नमस्कार,
ग्रस्तास्त चंद्रग्रहण माघ पौर्णिमेला म्हणजे गुरूवार दिनांक २१ फेब्रुवारी २००८ रोजी येत आहे.
हे ग्रहण भारतात अतिपश्चिमेकडील काही गांवातून दिसेल. ती गावे म्हणजे गुजरात मधील जामनगर, राजकोट, पोरबंदर, मोरवी, वेरावळ, जुनागढ व भूज ही आहेत.
महाराष्ट्रात कुठेही हे ग्रहण दिसणार नाही, याची नोंद घ्यावी. त्यामुळे या ग्रहणाचे वेधादि नियम महाराष्ट्रातील लोकांसाठी लागू होत नाहीत.
ज्या प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे त्यांनी बुधवार २० फेब्रुवारी रोजी सूर्यास्तापासून वेधादि नियम पाळावेत. तसेच ग्रस्तास्त चंद्रग्रहण असल्याने गुरूवारी सूर्यास्तानंतर शुद्ध चंद्रबिंब पाहून मग भोजन करावे.
वृद्ध वा आजारी व्यक्ति, गरोदर स्त्रिया आणि लहान मुले यांनी ग्रहणकाल सोडून गरजेनुसार अन्नपान करावे.
आपला,
(शास्त्रीबुवा) धोंडोपंत
प्रतिक्रिया
7 Feb 2008 - 12:29 pm | सागर
पंत ,
हे झाले चंद्रग्रहणाचे.... जे यायला अजून बराच अवकाश आहे
आजच्या सूर्यग्रहणाचे काय?
कारण सूर्यग्रहणाचे परिणाम चंद्रग्रहणाच्या तुलनेत अतिशय प्रभावशाली आणि थेट परिणाम करणारे असतात
तेव्हा आजच्या या सूर्यग्रहणाबद्दल लिहावे ही विनंती
(ज्योतिष आणि खगोलप्रेमी) सागर