ऍट्लास

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
11 May 2009 - 11:18 am

तुम्ही कधी प्रभादेवी ओलांडुन वरळीला जायच्या कोपर्‍यावर सेंचुरी मील्स चा मोनोग्राम बघितला आहे?
पुर्ण पृथ्वी खांद्यावर घेतलेला आणि त्यामुळे त्रासलेला ऍटलास.
----------------------------------------------------------------------------------------------
का, हो तुम्हाला आपली नोकरी गेली तर काय होणार ह्याची भिती वाटते का? - ऑफिसला जाताना बायकोने पँटीत विंचु सोडला.
नोकरी करत नाही मी. कंसलटंट आहे मी.- माझा डीफेंस.
तेच ते. काय ते तुम्ही ट्ण्ट्ण करता ते उद्या नसेल तर?
२ महीने जरा त्रास होईल. परत मुळ पदावरयेईल सर्व काही. तु काळजी करु नकोस. - मी आश्वासन दीले.
ते कसे काय? - बायको
अग हा नाही तर तो. दोन लाईनीत उभेच आहेत.
( बहुतेक कुठल्या तरी एम्.एल्.एम. च्या बैठकीला गेली असणार मैत्रीणीच्या आग्रहामुळे)
_______________________________________________________
तु सांग विन्या, हे बरोबर आहे का? मक्या म्हणाला.
आता लाईनीत उभे राहुन तिकिट काढायचे त्रास वाचवलेल्या वर्गमित्राला आत कल्याण पर्यंत सहन करण्याशिवाय विन्याला पर्याय नव्हता.
अरे चांगल्या सल्ल्याची कदर नसते. मी डेप्युटेशन वरती भायखळा ब्रँचला गेलो होतो. नविनच मॅनेजर होता. दोनच दिवस झाले होते.
मी ऑडीट करत होतो. इतक्यात सुमारे १लाखाची कॅश आली. अकाउंट मॅनेजर ला बर नव्हते. त्यामुळे कॅश चे काय करायचे हा प्रश्न आला. मी मॅनेजरला सांगितले. ठेव्,सेफ मधे. सोमवारी बँकेत घालु. त्याने मान हलवली.
मी चहा प्यायला गेलो. परत आलो तर महाशयानी ती कॅश एका नविन प्युन कडे दीली होती. आणि लोखंडवालाला मालकांकडे पोचव असे सांगत होता.
मी का असा प्रश्न विचारला तर म्हणतो, यु आर नॉट माय बॉस. आय हॅव टॉक्ड टु द ओनर. अँड आय ऍम फॉलोइंग इंस्ट्रक्शन्स.
अरे बाबा, मालकांना कुठे माहीत आहे की ह्या प्युन ची लायकी काय आहे ते. हा जुना माणुस असता तर हरकत नाही. त्याला नीट पत्ता माहीत नाही. धोका दायक आहे ते. त्या एरीयात ओला रुमाल घेउन तयारच असतात मंडळी. दिसला कोंबडा की घाल रुमालात.
आता एवढे चांगले प्रेमाने सांगत होतो तर अयकयला तयार नाही.
मला शटाप म्हणाला.
दोन कानाखाली वाजवणार होतो, पण म्हटले कशाला नविन नोकरी लागली आहे, आयटी तना पिंक स्लीप मीळालेला. कशाला उगाच कुणाच्या पोटावर पाय आणायचा म्हणुन गप्प बसलो.
त्याने मालकांना फोन लावला. त्याच्याशी बोलल्यानंतर मालक माझ्याकडे बोलले. त्यांना माझे म्हणणे पटले. मी पण मालकाना सरळ म्ह्टले, आज सोडले, पुढच्या वेळी शटाप म्हणाला तर त्याचे दात पाडीन नंतर फोन करेन्.
मालक म्हणाले, यू हॅव टु लर्न टु मुव ऑन. डॉन्ट मेक इश्यु ऑफ दॅट शटाप.
आता हे बरोबर आहे का सांग.
विन्या जर गप्प झाला आणि मग म्हणाला,
मक्या मला वाटते की तु स्वःत ला फसवतो आहेस. तुला आपली शेवटच्या चार वर्षाची नोकरी वाचवायची होतीस म्हणुन तु गप्प बसलास.
किंवा तु स्वःतला ऍट्लास समजतोस. सर्व कंपनी आपल्यामुळे चालते असे समजणारा.
तसे वाट्णारा तु पहीला किंवा शेवटाचा नाहीस. ह्या भ्रमातुन आपण सर्व केंव्हाना केंव्हा जातोच. भ्रमातुन बाहेर पड सुखी राहशील.
आणि मालक म्हणजे पण एक जास्त पगार घेणार नोकरच. त्याच्या गरजांची शुन्य जास्त. त्याचे भोज्जे तुझ्यापेक्षा किती तरी मोठे.
त्याना सुद्धा सर्व बाजू बघायला लागतातच की. ताज्या दमाची टीम ऍटीट्युड दाखवणारच की. जरा डोके वापर. दोस्ती कर. कदाचीत तोच तुझे ओझे कमी करायला धावुन येईल. आणि तुझ्या निरोपसमारंभाला अगदी डोळ्यात पाणी येइल असे भाषण करेल.
अरे एवढ्या मोठ्या चक्रातले तु एक छोटेसे चक्र. अगदी डीस्पेंसेबल. उगाच त्रास करुन घेउ नकोस.
फास्ट गाडी असल्यामुळे कल्याण लवकर आले. नशीब विन्याचे.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

11 May 2009 - 11:26 am | अवलिया

हे लेखन नोहे...काय सांगितले यातुन ?
अक्षरशः काहीही नाही !!
कोणता मुद्दा नवा मांडला ? कोणताही नाही.
माहित असलेल्याच गोष्टी पुन्हा पुन्हा मांडुन लक्ष वेधुन घेण्याचे हिणकस धंदे बंद करा मास्तर !!!
लेखन हे तुमचेकाम नाही आणि करु नका.
तुम्ही आपले लोकांच्या चादरी अंथरायची कामे करुन नंतर धोबीघाटावर नेवुन सगळ्यांना दाखवण्याचे काम करता ते तिकडेच चालु ठेवा.
असले बिनकामाचे लेख आमच्या माथी मारु नका !!

--अवलिया

सहज's picture

11 May 2009 - 11:34 am | सहज

नाना - यू हॅव टु लर्न टु मुव ऑन. डॉन्ट मेक इश्यु ऑफ .....

बाकी राहीले दात पाडायला शिवशिवणारे ऍटलास, तर पाहीजे तिथे दात पाडायची संधी मिळत नाही म्हणून इथे पाडून घेतात बिचारे :-)

दशानन's picture

11 May 2009 - 11:34 am | दशानन

हेच म्हणतो,

नाना सटकला की काय ;)

थोडेसं नवीन !

ही विप्र-नाना युती आपल्याला खेळवतेय.
पार २०-२०शीत करुन टाकतील आपल्या मेंदूला.

विनायक प्रभू's picture

11 May 2009 - 7:16 pm | विनायक प्रभू

संजय कुणी नातलग लागतात का हो तुमचे?

आनंदयात्री's picture

11 May 2009 - 11:35 am | आनंदयात्री

सेच म्हणतो .. सहजशी सहमत आहे.
नाना यू हॅव टु लर्न टु मुव ऑन. डॉन्ट मेक इश्यु ऑफ .....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 May 2009 - 11:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय ! आणि दुनिया समजून घेतोय.

दशानन's picture

11 May 2009 - 11:33 am | दशानन

=))

एकदम सही मास्तर !

बाकी,
तु स्वःतला ऍट्लास समजतोस. सर्व कंपनी आपल्यामुळे चालते असे समजणारा.

जर हे समजले सर्वांना तर ऑफिसमधील अर्धे लफडे बंद होतील व काम वेगाने होईल सर्व जागी.

थोडेसं नवीन !

आनंदयात्री's picture

11 May 2009 - 11:34 am | आनंदयात्री

मस्त लेख विप्रकाका. लहानसा किस्सा, त्याला आजच्या वास्तवाची जोड त्यातुन घेण्याचा बोध .. छान सांगड जमली आहे.
येउद्या अजुन असे लेखन. अभिनंदन.
:)

विजुभाऊ's picture

11 May 2009 - 11:35 am | विजुभाऊ

इतके त्रोटक का लिहिलेत?
बर्‍याच जणाना हा प्रॉब्लेम असतो. रीटायर होणार्‍या लोकाना हा त्रास फार होतो. रीटायर झालेल्याना रीटायर होण्याचे दु:ख होत नाही तर आपल्याविना जग( कम्पनी) चालु शकते याचेच दु:ख होते.

प्रमोद देव's picture

11 May 2009 - 11:37 am | प्रमोद देव

आमच्या कार्यालयात असाच एक साहेब होता. बर्‍यापैकी उंच. सगळ्या कार्यालयाचा भार आपल्यावरच आहे असे समजून थोडा वाकून चालायचा. त्याला आमच्यातल्या दादा पाटीलने नाव ठेवले होते 'सेंच्युरी.' ;)
तोच तो जाहिरातीतला ऍटलास. :)
प्रभूदेवा,जगात अशी बरीच माणसे असतात.
बैलगाडीखालून चालणार्‍या कुत्र्यासारखी. त्यांना वाटते की बैलगाडी आपल्यामुळेच चालते. :)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

नितिन थत्ते's picture

11 May 2009 - 11:39 am | नितिन थत्ते

सर तुम्ही दोन क्रिप्टिक एका लेखात लिहू नका बुवा.
(अवांतरः हे क्रिप्टिक नानाने सांगितले आणि तुम्ही लिहिलेले पहिले का?)
ह. घ्या.

खराटा
(रंग माझा वेगळा)

यशोधरा's picture

11 May 2009 - 11:50 am | यशोधरा

विप्रसर, मला खरच एक प्रश्न आहे, तुमच्या समुपदेशात कधी हलके फुलके, किंवा सकारात्मक घटना घडतच नाहीत का हो? का घडल्या तर तुम्ही त्या इथे देण्याइतक्या महत्वाच्या मानत नाही? एकूणच सतत उपदेशात्मक लिखाण पाहून मनात आलेला प्रश्न विचारत आहे, अधिक काही नाही.

निखिल देशपांडे's picture

11 May 2009 - 11:51 am | निखिल देशपांडे

मास्तर मस्त लिहिलय
तु स्वःतला ऍट्लास समजतोस. सर्व कंपनी आपल्यामुळे चालते असे समजणारा.
असेच येवु द्या अजुन
==निखिल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 May 2009 - 12:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विषयाशी संबंधीत प्रतिसाद नसल्यास (अतिअवांतर) संवादासाठी व्य. नी. ,खरडफळा, खरडवहीचा वापर करावा ! या पुढे असे आढळून आल्यास प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येतील. कृपया सहकार्य करावे ! धन्यवाद ! :)