श्री. धनंजय यांनी सादर केलेले विंदांच्या बालगीतांचे रसग्रहण वाचून आणि विशेशत: परीची कविता वाचून,
अशीच एक मनांत ठसलेली परीची कविता सादर करण्याचा मोह आवरत नाही. या कवितेचा जनक कोण आहे ते ज्ञात नाही.
पण गूळ दाण्याच्या खाऊ इतकीच या कवितेची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे.
एक होरी परी
एक होती परी खूप खूप गोरी
एवढीशी होती पण छान छान भारी
एकदा काय झालं
स्वर्गातल्या गंगेला पूर मोठा आला
परीचा बंगला वाहून गेला
रड रड रडली ,वेडी पिशी झाली
चांदोबा भाऊकडे धावत गेली
चंदोबा म्हणाला
दात ओठ नको खाऊस
येतो मी नदी काठीं
घर देतो बांधून
तेंव्हा पासून परी नदीतच राहिली
पाण्यांच्या लाटांची मालकीण झाली
चांदोबा चांदोबा लवकर ये
परीचा बंगला बांधून दे.
ही कविता म्हणजे स्वप्नरंजन आणि कारूण्य या दोनही भावनांचे विलक्षण मिश्रण आहे. खूप खूप गोरी या केवळ तीन शब्दांनी परीचे लावण्य डोळ्यापुढे उभे राहयचे. परीचा बंगला वाहून गेलाम्हटले की परी बरोबरच आम्हीही रडवेली होत असूं. मग चांदोबाने परीला पुन्हा घर बांधून देण्याचे अश्वासन दिले की हायसं वाटायचं .
पण अजूनही जेंव्हा जेंव्हा एखाद्या नदीकाठी जाणं होतं तेंव्हा त्या पाण्याच्या लाटा पहातांना लाटांची मालकीण परी मला अजूनही आठवते आणि चांदोबाने त्याचा शब्द अजून पाळला नाही म्हणून अजूनही त्याच्याशी कट्टी कराविशी वाटते. मग त्या लांटाना स्पर्ष केला की त्या लाटांतून परी बाहेर येऊन मला भेटेल असे मला अजूनही
वाटत राहते.
प्रतिक्रिया
1 May 2009 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते
सुंदर!!! कविता छानच. आणि शेवट वाचताना अंगावर काटा आला.
बिपिन कार्यकर्ते
1 May 2009 - 2:52 pm | सँडी
सुंदर!
'बालपण देगा देवा' असेच वाटले.
1 May 2009 - 3:00 pm | परिकथेतील राजकुमार
मीच देतो थांबा एक राजवाडा बांधुन ;)
कवीता खुपच आवडली .
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
1 May 2009 - 4:13 pm | प्रमोद देव
अरूणराव कविता मस्तच आहे आणि तुमचे मनोगतही आवडले.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
1 May 2009 - 5:01 pm | चन्द्रशेखर गोखले
खूपच सुंदर , बालसुलभ कारूण्य पण आहे..!
1 May 2009 - 8:14 pm | क्रान्ति
कविता आणि मनोगतही सुन्दर.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
1 May 2009 - 8:35 pm | टारझन
अरूण सर .. हा प्रकार तुम्ही चुकीच्या कॉलम मधे टाकलाय ...
तरी ही आवडला ... आता आमचे हात विडंबण करण्यास सळसळत आहेत , कृपया आम्हाला एकडाव माफ करावे , तसंही कवितांचे विडंबण आम्हाला जमत नाही.
विडंबण - एक होता परा
- विडंबक) केशरसुमार
1 May 2009 - 8:36 pm | धनंजय
मुलांना सहज आवडेलसे बालगीत.
(बाकी चंद्रसुद्धा खोटी वचने देऊन तंगवत ठेवतो तर. आपण सगळेच नाही का पावसाला खोटा पैसा देऊन फसवत?)
याचा वेगळा पाठ कोणाला माहीत आहे का? बाकीची कविता यमकबद्ध आहे, हा इतक्या ओळींत मात्र यमक नाही, म्हणून शंका आली.
चांदोबा म्हणाला रुसून नको जाऊस
नको तू अशी दात ओठ खाऊस
मी नदी काठी येतो
तुला घर बांधून देतो
असे सुचते आहे, पण पारंपरिक यमकबद्ध पाठ कोणाला येत असेल तर मजा वाटेल.