतका साधा अंत नको
...... सुंदर!!!
19 May 2009 - 12:11 pm | सागर
क्रान्तिताई
नेहमीप्रमाणेच सुरेख कविता
तुमच्या कविता खरेच आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडतात.
नितांत सुंदर कविता...
खास करुन पुढील ओळी जास्त स्पर्शून गेल्या :)
फूलपाखरू जीवन व्हावे,
कोशातिल सुरवंट नको
रडतच आलो, रडवून गेलो
इतका साधा अंत नको
- सागर
19 May 2009 - 12:40 pm | विसोबा खेचर
केवळ अप्रतीम..!
मी आत्तापर्यंत जगलेल्या आयुष्याचा मला हा आढावा वाटला!
तात्या.
19 May 2009 - 12:54 pm | अश्विनि३३७९
अद्भुत काही असे घडावे
असणे-नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो, रडवून गेलो
इतका साधा अंत नको
या ओळी आवड्ल्या..
19 May 2009 - 12:58 pm | दिपक
सुरेखच क्रांतीताई.!
19 May 2009 - 12:58 pm | स्मिता श्रीपाद
अद्भुत काही असे घडावे
असणे-नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो, रडवून गेलो
इतका साधा अंत नको
अप्रतिम.... __/\__
-स्मिता
19 May 2009 - 1:06 pm | दत्ता काळे
अद्भुत काही असे घडावे
असणे-नसणे सार्थ ठरावे
. . . हे फार आवडलं
19 May 2009 - 1:15 pm | अवलिया
वा ! मस्त !!
--अवलिया
19 May 2009 - 1:25 pm | जयवी
आई गं !!
कसली जबरी कविता आहे गं !!
अद्भुत काही असे घडावे
असणे-नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो, रडवून गेलो
इतका साधा अंत नको......... मान गये उस्ताद !!
19 May 2009 - 2:01 pm | चेतन
अप्रतिम शब्द
वाचताना ठेक्यात कुठेतरी
"बिकट वाट वहिवाट असावि," या अनंत छंदींच्या फट्क्याची आठवण झाली
चेतन
19 May 2009 - 2:11 pm | मराठमोळा
>>"बिकट वाट वहिवाट असावि," या अनंत छंदींच्या फट्क्याची आठवण झाली
ते कवी अनंत फंदी आहेत. छंदी नव्हे.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
19 May 2009 - 2:25 pm | नंदन
कविता, फार आवडली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 May 2009 - 3:49 pm | सहज
हेच म्हणतो.
19 May 2009 - 7:33 pm | उमेश__
अद्भुत काही असे घडावे
असणे-नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो, रडवून गेलो
इतका साधा अंत नको
उत्तम.................................................................................................
19 May 2009 - 7:38 pm | सँडी
फुलत्या क्षणी फुलणे ना जमले
सुकताना ही खंत नको
गंधित होउन बहरुन जावे,
पाचोळ्यापरी अंत नको
उत्तुंग षटकार!
मस्त लिहिलयं!
19 May 2009 - 7:44 pm | चतुरंग
सुरेख कविता! सहज, साधी, गेय आणि भिडणारी! :) अभिनंदन!!
चतुरंग
19 May 2009 - 7:58 pm | क्रान्ति
माहेरच्या कौतुकानं धन्य झालेय!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
19 May 2009 - 8:00 pm | मदनबाण
फारच सुरेख कविता...
रंग-रूप, रस-गंध साठवित
फुलाफुलावर लहरत जावे
फूलपाखरू जीवन व्हावे,
कोशातिल सुरवंट नको
व्वा. :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
19 May 2009 - 8:06 pm | प्राजु
सुंदरच!!!
फूलपाखरू जीवन व्हावे,
कोशातिल सुरवंट नको
अप्रतिम!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 May 2009 - 8:24 pm | अनामिक
अप्रतिम कविता...
अद्भुत काही असे घडावे
असणे-नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो, रडवून गेलो
इतका साधा अंत नको
ह्या ओळी खूप आवडल्या!
-अनामिक
20 May 2009 - 7:15 am | चन्द्रशेखर गोखले
तुमची सर्वात आवडलेली कविता ! आयुष्यभर लक्षात ठेवावी अशी कविता !! ही कविता नाही , मन्त्र आहे !!!
20 May 2009 - 7:21 am | मानस
फारच सुरेख ..... तुमच्या कविता तसेही विचार करायला लावतात.....
क्षणाक्षणाला कणाकणातुन
उसळावे चैतन्य अनोखे
खळाळते आयुष्य असावे,
गती कधीही संथ नको
क्या बात है!!!
वर तात्यांनी म्हण्टल्याप्रमाणे जगलेल्या आयुष्याचा आढावा ....
20 May 2009 - 1:11 pm | वेताळ
आपण कविता सहसा वाचत नाही. तुम्ही ही कविता इतकी सुंदर लिहली आहे की मी ती खुप वेळा परत परत वाचली.
एकदम मनाला भिडली. खरच ही कविता तुम्ही लिहली आहे? अप्रमित कविता........
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
20 May 2009 - 3:33 pm | पाषाणभेद
मस्त कविता.
शालेय कविता म्हणून सहज लावली जाईल.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
20 May 2009 - 8:18 pm | श्रीकृष्ण सामंत
कविता आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
22 May 2009 - 7:29 am | लवंगी
अतिशय सुंदर कविता.
22 May 2009 - 7:31 am | विनायक प्रभू
भारी
22 May 2009 - 10:32 am | ऋषिकेश
वा! सुरेख कविता
खूपच आवडली
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
22 May 2009 - 1:20 pm | जागु
खुपच सुंदर कविता.
22 May 2009 - 2:36 pm | परिकथेतील राजकुमार
क्रांतीतै , माझ्या एका भेटीत तुझ्या काव्यप्रतिभेत किती फरक पडला नै ?
अप्रतिमच काव्य.
प्रिंटआउट काढुन डकवतोच आतो.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
22 May 2009 - 3:58 pm | क्रान्ति
खरंच! मी तुझ्या ऑर्कुटच्या खरडवहीत पहिल्या चार ओळी टंकल्या होत्या कधीतरी तुझाकडून गाणे घेतल्यावर. तुझी भेट घेऊन आल्यावर मिपाकरांच्या आवडीनिवडी, कार्याचा परिचय झाल्यावर पुढचा प्रवास झाला या चार ओळींचा आणि ही कविता अवतीर्ण झाली!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
22 May 2009 - 2:43 pm | राघव
फार सुंदर कविता :)
सगळी कविताच अगदी खास आहे!! मस्त वाटले वाचून.
राघव
22 May 2009 - 7:47 pm | नितिन थत्ते
जबरी कविता.
खराटा
(रंग माझा वेगळा)
10 Mar 2013 - 11:13 am | उत्खनक
आवडलेले लेखन.
12 Mar 2013 - 9:11 am | जेनी...
थँक्यु सो मच उत्खनक !
क्रांती अॅझ युझवल टू गूड ..... लव्ली :)