वरीस पाडव्याच्या निमित्ताने

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in काथ्याकूट
17 May 2009 - 3:53 pm
गाभा: 

वरीस पाडवा ही कथा पूर्णत: काल्पनिक नाही.

या वर्षीचा, दि. २७.३.२००९ ला झालेला गुढी पाडवा, हा या कथेचा खरा जन्म दिवस.
आदल्या दिवशीच खरा खुरा दिना थिटे मला भेटला. दिना माझ्या घराच्या समोरच कांही
अंतरावर रहात असें. पाडव्या नंतर चार सहा दिवसांनी तो तिथून कुठे तरी गेला. कदाचित
दुसरी एखादी नौकरी करायला किंवा गवंडी कामाची उमेदवारी करायला गेला असावा.
कौशी आमच्या घरीही कामाला येत असें. दिनाने मला त्याची जी कर्म कहाणी सांगितली,
ती मी जमेल तशी सादर केली.

ही पाचां उत्तराची काहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली
याचे श्रेय त्या कथाबीजातील वेदनेला.

इदं न मम ।

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

17 May 2009 - 3:55 pm | यशोधरा

जिथे कुठे दिना आणि कौशी असतील, तेथे सुखात, आपला स्वाभिमान जपून असोत, हीच देवापाशी प्रार्थना.

सहज's picture

17 May 2009 - 3:57 pm | सहज

अगदी हेच म्हणतो.

स्वाती दिनेश's picture

17 May 2009 - 7:37 pm | स्वाती दिनेश

जिथे कुठे दिना आणि कौशी असतील, तेथे सुखात, आपला स्वाभिमान जपून असोत, हीच देवापाशी प्रार्थना.

यशोशी अगदी सहमत आहे,
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2009 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधराशी सहमत !

विंजिनेर's picture

17 May 2009 - 4:43 pm | विंजिनेर

वडुलेकर साहेब,
टीपे बद्दल आभार. मी आत्ताच मुळ कथेवर "झटकन आवरती घेतलीत कथा... मुकादमाने पेरलेल्या लोभाच्या किड्याला दिना बळी पडतो का? .. पुढे त्याला काम मिळते का?" अशा अर्थाचा प्रतिसाद देणार होतो... पण कधी कधी सत्य हे कल्पनेपेक्षा अजब असतं हेच खरं...
असो. छान लेखन... आवडले..

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

नंदन's picture

18 May 2009 - 6:58 am | नंदन

असेच म्हणायचे होते.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्राजु's picture

17 May 2009 - 7:29 pm | प्राजु

दिना, त्याची बायको आणि मुलगा.. कुठे असतील तिथे सुखी रहावेत हीच प्रार्थना.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समिधा's picture

18 May 2009 - 10:13 am | समिधा

असच म्हणते.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

क्रान्ति's picture

19 May 2009 - 8:44 pm | क्रान्ति

दिना थिटे आणि त्याच्या कुटुंबियांचे सगळेच वरीस पाडवे सुखात आणि स्वाभिमानाने व्यतीत व्हावेत, ही शुभकामना.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***