वाद्यं

नन्दु's picture
नन्दु in जे न देखे रवी...
6 Feb 2008 - 10:53 pm

वाद्य

आता जेव्हा कधि तो वाद्यांच्या दुकानासमोरुन जातो
नेहमि खालमानेने जातो

हि सगळी वाद्यां त्याच्या घरात आहेत
कधिकाळी..................
तो विचारित आसे वीणेचि किंमत
अलवार पणे फिरायचा त्याचा हात ताराना झंकारत
नि त्याला वाटायच
वाद्यं नसतात त्याचि
जो केवल खरिदतो त्याना
ती असतात त्याचि
जो निर्माण करतो अनाहत सुरवटि

आणी मग एका संध्याकाळी
त्याच्या घरी वीणा आलि
कितीक सांजवेळा,कितीक रात्री
कित्येक दिवस उलटले
थकून ...वैतागुन..... पराभुत होऊन
त्याच्या कालजाच्या सुरावटी
पकडताच आल्या नाहित त्याच्या बोटांना

मग त्याने विचार केला
प्रत्येक वाद्य नसत
प्रत्येक संगीतकाराच्या योग्यतेचे
माझेहि वाद्य वेगळे आसेल एखादे

दुसरे वाद्य ,तिसरे वाद्य ,सातवं...
त्यानं कित्येक वाद्य बदलली
त्याच्या काळजातल्या सुरावटी
पकडताच आल्या नाहित त्याच्या बोटांना

आता ती वाद्य
त्याच्या स्वप्नात येऊन
त्याला भेडावतात
एकञ येऊन
मयताचा बेसूर आवाज काढतात्

...आम्हाला स्वतंञ कर
आम्हि नाही आहोत तुझे....

त्याचे डोळे उघडतात
तेव्हा वाद्य निपचित पहुडलेलि
..चकाकती वाद्य ,कसलेल्या तारा
त्याची स्वता ची
तरीही तो छेडत नाहि कुठल्याच तारेला

तो भितो
नीरव रात्री वाद्यांच्या किंचाळण्याला
त्याचे हात थरथरतात अपराध्यासारखे
दळभद्री,कुचकामी हात ऊचलुन
मनातल्या मनात तो वाद्यांना सांगतो
तुम्ही जड आहात्
तुम्हाला कळणार नाहित जुलमींनो
माझ्या काळजातल्या अलवार सुरावटी
नाजुक अनि सुक्ष्म

तो बोलत राहतो
अंतर्यामी विश्वासाने
कि त्याच्या या काकुळतिने
विरघळेल एखादे वाद्य
नि झंकारतील अनाहुत सुरावटी

अखेरीस तो गलितगाञ पडुन राहतो
पराभुत पणे नि
लपेटतो छाती थरथरत्या हाता नी
छातीखाली सुरावटींची झोप
नि छातीवरती हात
त्याला आता नेहमी वाटत
अंतर तर अगदी थोडसच आहे.

माझि आवड्ती कविता[पण मझि न्हवे]काही चुकले असेल तर माफ करवे
----मि पा कुटुंबातील शेंडेफळ नन्दु

कविता

प्रतिक्रिया

धनंजय's picture

6 Feb 2008 - 11:55 pm | धनंजय

प्रेम पुन्हा एकदा असफल होते तेव्हाच्या या हताश भावना. पण छातीमध्ये, हाताना लागली नाही तरी सुरावट त्याला जाणवत राहाते, हाच आशेचा मंत्र, हेच त्याचे माणूसपण.

नन्दू, ही कविता तुमची नसली तरी मूळ कवीकडून तुम्ही परवानगी घेतलीच असेल. कवीला माझे अभिनंदन कळवावे.

विसोबा खेचर's picture

7 Feb 2008 - 1:02 am | विसोबा खेचर

कि त्याच्या या काकुळतिने
विरघळेल एखादे वाद्य
नि झंकारतील अनाहुत सुरावटी

क्या बात है..!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2008 - 9:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तो भितो
नीरव रात्री वाद्यांच्या किंचाळण्याला
त्याचे हात थरथरतात अपराध्यासारखे
दळभद्री,कुचकामी हात ऊचलुन
मनातल्या मनात तो वाद्यांना सांगतो
तुम्ही जड आहात्
तुम्हाला कळणार नाहित जुलमींनो
माझ्या काळजातल्या अलवार सुरावटी
नाजुक अनि सुक्ष्म

नंन्दु,
कवीला कळवा फारच वेदना घेऊन येणारी कविता आहे, अस्वस्थेतेचा हुंकार वाद्यांच्या निमित्ताने सहीच आला आहे.
कविता खूप काही बोलणारी आहे, कविता आणि शब्द खूपच आवडले !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे