जीवनाच्या वाटेवर असावी सोबत
कर्म, प्रेम्,संयम, ज्ञानाची संगत
असावे तृप्ती, आनंद, समाधान रांगत
सगुण घोळक्याची असावी सोबत
दुर्गुणांना झाडण्या गुणांची संगत
एकांतालाही करावी सोबत
बरसणार्या सुख, दु:खाना झेलत
आधारा द्यावा निराधारास क्षणभर
असावी निर्मळ, निर्व्याज सोबत
चुकलेली वाट दाखवण्यास सोबत
.
प्रतिक्रिया
14 May 2009 - 5:23 pm | मदनबाण
एकांतालाही करावी सोबत
बरसणार्या सुख, दु:खाना झेलत
आधारा द्यावा निराधारास क्षणभर
मस्त...:)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
15 May 2009 - 11:54 am | काजुकतली
छान कविता..
एकांतालाही करावी सोबत
बरसणार्या सुख, दु:खाना झेलत
आधारा द्यावा निराधारास क्षणभर
पहिल्या दोन ओळी आणी शेवटाची ओळ यांची नीट संगती लागत नाही असे वाटले. 'एकांतालाही करावी सोबत' म्हणजे आपलाच एकांत ना?? मग 'आधारा द्यावा निराधारास क्षणभर'' हे कसे??
साधना
15 May 2009 - 12:43 pm | जागु
मदनबाण, काजुकतली धन्यवाद.
मला इथे दुसर्यांचा एकांत अभिप्रेत आहे.
15 May 2009 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार
जीवनाच्या वाटेवर असावी मिपाची सोबत
लेख, कविता,पाकृ, खव ची संगत
असावे हिन,हिणकस, विडंबन रांगत
कंपुबाज घोळक्याची असावी सोबत
टुकारांना झाडण्या खेकड्याची संगत
विकांतालाही करावी सोबत
बरसणार्या टुकार लेख, कवितांना झेलत
आधारा द्यावा खरडफळा क्षणभर
असावी नजर, धारेधार सोबत
डुप्लिकेट आयडी, ओळखण्या बोगस.
हि आमच्या कडुन तुमच्या सुंदर कवितेला दाद :)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
15 May 2009 - 12:58 pm | दिपक
हे तर लै भारी.
जागु यांची कविता छान !
(मिपाची सोबत असल्यामुळे आनंदित)-दिपक
15 May 2009 - 1:00 pm | जागु
राजकुमार झटकन विडंबन केलत आणि माझ्याकवितेला सुंदर किताबही बहाल केलात. धन्यवाद.
15 May 2009 - 1:05 pm | अनंता
राजकुमार झटकन विडंबन केलत आणि माझ्याकवितेला सुंदर किताबही बहाल केलात. धन्यवाद.
जागुतैने सर्वांना धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद!
अवांतर : छान कविता!!
प्रतिसाद म्हणजे उसनी वाणं!! ;)
15 May 2009 - 1:41 pm | विसोबा खेचर
सुंदर कविता...!