दचकलात काय?
हे प्रकटन अगदी निष्पाप, निर्मळ, आणि निर्व्याज आहे.
अगदी जपानी बँके प्रमाणे.
ह्या प्रेमकथेतील पात्रांचे स्थळ, काळ, पत्ते हवे असल्यास व्यं. नी करावेत. वाचन झाल्यावर 'तब्बेत बिघडली का?' च्या खरडी पाठवु नयेत.
पात्रसंख्या-३
काका, वय ५३, काकु वय ४५ मुलगा २१
लग्नाला २२ वर्षे झालेली. काकांनी कामाचे तास वाढवुन मंदीवर विजय मिळवलेला आहे. थोडक्यात सुखी मध्यम वर्गीय घर. काकू घरीच असतात.
_______________________________________________________
भ्रमण ध्वनीचा गजर झाला. त्या मधुर नादाने मला जाग आली. वातानुकुलीत यंत्राची कालच आंघोळ झाल्याने शयनगृहाला 'काश्मिर्'चे स्वरुप आले होते. हळुच बाहेर आलो. आणि फरक जाणवला तापमानाचा. त्रिशंकु वेळ होती. ना रात्र ना पहाट. तेजोमयाच्या आगमनाची चाहुल देणारा किंचीत रक्तिमा क्षितीजावर पसरला होता. दुर वरुन भुपाळी आणि मशिदीवरील बांग ह्यांचे मिश्रण कानावर येत होते. देवघरातील मंद समयीचा प्रकाश काळोखाचे वेध घेत होता. एकंदर प्रसन्न चित्ताने मी मुख्य शयनगृहाच्या शौचकुपा कडे प्रयाण केले. आणि काय कुणास ठाउक एक फाउंड कविता सुचली.
लवकर उठणार असशील तर
चहा करुन घे,
पण उगाच खुड्बुड न करता
झोपमोड करु नकोस माझी
सिरियल मुळे उशिरा झोपते मी
न्याहरी देणार नाही
नाहीतरी कचेरीत
फुकट मिळतेच की.
कविता छान झाली ह्या आनंदात मी शौचकुपातले संयंत्र कुंडीवर नीट ठेवायला विसरलो. ह्या यंत्राने मला खुपच आराम झाला होता.
हाताचा उपयोग नाही. आणि ते यंत्र मेहुण्याने ३००० रुपये खर्च करुन जपान वरुन आणले होते. बहुदा त्याला 'हाथ धुवायला विसरतात' असे हीने सांगितले असावे. आता विचारात होत असावे कधी कधी.
ते यंत्र पडले आणि तुटले. आता आवाजाने जागी झाली की काय शंकेने माझे काळीज शतशः विदिर्ण झाले. देवाची प्रार्थना करुन बाहेर आलो. बघतो तर काय ही अंथरुणावर नाही. परमेश्वराचे आभार मानुन आंघोळीला निघालो. स्वयंपाक घरातुन बांगड्याचा किणकिणाट कानावर येत होता. आज काय नुर वेगळाच होता.पात्रामधे मोती साबण बघुन अचंबित झालो. इतर वेळी 'लाइफ बॉय'
असतो. खुंटीवर पंचा आणि रुमाल तयार होता. आज काय दिवस आहे ह्याचा विचारात आंघोळ संपली.
देवपुजा आटोपली. आज जरा फुले नेहेमीपेक्षा जास्त होती. पुजा आटोपताच हातात गरम चहा मिळाला. बदलामुळे जीव सुखावला.
----------------------------------------------------------------------------------------------
काकु: आज एवढ्या लवकर प्रयाणाचे काय प्रयोजन गडे?
काका: ऑफिसचे काम आटोपुन 'फोरास रस्त्याला' जायचे आहे सखे.
काकु: आता हे काय आणखीन नविन?
काका: तात्याबाचे आमंत्रण आहे. तेथील थोर समाजसेविकांची मुलाखात घ्यायची आहे.
काकु: आणखी कोण बरोबर आहे?
काका: रामदास बाबा ना पण आमंत्रण आहे.
काकु: मग हरकत नाही. नविन प्रदेशात जाताना हुशार माणसे बरोबर असावीत.
काकु: सर्व साक्षी नाहीत का?
काका: चांगली सुचना आहे तुझी. तात्याबा ना विचारुन बघतो. तिथे पण बरेच हुतात्मा असतील.
काकू: त्या मुलांचे काय चालले आहे?
काका: राजेचे आता सर्व व्यवस्थित चालले आहे. त्याने 'बाटलीमठाच्या' स्वांमी पदाचा राजीनामा दीला आहे. टारझन चे म्हणशील तर सध्या आफ्रिकेप्रमाणे मुंबईत झाडे नसल्यामुळे जरा नाराज आहे.
काकु: होईल त्याला सवय हळु हळु. आज काय दिवस आहे तुम्हाला माहीत आहे का?
काका: प्रिये, मघापासुन खुप विचार करतो आहे पण लक्षात आले नाही बॉ.
काकु: प्राणनाथ, आज भगवान परशुरामाचा जन्मदिवस
काका: हे तुला कसे कळाले प्राणप्रिये? घंटाळी मंदिरात गेली होतीस का?
काकु: नाही बॉ. असे आपण का म्हणत आहात गडे.
काका: नाही ग सखे, माझे एक मित्र आहेत अवलिया नावाचे. त्यांचा काल मंदिरात सत्संग होता. त्यांचा थोर पुरुषांच्या जीवनावर गाढा अभ्यास आहे. देवादिकांच्या बद्दल तर बोलुच नकोस. खास करुन इंद्र किंवा तत्सम देवांच्या खाजगी आयुष्याची त्याची डॉक्टरेट झाली आहे.
काकु: तुमचे काही तरीच बाई? अहो आज वैशाख शुक्लाचा ३ रा दिवस.
काका: असेल गडे. त्याचे काय?
काकु: तुम्हाला धर्माचे काहीच कसे नाही हो गडे?
काका: आता मला उशीर होत आहे कृपया क्रिप्टीक बोलु नकोस.
काकु: आज अक्षय तृतिया.
काका: तर? (इथे संभाषणाचा रंग बदलतो)
काकु: हे ३ हजार घ्या. आणि येताना ५ ग्रॅम सोने घेउन या.
काका: ३ हजारात ५ ग्रॅम सोने? मारेल मला सोनार तेजायला.
काकु: वरचे तुम्ही घाला.
काका: आयला काय पण शेंड्या लावतेस. हे पण माझेच की? खिशातुन काढुन घेतलेले.
काकु: हो. त्यात काय? नाहीतरी खिशात ठेवले असते तर ते तुम्ही वेंधळ्या सारखे सांडलेच असते.
काका: एकदा ५०० रुपये काय गेले कीतीवेळ टोमणा देशील.
काकु: ठीक आहे. येताना न विसरता आणा?
काका: आता माझ्याकडे नाहीत. भोज्याला शिवताना संपले की.
काकु: ते मला काहीही माहीत नाही.आज जे कुणी येतील त्यांच्याकडे घ्या. कशाला फुकटचे विझवटे धंदे करता ते काही कळत नाही.
काका: आजच्या दिवसाला कुणी येत नाही, आज अक्षय तृतीया आहे ना?
काकु: काही तरी सांगु नका. आज ५ ग्रॅम सोने आणायलाच हवे. लक्षात ठेवा परत कधी न सांगता कुणालाही घरी आणाल तर चहा सुद्धा देणार नाही. अगदी तुमच्या नातेवाइकांनासुद्धा.
काका: असे कितीशे माझे नातेवाइक येतात? तुझी बहीण आणि आई तळ ठोकतात तेंव्हा मी काही म्हणतो का?
काकु: काय म्हणायची बिशाद आहे तुमची? सण वार कोण करत गेली कित्येक वर्षे?
काका: ठीक आहे, बघतो माझे आई काही व्यवस्था होते का? प्रयत्न करतो.
काकु: मुलांना सांगता ना नुस्त्या प्रयत्नाने काहीही होत नाही. प्रत्यक्ष करायला हवे. करा.
सर्व आवाजाने मुलगा उठला. खुणेने त्याने काकांना तुटलेल्या संयंत्राची आठवण केली आणि आज सोने खरेदी शिवाय पर्याय नाही हे काकांनी ओळखले आणि न पुढे काहीही न बोलता काढता पाय घेतला.
प्रतिक्रिया
28 Apr 2009 - 9:20 am | पाषाणभेद
सर, ३रा दिवस शिर्षक ध्यानात आले नाही. सांगाल का?
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
28 Apr 2009 - 9:22 am | विनायक प्रभू
वैशाख शुक्ल ३ रा दिवस= अक्षय तृतिया
28 Apr 2009 - 9:52 am | अनंता
मग पाच ग्रॅम सोने आणलंत का?
स्वगत : सोना कितना सोना है |
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
28 Apr 2009 - 10:54 am | विनायक प्रभू
न आणुन सांगतो कुणाला?
28 Apr 2009 - 10:08 am | चन्द्रशेखर गोखले
आणि बेफाट.. मजा आली !
28 Apr 2009 - 10:25 am | प्रमोद देव
:)
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
28 Apr 2009 - 10:28 am | अवलिया
अर्रर्रर्रर्र
--अवलिया
28 Apr 2009 - 10:59 am | परिकथेतील राजकुमार
ह्याचा पुढचा आणी महत्वाचा भाग लवकर टाका ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
28 Apr 2009 - 11:06 am | विसुनाना
जागतिक मंदीच्या काळात जमेल तेवढे सोने घेणे योग्यच आहे. तसेच एका नायक-नायिकेच्या दीर्घ प्रेमकथेतील उपकथानकात 'आगामी स्नुषेच्या सालंकृत आगमनाची पूर्वतयारी' असाही विषय असू शकतो. कथानायकाने याचा विचार केला असेलच. कथानायिकेच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटते.
अवांतर :
वैशाख शुद्ध द्वितिया दिनांकी झालेल्या अवलिया महाराजांच्या सत्संगाबद्द्ल कथानायक कथानायिकेशी सविस्तर बोलला असता तर कथावाचकांच्या 'इंद्र' आणि 'इंद्रिये' या 'विषया'वरील ज्ञानात भर पडली असती...
28 Apr 2009 - 11:54 am | घाशीराम कोतवाल १.२
वैशाख शुद्ध द्वितिया दिनांकी झालेल्या अवलिया महाराजांच्या सत्संगाबद्द्ल कथानायक कथानायिकेशी सविस्तर बोलला असता तर कथावाचकांच्या 'इंद्र' आणि 'इंद्रिये' या 'विषया'वरील ज्ञानात भर पडली असती
विसुनानांच्या सुचनेशी सहमत १००%
अतीअवांतर आजकाल अवलिया फॉर्मात आहेत नाव वापरण्याच्या रॉयल्टी वर भरपुर पैसे कमावत आहे
पहिला टार्या आता प्रभु साला घाश्या आपल्याला काय असे पैसे मिळायच नाय बा
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
28 Apr 2009 - 3:48 pm | अनंता
चालू द्यात.
४था दिवस.
५वा दिवस.
वाट पहातोय.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
28 Apr 2009 - 6:30 pm | विनायक प्रभू
अहो ३र्या दिवशी केलेळी चांगली कार्ये ४थ्या आणि ५ व्या दिवशी कामाला येतात.