परीचा गाव - बालकविता
----------------------------------
स्वप्नांच्या राज्यात परीचा गाव
तिथली गंमत काय सांगू राव ?
तिथले चांदणे सोनेरी उबदार
उन मात्र तिथले शीतल गारगार
तिथे नाही चालायचे,नुसतेच उडायचे,
दिवसा घ्यायची झोप आणि रात्री खेळायचे.
शाळा नाही ,अभ्यास नाही ,ढगातून फिरायचे,
चंद्राच्या झुल्यावर झोके घ्यायचे.
आईस्क्रिमचे डोंगर नि थम्सअपची कारंजी,
कारंजात तरंगतात कांद्याची भजी
नदीतून गोडसे अमृत वहात असते,
काठावर गोळ्या चॉकलेट पडलेले असते.
सोन्याच्या झाडाला पाचुची पाने,
गोल गोल डाळिंबात माणकाचे दाणे.
'इतक्या छान गावातून परत का आला?'
त्याची सुध्दा झाली मजा सांगतो तुम्हाला.
डाळिंब खाताना दात तुटला रक्त आले.
खुप्, खुप दुखले तेंव्हा आई-बाबा आठवले.
आई नि बाबा तिथे खुप शोधले, परीच्या राज्यात कुठे नाही दिसले.
डोळे मिटुन मग घरी परत आलो, आईच्या कुशीत झोपून गेलो।'
कवयित्री : उज्ज्वला केळकर
------------------------------------------------
गंमत गाणी
प्रतिक्रिया
30 Apr 2009 - 4:49 pm | चन्द्रशेखर गोखले
आले वा अमोल दादा ! काय मत्त ले .. खूप खूप आवल्ली !!
30 Apr 2009 - 4:49 pm | चन्द्रशेखर गोखले
आले वा अमोल दादा ! काय मत्त ले .. खूप खूप आवल्ली !!
30 Apr 2009 - 5:18 pm | मराठमोळा
छान बालकाव्य आहे. कवियित्रीचे अभिनंदन
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
30 Apr 2009 - 5:24 pm | आनंदयात्री
मस्त !!!
आवडली बालकविता
:) :) :)
-
आंदुल्या
30 Apr 2009 - 5:57 pm | धनंजय
कवयित्रीचे अभिनंदन!
"गंमत गाणी" ब्लॉगही आवडला. (चिंटू, वगैरे, मराठी कार्टूनची चित्रे डकवण्याची परवानगी घेता आली तर छान होईल. सध्याची सजावटही सुंदर आहे. पण सुरुवातीचा माझा आवडता "कॅल्व्हिन आणि हॉब्स" मराठी मुलांना लगेच ओळखू येणार नाही.)
30 Apr 2009 - 6:05 pm | शितल
बालकविता आवडली. :)
30 Apr 2009 - 11:22 pm | प्राजु
कांद्याची भजी खूप आवडली. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 May 2009 - 10:01 am | विकास
कविता मस्तच आहे. एकदम शांता शेळक्यांच्या "किलबील किलबील पक्षी बोलती" मधील, "त्या गावाची गंमत न्यारी" आठवली.