एक प्रश्न असा की,
बदलून जाते विश्व
एक प्रश्न असा की,
भंगते सुंदर स्वप्न
एक प्रश्न असा की,
उमलते नवी अपेक्षा
एक प्रश्न असा की,
अनंत काळची प्रतीक्षा
एक प्रश्न असा की,
जणू फुलावा प्राजक्त
एक प्रश्न असा की,
अश्रूही बनावे रक्त
एक प्रश्न असा की,
तो प्रश्नच न राहावा
एक प्रश्न असा की,
उत्तरच प्रश्न व्हावा
प्रतिक्रिया
6 May 2009 - 2:53 pm | प्रमोद देव
कविता छान आहे.
6 May 2009 - 3:54 pm | मराठमोळा
कविता अर्थपुर्ण आहे.
आवडली. :) येऊ द्या अजुन.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
6 May 2009 - 4:47 pm | मनीषा
आशयपूर्ण कविता ...
6 May 2009 - 10:20 pm | क्रान्ति
कविता आवडली. सहज, साधी भाषा आणि आशयघन कविता. =D>
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com