सागराच्या सामर्थी
थेंबा-थेंबाची उसळण,
थेंबाच्या बळावर
महासागराचे विशालपण !
घराच्या बळकटपणी
पायाचं खोल रुतणं,
सजिव, निर्जिव भार पेलत
घराचं छप्परही सजलेलं
चंदनाचे महानपणी
सहाणेचं झिजणं,
उगाळताना खड्डा सोसून
चंदनाचे गुणं टिकवलेलं !
क्षुल्लक गोष्टीतही
विसावलं थोरपण,
थोरपण जपण्यासाठी
जपाव जाणिवेचं उदारपण !
प्रतिक्रिया
5 May 2009 - 6:41 pm | क्रान्ति
किती सहजपणे किती मोठं तत्वज्ञान सांगून जातेस जागु! खूप सुन्दर आहे कविता.
क्षुल्लक गोष्टीतही
विसावलं थोरपण,
थोरपण जपण्यासाठी
जपाव जाणिवेचं उदारपण !
या ओळी अगदी सही!
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com