श्री. अरुण वडुलेकर यांनी सादर केलेले "एक होती परी" ह्या बालगीतांचे रसग्रहण वाचून आणि विशेशत: परीची कविता वाचून,
अशीच एक मनांत ठसलेली पराची कविता सादर करण्याचा मोह आवरत नाही. या कवितेचा जनक कोण आहे ते माहीत्ये का तुम्हाला .. श्री अरुण वडुलेकर हेच्च :)
पण बटाटवड्यातल्या लसणा इतकीच या कवितेची चव अजून जिभेवर लोळते आहे.
एक होता परा
एक होता परा खूप खूप गोरा
एवढासा होता पण छान जर्सी गोर्हा
एकदा काय झालं
पुण्यातल्या मुठेला पूर मोठा आला
पराचा कॅफे वाहून गेला
रड रड रडला ,वेडा पिसा झाला
आंदोबा भाऊकडे धावत गेला
आंदोबा म्हणाला
उगी उगी दात ओठ नको खाऊस
येतो मी नदी काठीं
(एकदा ऍप्रायझल होऊन दे)
कॅफे देतो बांधून
तेंव्हा पासून परा (मुळा)नदीकाठीच राहिला
( त्या गटाराच्या ) पाण्यांच्या माशांचा मालक झाला
आंदोबा आंदोबा लवकर ये
पराचा बंगला बांधून दे.
हे विडंबण म्हणजे मनोरंजन आणि तारूण्य या दोनही भावनांची विलक्षण भेसळ आहे. छान जर्सी गोर्हा या केवळ तीन शब्दांनी पराचे भरदार डौलदार व्यक्तिमत्व वशिंडा सकट डोळ्यापुढे उभे राहयचे. पराचा कॅफे वाहून गेला म्हटले की परा बरोबरच आम्हीही रडवेले होत असूं. मग आंदोबाने पराला पुन्हा कॅफे बांधून देण्याचे अश्वासन दिले की हायसं वाटायचं. पण ह्या रेसेशन मधे त्याला आउंदा इंक्रिमेंट मिळेल की नाही, ऍप्रायझल होईल की नाही असा विचार करून भितीही वाटत असे.
पण अजूनही जेंव्हा जेंव्हा एखाद्या नदीकाठी जाणं होतं तेंव्हा त्या पाण्याच्या माशांचे झुंड पहातांना त्यांचा मालक परा मला अजूनही आठवतो आणि आंदोबाने त्याचा शब्द अजून पाळला नाही म्हणून अजूनही त्याच्याशी कट्टी कराविशी वाटते. ए आंद्या कट्टी रे तुझ्याशी. मग त्या माशांना गट्टम केलं की त्यांतून परा बाहेर येऊन मला भेटेल असे मला अजूनही वाटत राहते.
तळटिप : परिकथेतील राजकुमार आणि आणंदयात्री हे आम्हाला अणूक्रमे मोठ्या आणि छोट्या भावासारखे आहेत (तिघांना घेउन अमर-अकबर-अँथोनी रिमेक निघेल .. असो) त्यामुळे त्यांना हलकेच घ्या असं औपचारीक सांगावसं वाटलं नाही. श्री. अरुण वडुलेकर सरांच कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी हार्दिक आभार
- टारू(ण) पिंपळेकर
प्रतिक्रिया
1 May 2009 - 8:41 pm | बिपिन कार्यकर्ते
टार्या, अजून २ दिवस सुट्टी आहे तुला... नुसत्या कल्पनेनेच रडवेली होतोय आम्ही. ;)
अवांतरः काल काय खाल्लं होतंस?
बिपिन कार्यकर्ते
1 May 2009 - 9:20 pm | नितिन थत्ते
सहमत.
टाराभौ सगळ्यांना शिंगावर घेत सुटलेत (जर्सी गोर्ह्याला शिंगं असतात का?).
आणखी दोन दिवस सुट्टी म्हणजे काय खरं नाय.
अवांतरः काल काय खाल्लं होतंस?
पिझ्झाबेसच्या जाडीची पोळी आणि कच्च्या भाज्या.
खराटा
(रंग माझा वेगळा)
1 May 2009 - 9:37 pm | प्राची
बिकांशी एकदम सहमत.
खरटाकाका,
टारुभौंनी पिझ्झाबेसच्या जाडीची पोळी आणि कच्च्या भाज्या नाही काही,ती चमचमित थाळी फस्त केली आहे. :> आता २ दिवस एकदम जोमाने सगळ्यांची धुलाई आहे. :P टारुभौ सावज पकडायला टपलेलेच असतील. /:)
टारूभौ लगे रहो. =)) =)) =))
4 May 2009 - 3:03 pm | विजुभाऊ
टारुभौ किती करूण गीत आहे.
लहान मुलांच्या हृदयला पीळ पडतो.
इतके करूण काव्य शतकानुशतकात एकदाच होते.
बरे झाले हे काव्य उन्हाळ्यातच लिहिले. पावसात ते फारच करूण वाटले असते
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं ........विजुभाऊ सातारवी
1 May 2009 - 8:48 pm | आनंदयात्री
>>तिघांना घेउन अमर-अकबर-अँथोनी रिमेक निघेल .. असो
=)) =)) =)) भाड्या व्हिलण कोण रे मग ??
बाकी पराला खडकी दापोडीत एक भुखंड देउ केला होता पण त्याला नदिकाठच्या रेतीचाच मलिदा पाहिजे.
त्याचा नेटक्याफे पुन्हा सुरु झाला आहे .. कालच आम्ही "येथे पोर्नोग्राफिक कंटेंट पहाण्यास मनाई आहे, तसे आढळळ्यास ग्राहकाचे नाव पत्ता आणी पाहिलेल्या साईटचा स्क्रीनशॉट अनुक्रमे पुण्य नगरी, सदाशिव पेठ वार्ता, धनकवडी प्रभात या प्रथितयश वृत्तपत्रात छापण्यात येईल." अश्या नोटिशा प्रिंट करुन लावल्या.
2 May 2009 - 2:24 pm | देवदत्त
कालच आम्ही "येथे पोर्नोग्राफिक कंटेंट पहाण्यास मनाई आहे, तसे आढळळ्यास ग्राहकाचे नाव पत्ता आणी पाहिलेल्या साईटचा स्क्रीनशॉट अनुक्रमे पुण्य नगरी, सदाशिव पेठ वार्ता, धनकवडी प्रभात या प्रथितयश वृत्तपत्रात छापण्यात येईल." अश्या नोटिशा प्रिंट करुन लावल्या.
अरे, तुमच्या कॅफेलाही नोटीशी पाठवतील की, स्क्रीनशॉट छापलेत तर ;)
1 May 2009 - 8:50 pm | श्रावण मोडक
छान जर्सी गोर्हा या केवळ तीन शब्दांनी पराचे भरदार डौलदार व्यक्तिमत्व वशिंडा सकट डोळ्यापुढे उभे राहयचे.
+१
1 May 2009 - 9:01 pm | अनामिक
झक्कास विडंबण!
-अनामिक
1 May 2009 - 9:03 pm | क्रान्ति
अरे टारू, कच्च्या मालाच्या पुरवठादाराला श्वास तरी घेण्याची उसंत द्या! तिकडं वरिजनल टंकून हात मोकळे करेपर्यंत तुमचं विडंबन तयार! [ह.घे. असं सांगू?] इतकं सुपरफाष्ट काम! कमाल आहे तुमच्या प्रतिभेची! मस्त आहे कविता! =D> =))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
1 May 2009 - 11:17 pm | प्राजु
क्रांतीशी १०००००% सहमत आहे.
लगे रहो टारूभाय. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 May 2009 - 9:05 pm | अरुण वडुलेकर
मी सहजच सादर केलेल्या बालगीताचं इतकं छान विडंबनही होऊ शकेल असं मला स्वप्नातही वाटलं नसतं.
ही सारी त्या मूळ कवितेची किमया असली तरी तुमची प्रतिभाही आऊटस्टॅन्डिन्ग आहे.
कवितेचे आणि त्यापुढील मनोगताचे विडंबन मनापासून आवडले.
धन्यवाद.
1 May 2009 - 9:17 pm | चतुरंग
जर्सी गोर्हा???!!!
हा हा हा!!!
शॉल्लेट विडंबन!! :D
तू फुल्टू सुटलाहेस! काल रातच्याला कॉटवरुन पडलास की काय डोक्यावर, पर्यांची स्वप्न स्वप्न बघता बघता? ;)
चतुरंग
1 May 2009 - 9:39 pm | भडकमकर मास्तर
आयला टार्या,
आवर रे..
परा हा जर्सी गोर्हा.... =))
आणि कविताही छान ..
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
1 May 2009 - 11:31 pm | घाटावरचे भट
आयला हसून हसून मरेश...काय रे टार्या, लोकांचा विचार कर की जरा. मारायला निघालाय हसवून हसवून...
2 May 2009 - 6:45 am | अवलिया
=))
लै म्हंजी लै भारी !!!
--अवलिया
3 May 2009 - 7:32 am | सहज
:-)
इस हप्ते के विनर है टारोबा! ह्या आठवड्यात सर्व २०-२० मॅचेस निर्विवाद जिंकल्यास रे!
3 May 2009 - 10:58 am | टारझन
ह्हा ह्हा ह्हा !! काय सहज राव ... शब्दांनीच गुदगुल्या करता का राव ... इकडं एक से एक फ्रेंजायजीस आहेत ..
आमची बी एक टिम :)
(टेरर टारझन्स इलेव्हन)
2 May 2009 - 8:41 am | विनायक प्रभू
असेच म्हणतो.
हा आता माझी पण कधीतरी उतरवणार.
2 May 2009 - 9:21 am | निखिल देशपांडे
रे टार्या भाउ.... अजुन दोन दिवसात काय काय लिहिणार बाबा तुम्ही. गाडी जोरात चालु आहे तुमची
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
2 May 2009 - 10:59 am | परिकथेतील राजकुमार
=)) =))
च्यायला सगळे हलकट लोक्स भरभरुन प्रतिसाद देत आहेत ;)
आंदोबा आंदोबा लवकर ये
पराचा बंगला बांधून दे.
या ठिकाणी आम्ही एक बदल सुचवु इच्छीतो....
आंदोबा आंदोबा लवकर ये
येताना व्हिस्कीची बाटली घेउन ये.
आता कसे झ्याक वाटते ;)
आणी च्यायला मला जर्सी गोर्हा वगैरे म्हणालेले वाचनात आले तर गाई म्हशी बाळंत होणे सोडुन देतील =))
जर्सी परा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
2 May 2009 - 11:21 am | टारझन
जगदंब जगदंब ... इथे पण अंतरजातीय आहे का ? छाण =))
2 May 2009 - 2:21 pm | प्रकाश घाटपांडे
कोन्ला सांगु नको लई वाटेकरी होतीन.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
2 May 2009 - 1:25 pm | ठकू
जर्सी गोर्हा =))
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
3 May 2009 - 11:57 am | कुंदन
>>एवढासा होता पण छान जर्सी गोर्हा
हे तर लै भारी.
परा च्या अंगावर मुठभर मांस चढले असेल...
3 May 2009 - 12:16 pm | पाषाणभेद
बाकी काही म्हणा, टारूदादा आपण परी चे पुल्लींग परा हा शब्द मराठीत नवीन टाकला आहे.
प्र. के. अत्रेंची आठवण झाली.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
4 May 2009 - 9:44 am | ऋचा
मस्त रे!!!
=)) जर्सी गोर्हा काय अरे??????????
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"