तात्यांच्या सूचनेवरुन ..( पण खास जमली नाही असं वाटतं )
झाकला ग तुझा चेहेरा
काळ्याकुट्ट बटांनी
आकाशीचा चंद्र जणु
ग्रासला ग नभांनी.. !!
********
नसेल तुझ्या गालांवर लाली
निळी कमळंसुद्धा तळ्यात फुलतात
नसतील तुझे ओठ गुलाबी
काळी द्राक्ष सुद्धा रसरशीत असतात !!
प्रतिक्रिया
28 Apr 2009 - 9:34 am | शरदिनी
चेहर्यावर बटा आणि नभांनी चंद्र ग्रासणे ही एक अत्यंत नाविन्यपूर्ण कल्पना...
कसं सुचतं हो तुम्हाला?
निळ्या गालांची आणि काळ्या ओठांची आणि काळ्या केसांची ही स्वप्नसुंदरी फार आवडली...
तुमच्या सर्व कवितांइतकीच ही सुंदर कविता आहे...
अशाच रोचक कविता लिहिल्यात , तर आम्हाला आनंद होत राहील...
ती सुरवातीची सूचना कळाली नाही...तात्याची सूचना म्हणजे? तात्यासाठी तुम्ही अशा कविता लिहिता का? किंवा तात्यासाठी तुम्ही अशा कविता का लिहिता?
28 Apr 2009 - 9:37 am | चन्द्रशेखर गोखले
माझ्या मुखवटे या कवितेला तात्यांनी दिलेला प्रतिसाद वाचा
28 Apr 2009 - 9:45 am | विनायक प्रभू
कविता
28 Apr 2009 - 1:11 pm | उमेश__
उत्तम
28 Apr 2009 - 2:09 pm | विसोबा खेचर
गोखलेसाहेब,
सह्ही कविता.. !
माझ्या सूचनेचा मान राखल्याबद्दल आभारी आहे! :)
तात्या.
28 Apr 2009 - 3:04 pm | हर्षद बर्वे
छान आहेत....पण...दुसरी अंमळ जास्त झकास आहे.
एच.बी.
28 Apr 2009 - 7:15 pm | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/