जीवन तसं असतं सोप्प
काहीच नाही कठीण..
जीवन म्हणजे झुळझुळणारा
खळखळणारा झरा
जीवन म्हणजे मोर नाचरा
फुलवून पंखपिसारा
जीवन म्हणजे मंजुळ मंजुळ
ऐकवं कोकीळ गाण
जीवन तसं असतं सोप्प
काहीच नाही कठीण..
जीवन म्हणजे हिरव्या हिरव्या
पानांची हो सळसळ
जीवन म्हणजे शितल शितल
वा-याची हो झुळझुळ
चैत्रबनात येउन घाली
नवथर सृष्टीला शीळ
जीवन म्हणजे मोकळ्या आकाशी
सांडल ट्प्पोर चांदणं
जीवन तसं असतं सोप्प
काहीच नाही कठीण
जीवन म्हणजे उचंबळुन
वाहणारी अल्लड नदी
म्हणे माझा साजण सागर
भेटेल मला हो कधी..?
जीवन म्हणजे डोंगरमाथी
पेटीयला वणवा..
जणु मनाला जाळीतो माझ्या
दु:खांचा वैशाखवणवा..
जीवन म्हणजे लाटेमागोमाग
येते दुसरी लाट
जशी संकटे येती आयुष्यात
एकापाठोपाठ..
जीवन म्हणजे काळाच्या
उदरात झो़कुन देणं
जीवन मग होतं सोप्प
काहीच नाही कठीण
रोज नवा क्षण रोज नवा प्राण
श्वासही रोज नविन..
जीवन तसं असतंसोप्प
काहीच नाही कठीण..
प्रतिक्रिया
28 Apr 2009 - 7:40 pm | क्रान्ति
कविता खूप खूप आवडली.
:) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
28 Apr 2009 - 9:19 pm | उमेश कोठीकर
किती सुंदर! रोज नवा क्षण,नवा प्राण, श्वासही रोज नवीन..... वा वा..! असे लिहायला जमले तर? असे वाचायला मिळते हेच नशीब.