अष्टौप्रहर.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
5 May 2009 - 10:57 am

अष्टौप्रहर.....

येते अशीच केंव्हा केंव्हा पहाट ताजी
ओठांत अमृताची देतेस ठेव माझी !

येते अशीच केंव्हा केंव्हा तरी सकाळ
करतेस दाट आणिक जवळीक फार माझी !

येते अशीच केंव्हा केंव्हा तरी दुपार
डोळ्यांत धुंद दिसते , मिठी अनिवार माझी !

येते अशीच केंव्हा केंव्हा चुकार संध्या
गाण्यात छेडतो मी , मनची सतार माझी !

येते अशीच केंव्हा केंव्हा तरीच रात्र
येतो सुगंध, फुलते , "जाई" क्षणांत माझी !

------------------२७ जुलै १९८४.....................

गझलआस्वाद