वेगळा होता.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
3 May 2009 - 11:32 am

वेगळा होता.....

चांदण्याही त्याच होत्या पौर्णिमेच्या रातीला
तुझ्या डोळ्यांतील आकाशाचा , रंग वेगळा होता !

एक होता सूर अपुला एक होती रागदारी
तुझ्या गळ्यातून ठहरणारा , ढंग वेगळा होता !

न होतो विश्वामित्र मी , न होतीस अन् तू मेनका
ती तपस्या पावली , माझा तपोभंग वेगळा होता !

फुलला कधीचा परसदारी धम्म पिवळा सोनचाफा
मोकळ्या केसांत सजला , तो संग वेगळाहोता !

हाय् ! ओलेत्या तुझ्या कांतीस बिलगली ती उन्हे
लाज गाली पाहणारा सूर्य , दंग वेगळा होता !

सोळा सहस्त्र नारींस होता एक त्राता अन् सखा
प्रीत राधेचीच मोठी , तिचा श्रीरंग वेगळा होता !

गझलआस्वाद

प्रतिक्रिया

सायली पानसे's picture

3 May 2009 - 12:04 pm | सायली पानसे

आवडली.
पुढच्या कवितेसाठी शुभेच्छा.

क्रान्ति's picture

3 May 2009 - 12:12 pm | क्रान्ति

सुन्दर!
सोळा सहस्त्र नारींस होता एक त्राता अन् सखा
प्रीत राधेचीच मोठी , तिचा श्रीरंग वेगळा होता !
विशेष आवडलेल्या ओळी.

क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

प्राजु's picture

3 May 2009 - 5:56 pm | प्राजु

शब्दच नाहीत कौतुक करायला.
अतिशय सुरेख रचना. खूपच सुंदर!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

3 May 2009 - 8:22 pm | नितिन थत्ते

कविता सुंदर आहे. प्रत्येक कडव्यातील कल्पना सुंदर.
(प्रत्येक कडव्यातील दुसर्‍या ओळीत दुसर्‍या भागात मात्र मात्रांमध्ये काही गडबड आहे.)
खराटा
(रंग माझा वेगळा)

अवलिया's picture

3 May 2009 - 10:44 pm | अवलिया

छान! आवडली रचना !!

--अवलिया

सागर's picture

4 May 2009 - 11:39 am | सागर

उदय मित्रा फार सुंदर

विशेष करुन हे कडवे फार आवडले :)
न होतो विश्वामित्र मी , न होतीस अन् तू मेनका
ती तपस्या पावली , माझा तपोभंग वेगळा होता !

आणि शेवट तर अप्रतिमच
सोळा सहस्त्र नारींस होता एक त्राता अन् सखा
प्रीत राधेचीच मोठी , तिचा श्रीरंग वेगळा होता !

येऊ देत अजून
- सागर

उदय सप्रे's picture

4 May 2009 - 11:43 am | उदय सप्रे

अरे मित्रा, तुझ्यासारख्या आणि क्रान्तिताई , प्राजुताई यांच्यासारख्या चोखंदळ वाचकांमुळे तर म्या पामराचे लिहिण्याचे धाडस असते रे !
मंडळ आपले लय् (आ)भारी आहे !