आजचा सुधारक कोंडीतून सुटका

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
8 Feb 2008 - 2:38 pm
गाभा: 

या पुर्वी आजच्या सुधारकची कोंडी येथे वाचा. त्यावरील प्रतिक्रिया १ येथे वाचा. प्रतिक्रिया २ येथे वाचा. त्यावरील लेखकाचे प्रत्युत्तर येथे वाचा.

Picture 135

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

9 Feb 2008 - 12:43 am | ऋषिकेश

अनुभव वाचून अचंबा आणि वाईट वाटलं :(..

व्यंकट's picture

9 Feb 2008 - 2:21 am | व्यंकट

...अस वाटल की ही थाप आहे

धनंजय's picture

9 Feb 2008 - 5:14 am | धनंजय

आमच्या कुटुंबातल्या काही बायकांकडून त्यांच्या स्वतःबद्दल ऐकली आहे. तपशील "परपुरुषाचा अंगाला हात लागल्याने दिवस राहू शकतात" असा होता.

माझी टिप्पणी ही की आपल्या घरच्या पुरुषांचा आशीर्वाद देताना, भाऊबीज देताना हात लागतो, भाजीवाल्याकडून भाजी घेताना त्याचा हात लागतो हे दररोजचे अनुभव डोळ्याआड कसे होतात? पण एखादी गोष्ट अर्वाच्य, गूढ आणि भीतीदायक असली की मनात तर्क चालत नाही. लहानपणी मलाही अशी भीती होती की उष्टे खाल्ले की काही भयंकर होते (काय होते असे वाटायचे, ते आठवत नाही). त्यामुळे तर्क न चालवणारे मन असण्याचा माझाही अनुभव आहे.

त्यामुळे खानविलकर आणि गोडबोले यांनी सांगितलेली ही कथा मुळीच थाप वाटली नाही.

भडकमकर मास्तर's picture

9 Feb 2008 - 9:41 am | भडकमकर मास्तर

ही कथा मुळीच थाप वाटली नाही.
पण कॉलेजला येइपर्यंत हे भयंकर गैरसमज दूर होऊ नयेत? गर्भधारणेसाठी कोणत्याही प्राण्यामध्ये शुक्राणू आणि बीज यांचे मीलन व्हावे लागते हे सातवी आठवी च्या जीवशास्त्रात शिकवतात की....
...धनंजय यांचे म्हणणे योग्य वाटते..एकदा तर्क सोडला की कशाची भीती वाटेल ते सांगता येत नाही...

प्रकाश घाटपांडे's picture

9 Feb 2008 - 10:34 am | प्रकाश घाटपांडे

त्यामुळे तर्क न चालवणारे मन असण्याचा माझाही अनुभव आहे.

एरवी तर्क शुद्ध वाटणारा माणुस कधी कधी एकदम तर्क विसंगत वागतो तेव्हा मलाही असाच पेच पडतो. आपल्या तर्कसंगतीवर तो थोडाच चालणार आहे! त्यामुळे विशिष्ट बाबतीत तर्क न चालणारे मन असावे असे मलाही वाटते.
प्रकाश घाटपांडे

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 9:36 pm | सुधीर कांदळकर

आनंदी गोपाळ यांची होती असे मी ऐकले आहे. दुर्दैवाने ते पुस्तक मी वाचले नाही. कुणी वचले असल्यास कृपया लिहावे. एका मासिकात देखील अशीच कथा एका स्त्री लेखिकेने लिहिली होती. त्यात एका अविवाहित मुलीने विवाहित बहिणीचे कपडे घातल्यामुळे ती गरोदर राहते.