टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
आजचा सुधारक ची कोंडी - प्रतिक्रिया १ व २ वर लेखकाचे प्रत्युत्तर
प्रेषक प्रकाश घाटपांडे ( शुक्र, 12/14/2007 - 17:49) .
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती






डॉ.राहुल पाटील...
ह्यांचे म्हणणे योग्यच आहे. आपण बर्याच गोष्टींचा उगीचच बाऊ करतो.
श्लील-अश्लील ह्यांच्या व्याख्या आता बदलायला हव्यात असे वाटायला लागलेय. पुनरुत्पादन हा जगाचा नियमच आहे आणि त्याबद्दलची माणसाच्या शरीरात असलेली यंत्रणा ही फार महत्वाची आहे. त्याबद्दलच्या गैरसमजूती दूर करणे हे केव्हांही योग्यच ठरते आणि ते डॉ. पाटील ह्यांच्यासारखे त्या विषयातले तज्ञ करत आहेत ही चांगली बाब आहे.
प्रकाशराव हे इथे प्रसिद्ध करून आपणही एक सत्कृत्य केले आहे त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार.
फरक
लैंगीक शिक्षणाबद्दल आणि डॉ. राहूल पाटील यांनी ज्या पद्धतीने माहीती दिली आहे त्याबद्दल अश्लील वाटायचा प्रश्न नाही. पण उदाहरण म्हणून ज्या भाषेत तरूण मुले हेच शिक्षण एकमेकांना देतात त्याला आणि आ.सु. मधील लेखाला समान तोलणे मात्र बरोबर वाटणार नाही. थोडक्यात लेख आणि अश्लीलपणा यात फरक आहे.
अर्थात ह्या सर्वगोष्टींमधे "कलेक्टीव्ह बॅलन्सिंग ऍक्ट" लागते, अशक्य नाही, पण त्यासाठी प्रत्येकाचीच काहीना काहीतरी जबाबदारी आहे असे वाटते..