होत्या तशाच आहे,जखमा मला दिलेल्या
दुसराच घाव आता शोधीत चाललो मी
दावीत पाठ गेले,सारेच ते बिचारे
तलवार हीच माझी रोखीत चाललो मी
देईन सूर आता , माझ्याच यातनाना
हे शोकगीत माझे गाईत चाललो मी
कैदेतल्या सुखाची , का आस मी धरावी
दु:खाताही सुखाला शोधीत चाललो मी
ज्याच्यासावे निघाली, माझी सुमार स्वप्ने
आभास तो सुखाचा शोधीत चाललो मी
आहे फितूर स्वप्ने , माझ्या मनातली ही
वेड्या मनास माझ्या फसवीत चाललो मी
व्हावे अबोल आता , सार्याच आसवांनी
श्वासात हुन्दक्याना दाबीत चाललो मी
प्रतिक्रिया
9 May 2009 - 4:51 pm | चन्द्रशेखर गोखले
आहे फितूर स्वप्ने , माझ्या मनातली ही
वेड्या मनास माझ्या फसवीत चाललो मी
व्हावे अबोल आता , सार्याच आसवांनी
श्वासात हुन्दक्याना दाबीत चाललो मी
हे विशेष आवडले.! भावस्पर्शी कविता !!