क्षणात फुलतं
ओठांवर एक
कुत्सित हास्य ....
आणि उगारले जातात
विखारी शब्दांचे भाले
रोखून पाहणार्या डोळ्यांमधे
दिसते अघोरी चमक
एक असहाय्य सावज
कोंडीत पकडल्याच्या उन्मादाने
लखलखणारी
स्वतःचं 'मी' पण सुखाउन
शांत झालेलं त्यांचं मन
मश्गुल होतं .....यशाच्या धुंदीत
------- आणि माझ्या मनात
उमलत असतो ..रसरसलेला
एक बिंदू .... तिरस्काराचा !
या आत्ममग्नांच्या कळपात राहूनही
मनावर तरंगत असते
एकच जाणीव
" मला जायलाच हवं .."
कुठे? -- कसं?
काहीच माहिती नसतं
पण ...
जाणं -- जरुरी असतं
हा उंबरठा ओलांडल्या शिवाय
तिरस्काराचा तो 'बिंदू'
पुसला जाणं अवघड असतं
म्हणून जीवाच्या कराराने
पाउल उचलते ..
बंद असलेल्या दारावर
हात ठेवते ..
आणि लक्षात येतं ....
दरवाजा बंद नाहीये !
इतका वेळ उगीचच
त्याच्या भितीने
अडकून राहिले मी इथे
--- मनावर साचलेली जळमटे
क्षणात झटकली जातात
आणि बघता बघता
तिरस्काराचा तो बिंदू
दिसेनासा होतो ...
चैतन्याच्या तेजस्वी प्रवाहात |
प्रतिक्रिया
12 May 2009 - 9:05 am | अनंता
छान आशय!!
मी सुद्धा अशा अनुभवातून गेलोय!!
12 May 2009 - 9:40 am | राघव
अर्थपूर्ण, आशयघन कविता!
येऊ द्यात अजून. शुभेच्छा!
राघव
12 May 2009 - 7:53 pm | मराठमोळा
सहमत आहे, :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
13 May 2009 - 2:05 pm | विसोबा खेचर
अर्थपूर्ण, आशयघन कविता!
येऊ द्यात अजून. शुभेच्छा!
हेच बोल्तो...
तात्या.
12 May 2009 - 9:54 am | सँडी
वा वा! क्या बात है!
मस्तच!
-संदीप.
काय'द्याच बोला.
12 May 2009 - 10:47 am | जागु
आशय आवडला.
12 May 2009 - 11:01 am | सायली पानसे
सहमत. आशय छान आहे कवितेचा.
पुलेशु.
12 May 2009 - 11:13 am | परिकथेतील राजकुमार
क्षणात फुलतं
ओठांवर एक
कुत्सित हास्य ....
आणि उगारले जातात
विखारी शब्दांचे भाले
रोखून पाहणार्या डोळ्यांमधे
दिसते अघोरी चमक
एक असहाय्य सावज
कोंडीत पकडल्याच्या उन्मादाने
लखलखणारी
हे वर्णन वाचले आणी मला एकदम जुन्या काळातील खलनायीका बिंदु आठवली.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
13 May 2009 - 1:02 pm | मनीषा
माझं लेखन अगदीच अनाकलनीय नाहीये तर ...
12 May 2009 - 7:57 pm | क्रान्ति
पराच्या प्रतिक्रियेशी सहमत. कविता मस्त्च.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
http://www.agnisakha.blogspot.com
13 May 2009 - 1:03 pm | मनीषा
आणि प्रतिसाद देणार्यांचे आभार !
13 May 2009 - 1:22 pm | दत्ता काळे
"आत्ममग्नांचा कळप" - हि शब्दसंकल्पना फार आवडली.